AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियनप्रकरणी अखेर एसआयटी स्थापन, एसआयटीत कोण कोण?; आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?

ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणणारी मोठी बातमी आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीच्या सदस्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे एसआयटीचं काम आता सुरू होणार आहे.

दिशा सालियनप्रकरणी अखेर एसआयटी स्थापन, एसआयटीत कोण कोण?; आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार?
| Updated on: Dec 12, 2023 | 5:02 PM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 12 डिसेंबर 2023 : ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणणारी मोठी बातमी आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीच्या सदस्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे एसआयटीचं काम आता सुरू होणार आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात होतं. त्यामुळे आता एसआयटीची स्थापना झाल्याने आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने एसआयटीची घोषणा केली असून त्यावर अद्याप ठाकरे गटाची प्रतिक्रिया आलेली नाहीये.

नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी उचलला आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच नागपूरमध्ये आले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन प्रकरण उचलून धरलं. दिशा सालियन प्रकरणी एसआयटी तपास करणार असल्याची बातमी कालच येऊ धडकली होती. त्यानंतर आज या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापनाही करण्यात आली आहे. या एसआयटीत बड्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोण करणार तपास

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेचदेवेन भारती हे एसआयटीवर लक्ष ठेवून राहतील पण ते समोर येणार नाहीत अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

काय आहे दिशा सालियन प्रकरण?

9 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मुंबईतील मालाडमध्ये मृत्यू झाला होता. इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं होतं. सुशांतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता. काहींच्या मते दिशाने आत्महत्या केली होती. तर काहींच्या मते दिशाचा मृत्यू संशयास्पद होता. भाजपच्या काही नेत्यांनी तर या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केला होता.

कोण होती दिशा सालियन?

दिशाही कर्नाटकातील उडुप्पी येथील होती. ती सेलिब्रिटी मॅनेजर होती. वरुण शर्मा, सुशांतसिंह राजपूत, भारती सिंह आदि लोकप्रिय कलाकरांसोबत तिने काम केलं होतं. त्याशिवाय ती अनेक जाहिरात कंपन्यांशीही जोडलेली होती. ती टेलिव्हिजन अभिनेता रोहन रायला डेट करत होती. मृत्यूच्या काही दिवस आधी तिचा साखरपुडाही झाला होता.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना