मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, ‘एकवेळ समझोता’अंतर्गत इतके शेतकरी पात्र
फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या एकवेळ समझोता योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील 1 लाख 69 हजार 820 शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोल आली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकवेळ समझोता अंतर्गत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकवेळ समझोता अंतर्गत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दोन लाखांवरील कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर दोन लाखांची ही कर्जमाफी मिळणार आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामीण बँकांमध्ये ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
काय आहे एकवेल समझोता योजना?
दरम्यान, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी यात कर्जमुक्ती, ‘वन टाइम सेटलमेंट म्हणजेच एकवेळ समझोता योजना आणली आहे. याशिवाय प्रोत्साहनपर लाभ अशा तीन प्रमुख घटकांचा समावेश यामध्ये केला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेत आले आहेत, ज्यापैकी पहिली यादी आता जाहीर करण्यात आली आहे.
कोणाला कसा लाभ मिळतो?
ज्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्याने असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. पण ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे. तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना अधिकाधिक पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता जाहीर झालेली ही पहिली यादी अत्यंत मोठा दिलासा मानली जात आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची नावे या यादीमध्ये आली आहेत. त्यामुळे आता पुढील यादीकडेही प्रतिक्षा लागून राहिली आहे.