AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेलच्या कर्मचाऱ्याकडून मराठीत बोलण्यास नकार, मनसे आक्रमक, अखिल चित्रेंनी दिली थेट धमकी

एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मुंबईतील चारकोप येथे मराठी तरुण आणि एअरटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या घटनेनंतर मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कार्यालयांवर आक्रमक आंदोलने केली.

एअरटेलच्या कर्मचाऱ्याकडून मराठीत बोलण्यास नकार, मनसे आक्रमक, अखिल चित्रेंनी दिली थेट धमकी
airtel mns charkop
| Updated on: Mar 11, 2025 | 7:58 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मनसेसह शिवसेनेनेही एअरटेलच्या एका कार्यालयाला मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. एक मराठी तरुण एअरटेलच्या गॅलरीत तक्रार घेऊन गेला होता. मात्र यावेळी एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला. यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी एअरटेलच्या मालाड कार्यालयाला थेट धमकी दिली आहे. जर तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्हीही तुमचा आदर करणार नाही, अशी उघड धमकी अखिल चित्रे यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील चारकोप परिसरात असलेल्या एअरटेलच्या कंपनीत मराठी भाषेवरून एक तरुण आणि महिला कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या महिलेला मराठी भाषा येत नसल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी नुकतंच एअरटेल कंपनीच्या चारकोप कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते आक्रमक झाले. कांदिवलीतील चारकोप येथील एअरटेल गॅलरीत मराठी न बोलल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.

एअरटेलच्या गॅलरीत तक्रार घेऊन गेलेल्या एका मराठी माणसाला एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिला होता. त्यानंतर मराठी भाषेवरून मराठी तरुण आणि एअरटेल महिला कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या दोघांचाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठी न बोलल्याबद्दल मनसे कार्यकर्ते चारकोपमधील एअरटेल गॅलरीत गेले. ते तिथे धरणे आंदोलनाला बसले होते. मनसेच्या निषेधानंतर एअरटेल कर्मचाऱ्यांनी माफी मागितली. महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.

अखिल चित्रेंची धमकी

या प्रकरणानंतर शिवसेना नेते अखिल चित्रे मराठीचा मुद्दा घेऊन मालाड एअरटेल कार्यालयात पोहोचले होते. एअरटेल हवेत आहे. मी ते हवेतून खाली खेचण्यासाठी आलो आहे, असे अखिल चित्रे यांनी सांगितले. एअरटेल कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर ते हिंदीसाठी एक, मराठीसाठी दोन आणि इंग्रजीसाठी तीन असे बटण दाबा सांगतात. पण कोणतेही बटण दाबले तरी ते फक्त हिंदीतच बोलतात. एअरटेलच्या कोणत्याही गॅलरीमध्ये एकही मराठी भाषिक कर्मचारी नाही आणि आम्ही अशी मागणी केली आहे की मराठी भाषिकांना कामावर ठेवावे. मराठी भाषिकांना गॅलरीत ठेवावे. जर तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्हीही तुमचा आदर करणार नाही, अशी उघड धमकी अखिल चित्रे यांनी दिली.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी