Maharashtra MLC Election Result Updates 2026 : विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालाचे आतापर्यंतचे सर्व अपडेट्स, पुण्यात भाजपला मोठा धक्का
Maharashtra MLC Election Result Updates 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या दोन आणि पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सुरु आहे. या निकालाचे आतापर्यंतचे सर्व अपडेट्स कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर जाणून घ्या.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. यात शिक्षक मतदारसंघाच्या दोन आणि पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा आहेत. काल सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता 24 तास होत आले, तरी अजून निकाल आलेले नाहीत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना आहे. महायुती निर्विवाद वर्चस्व गाजवेल असं वाटलेलं. पण महाविकास आघाडीने चांगली टक्कर दिली आहे. पुणे पदवीधरमध्ये चुरशीची लढाई सुरु आहे. आतापर्यंतच्या मतमोजमीच्या सर्व अपडेट्स जाणून घ्या.
पुणे पदवीधर निकाल अपडेट
पुणे विभाग पदवीधर निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर तर भारतीय जनता पार्टीचे कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर.
पुणे विभाग मतदारसंघात महायुती 1 तर महविकास आघाडी 1 असा बरोबरीत मुकाबला.
पुणे पदवीधर मध्ये पहिल्या फेरी मध्ये हर्षदा जाधव यांना 1,12,400 मत
स्मित जाधव यांना 10,2000 हजार मतं मिळाली आहेत
हर्षदा जाधव यांना 716 मतांची आवश्यकता आहे कोटा पूर्ण करण्यासाठी.
1,13,113 कोटा पदवीधरसाठी ठरला आहे.
पुणे शिक्षक अपडेट
शिक्षक मतदारसंघात सचिन सानप दुसऱ्या स्थानी मात्र कौस्तुभ गावडे आणि सचिन सानप यांच्या मतांमध्ये मोठा फरक.
शिक्षक मतदारसंघात 19 व्या बाद फेरी अखेर
कौस्तुभ गावडे यांना 17,600
सचिन सानप यांना 11,328
दत्तात्रय सावंत यांना 10,377
जयंत आसगावकर यांना 8,350
नागपूर पदवीधर निकाल अपडेट
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
दुसऱ्या फेरी अंती मिळालेले मत
अभिजीत वंजारी – 56630
सुधाकर कोहळे -60924
नितेश कराडे -24249
दुसऱ्या फेरी अखेरीस 4294 मतांनी भाजप चे सुधाकर कोहळे आघाडीवर…
अवैध मत – 15106
मतमोजणी नंतर 1 लाख 50 हजार 874 मत हे वैध ठरली आहे. त्यानुसार कोटा 75 हजार 438 मताचा कोटा ठरला असतांना दोन्ही उमेदवार हे मत घेऊ शकले नाहीत, त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांची मतं मोजली जातील.
दुसऱ्या पसंतीची मत कोणाला ठरलेल्या कोट्या पर्यंत नेतील याकडे लक्ष लागलं आहे.
अमरावती शिक्षक निकाल अपडेट
मागील 23 तासांपासून मतमोजणी सुरू
19 व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किरण सरनाईक हे 3535 हजार मतांनी आघाडीवर.
शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर.
तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर.
19 व्या बाद फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8348 मते.
शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4813 मते.
तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4786 मते.
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा.
किरण सरनाईक यांना 7796 मतांचा कोटा गाठणे आवश्यक.
मराठवाडा पदवीधर निवडणूक- मतमोजणी पूर्ण
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याच उमेदवाराला कोटा पूर्ण करता न आल्याने दुसाऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार
डॉ. प्रतापसिंह पाटील – 78,540
सतीश चव्हाण – 55,180
रविराज साबळे – 20, 470
दिलीप घुगे – 8, 366
23 हजार 360 मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर