Maharashtra Board 12th Result 2025 : विज्ञान, कला, वाणिज्य… कोणत्या शाखेचा निकाल किती ? जाणून घ्या पटापट

HSC Result 2025 : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा टप्पा असलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज लागला असून 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

Maharashtra Board 12th Result 2025 : विज्ञान, कला, वाणिज्य... कोणत्या शाखेचा निकाल किती ? जाणून घ्या पटापट
12 वी निकाल
Image Credit source: social media
| Updated on: May 05, 2025 | 12:46 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ( 5 मे) जाहीर झाला असून 91.88 टक्के निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे मुलीच अव्वल ठरल्या असून नऊ विभागीय मंडळातून दरवर्षीमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तर सर्वाधिक कमी टक्केवारी लवातूर विभागाची आहे. कोकणाचा निकाल 96.74 तर लातूरचा निकाल 89.46 इतका आहे.

12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल चेक करता येणार आहे. या परीक्षेतील शाखानिहाय निकालही जाहीर झाला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 97.35 टक्के तर कला शाखेचा निकाल 80.53 टक्के आणि वाणिज्य ( कॉमर्स) विभागाचा निकाल 92.68 टक्के इतका लागला आहे. तसेच व्यवसाय शाखेचा निकाल 93.26 टक्के आणि आयटीआयचा निकाल 82.03 इतका लागला आहे.

विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे

विज्ञान शाखा

नोंदणी – 7 लाख 37 हजार 205

परीक्षेला बसले – 7 लाख 35 हजार 3

उत्तीर्ण – 7 लाख 15 हजार 595 पास झाले.

टक्केवारी – 97.35 टक्के

कला शाखा –

नोंदणी – 3 लाख 54 हजार 699.

परीक्षेला बसले – 3 लाख 49 हजार 696

उत्तीर्ण – 2 लाख 81 हजार 606

टक्केवारी – 80.52 टक्के

वाणिज्य विभाग

नोंदणी – ३ लाख ७६६

परीक्षेला बसले – २ लाख ९९ हजार ५२७

उत्तीर्ण – २ लाख ७७ हजार ६२९

टक्केवारी – ९२.६८

व्यवसाय

नोंदणी – ३० हजार १७

परीक्षेला बसले – २९ हजार ३६३

उत्तीर्ण – २४ हजार ४५०

टक्केवारी – ९३.२६

आयटीआय

नोंदणी – ४ हजार ३९८

परीक्षेला बसले – ४३८०

उत्तीर्ण – ३५९३

टक्केवारी – ८२.०३

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.८८ टक्के

कोकणची पोरं हुशार…

कोकणचा सर्वाधिक निकाल 96.74 टक्के लागला आहे. दुसऱ्या क्रमांकवर कोल्हापूर विभाग 93.64 टक्के, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग 92.93 टक्के, चौथ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर विभाग 92.24 टक्के, पाचव्या क्रमांकावर अमरावती विभाग 91. 43, सहाव्या क्रमांकावर पुणे विभाग 91.32 टक्के, सातव्या क्रमांकावर नाशिक विभाग 91.31 टक्के, आठव्या क्रमांकावर नागपूर विभाग 90.52 टक्के, नवव्या क्रमांकावर लातूर विभाग असून या विभागाता निकाल 89.46 टक्के इतका आहे.