Maharashtra Lockdown | राज्यात 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन करावा, उच्च न्यायालयाची राज्याला सूचना

| Updated on: Apr 29, 2021 | 4:40 PM

राज्यात 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन करावा, उच्च न्यायायलयाच्या राज्याला सूचना (Maharashtra corona lockdown high court)

Maharashtra Lockdown | राज्यात 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन करावा, उच्च न्यायालयाची राज्याला सूचना
Maharashtra-Lockdown
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तसेच नागरिकांचे कोरोनाविषयक गांभीर्य लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाने मोठे वक्तव्य केले आहे. राज्य सरकारने 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. तसेच कोरोनाविषयी लोकं अजूनही गंभीर दिसत नाहीयेत. कोरोनाविषयक नियमांचं पालन केलं जात नाहीये. असे असेल तर कोरोनाला कसं रोखलं जाणार असा सवालसुद्धा हायकोर्टाने केलाय. (maharashtra government have to impose 15 day strict lockdown to stop corona suggested mumbai high court)

मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले ?

राज्यातील कोरोना आणि लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्य सरकारने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यातली परिस्थिती पाहिली तर अजूनही लोक बाहेर दिसत आहेत. लोक अजूनही गंभीर नाहीत. त्यामुळे राज्यात पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्याशिवाय परिस्थिती आटोक्यात येणार नाही. राज्य सरकारने पूर्ण 15 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करावा, अशी सूचना न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकार लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवणार 

राज्य सरकारने ब्रेक द चेन अतंर्गत 1 मे पर्यंत अनेक कठोर निर्बंध लागू केलेले आहे. या निर्बंधांची मुदत येत्या 1 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे राज्यात आणखी 15 दिवस हे निर्बंध वाढवण्यात येतील असे सूतोवाच राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी केले आहेत. तसेच, काही मंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचनासुद्धा केलेली आहे. मात्र, त्याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.

सरकार कोर्टाच्या सूचनेकडे कसे पाहणार ?

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना देण्याआधीच राज्यात 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सरकारने केला आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी हा निर्णय जवळजवळ झाल्यातच जमा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या या सूचनेकडे राज्य सरकार कसे पाहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणरा आहे.

इतर बातम्या :

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळतोय; नितीन गडकरी म्हणतात, तिसरी आणि चौथी लाटही येणार

संकटाचे ढग दाटले, पुण्यात स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक; नाशिकमध्ये सरणाचा काळाबाजार

Maharashtra Coronavirus LIVE Update : पुण्यात मृत रुग्णांना नेण्यासाठी शववाहिका कमी पडू लागल्या, आता स्कुल बसमधून होणार मृतदेहांची वाहतूक

(Maharashtra government have to impose 15 day strict lockdown to stop corona suggested mumbai high court)