AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, ‘नोटा’ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी 'नोटा'नंतर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो (Ahmednagar NOTA votes candidate)

अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, 'नोटा'ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?
| Updated on: Jan 19, 2021 | 9:28 AM
Share

अहमदनगर : खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना सपशेल नाकारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच ‘नोटा’ (NOTA – None of the above) हे बटण पाचशेहून अधिक मतदारांनी दाबलं. कुठल्याही उमेदवारापेक्षा जास्त मतं ‘नोटा’ला मिळाली. आता विजयी सदस्य कोण घोषित होणार, हा प्रश्न सर्वच उमेदवारांना पडला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम सांगत संभ्रम दूर केला. (Ahmednagar Kharda Gram Panchayat Election NOTA gets more votes than any candidate)

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये ही आगळी वेगळी लढत पाहायला मिळाली. निवडणुकीत मतदारांनी नोटा बटणालाच अधिक पसंती दिली. उमेदवार शीतल सुग्रीव भोसले यांना 396 मतं मिळाली. तर ‘नोटा’ला चक्क 502 मतं पडली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

निवडणूक नियम काय सांगतो?

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी ‘नोटा’नंतर सर्वाधिक मतं मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. त्यानुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार शीतल भोसले खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकार देविदास घोडेचोर यांनी ही माहिती दिली.

जामखेडमध्ये तुरुंगातील उमेदवार विजयी

अहमदनगरमध्ये तुरुंगात असतानाही उमेदवार निवडून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जामखेड तालुक्यातील नाहोली ग्राम पंचायतीतील उमेदवार काकासाहेब बबन गर्जे हा तुरुंगात असतानाही निवडून आला.

गर्जे हा 2018 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी असून सध्या जामखेड तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने निवडणूक अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. अर्ज भरल्यानंतर पुन्हा त्याची रवानगी तुरुंगात झाली, मात्र सोमवारी लागलेल्या निकालात तो विजयी ठरला. (Ahmednagar Kharda Gram Panchayat Election NOTA gets more votes than any candidate)

जळगावातही तुरुंगातील उमेदवाराची बाजी

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बक्षिपूर ग्रामपंचायतीत जोरदार लढत पाहायला मिळाली. या लढतीत जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी झाला. स्वप्निल मनोहर महाजन असे त्याचे नाव आहे.

स्वप्निल महाजन या उमेदवाराने जेलमधून ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढवली होती. रावेर शहरात जनता कर्फ्यूवेळी दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीत बक्षिपूर येथील माजी सरपंच स्वप्निल महाजन याला अटक झाली होती. तेव्हापासून तो जेलमध्येच होता. ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर स्वप्निल महाजनच्या भावाने त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी

अहमदनगर जिल्ह्यात मनसेने खाते उघडले, विखेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

(Ahmednagar Kharda Gram Panchayat Election NOTA gets more votes than any candidate)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.