दुहेरी हत्याकांडात शिक्षा, तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, नगरच्या उमेदवाराची ग्रामपंचायतीत बाजी

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: जामखेड तालुक्यातील नाहोली ग्राम पंचायतीतील उमेदवार काकासाहेब बबन गर्जे हा तुरुंगातून निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. (Ahmednagar Gram Panchayat Candidate Jail)

दुहेरी हत्याकांडात शिक्षा, तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात, नगरच्या उमेदवाराची ग्रामपंचायतीत बाजी
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 10:04 AM

अहमदनगर : तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला उमेदवार ग्रामपंचायतीवर निवडून आल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगणारा काकासाहेब बबन गर्जे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाला. त्यामुळे गर्जेच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. (Ahmednagar Naholi Gram Panchayat Candidate won from Jail)

तुरुंगात असतानाही उमेदवार निवडून आल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये समोर आला. जामखेड तालुक्यातील नाहोली ग्राम पंचायतीतील उमेदवार काकासाहेब बबन गर्जे हा तुरुंगातून निवडणुकीच्या मैदानात उतरला होता.

गर्जे हा 2018 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहे. सध्या तो जामखेड तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने निवडणूक अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. अर्ज भरल्यानंतर पुन्हा त्याची रवानगी तुरुंगात झाली, मात्र सोमवारी लागलेल्या निकालात तो विजयी ठरला.

जळगावातही तुरुंगातील उमेदवाराची बाजी

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बक्षिपूर ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळाली. या लढतीत जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी झाला. स्वप्निल मनोहर महाजन असे त्याचे नाव आहे.

स्वप्निल महाजन या उमेदवाराने जेलमधून ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढवली होती. रावेर शहरात जनता कर्फ्यूवेळी दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीत बक्षिपूर येथील माजी सरपंच स्वप्निल महाजन याला अटक झाली होती. तेव्हापासून तो जेलमध्येच होता. ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर स्वप्निल महाजनच्या भावाने त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

नोटाला स्वीकारलं, उमेदवाराला नाकारलं

खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना सपशेल नाकारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच ‘नोटा’ (NOTA – None of the above) हे बटण पाचशेहून अधिक मतदारांनी दाबलं. कुठल्याही उमेदवारापेक्षा जास्त मतं ‘नोटा’ला मिळाली. आता विजयी सदस्य कोण घोषित होणार, हा प्रश्न सर्वच उमेदवारांना पडला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम सांगत संभ्रम दूर केला. (Ahmednagar Naholi Gram Panchayat Candidate won from Jail)

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये ही आगळी वेगळी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत मतदारांनी नोटा बटणालाच अधिक पसंती दिली. उमेदवार शीतल सुग्रीव भोसले यांना 396 मतं मिळाली. तर ‘नोटा’ला चक्क 502 मतं पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

निवडणूक नियम काय सांगतो?

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी ‘नोटा’नंतर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. त्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार शीतल भोसले खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकार देविदास घोडेचोर यांनी ही माहिती दिली.

संबंधित बातम्या :

जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी

अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, ‘नोटा’ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?

(Ahmednagar Naholi Gram Panchayat Candidate won from Jail)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.