AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | ‘व्हिडिओ खोटा आहे असं सोमय्या म्हणालेले नाहीत, याचा अर्थ….’ अनिल परब नेमकं काय म्हणाले?

Kirit Somaiya | "आतापर्यंत पैशाच्या खंडणी बद्दल ऐकलं आहे ही सेक्स खंडणी आहे का? कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलय. हे प्रकरण गंभीर आहे"

Kirit Somaiya | 'व्हिडिओ खोटा आहे असं सोमय्या म्हणालेले नाहीत, याचा अर्थ....' अनिल परब नेमकं काय म्हणाले?
Anil Parab
| Updated on: Jul 18, 2023 | 3:54 PM
Share

मुंबई : आज विधिमंडळात किरीट सोमय्या यांचा मुद्दा चांगलाच गाजला. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वृत्त वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. आज विधिमंडळाच्या सभागृहात जोरदार पडसाद उमटले. शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओवरुन जोरदार भाषण केलं.

‘ही सेक्स खंडणी आहे का?’

“हे शोधण तुमच काम आहे. या महिलेला शोधून काढणं तुमच काम आहे. ज्या महिलेने व्हिडिओ पाठवला, त्या बद्दल महाराष्ट्राला कळलच पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे, आतापर्यंत पैशाच्या खंडणी बद्दल ऐकलं आहे ही सेक्स खंडणी आहे का? कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलय. हे प्रकरण गंभीर आहे” असं अनिल परब म्हणाले.

याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे का?

“आठ तासांचे हे व्हिडिओ तुमच्याकडे गेले आहेत. गृहमंत्र्यांनी SIT लावणार का? हे जाहीर करावं” अशी मागणी अनिल परब यांनी केली. “किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी हा व्हिडिओ खोटा आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केला नाही असं त्यांनी म्हटलय. याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलय का?” असं अनिल परब म्हणाले. “व्हिडिओच्या त्या बाजूला कोण होतं? कुठे घेतला हा व्हिडिओ? कोणी घेतला हा व्हिडिओ? हे सर्व समतीने आहे की, सेक्ससाठी जबरदस्ती आहे ते सर्व बाहेर आलं पाहिजे” असं अनिल परब म्हणाले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं