
Maharashtra Covid update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट उभं राहताना दिसत आहे. कारण जगभरात पसरत असलेल्या जेएन१ व्हेरिएंटचे प्रकरण वाढत आहेत. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवल्या आहेत. कोविड-19 च्या JN.1 च्या 21 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, उप-प्रकार JN.1 च्या नवीन 21 प्रकरणांपैकी 19 गोव्यात नोंदवले गेले आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोविड यंत्रणा सुसज्ज ठेवावी असे आवाहन केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचं आवाहन केले आहे.
📍नागपूर#कोविड जेएन १ या व्हेरियंटचा जगभर प्रसार होत आहे. याअनुषंगाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड यंत्रणा सुसज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वे,त्रिसुत्रींचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री @mrhasanmushrif यांनी केले. pic.twitter.com/CgU8WOek6o
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 20, 2023
कोरोनाच्या नवीन प्रकरणांबाबत, नीती आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोनाने बाधित सुमारे 91 ते 92 टक्के लोक घरी उपचाराचा पर्याय निवडत आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले की, रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी ९२.८ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत, जे सौम्य आजाराचे संकेत देतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोना विषाणूचा JN.1 प्रकाराचा जास्त धोका नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र काम करावे लागेल, असे मांडविय यांनी बैठकीनंतर सांगितले.
#कोविड जेएन १ या व्हेरियंटचा जगभर प्रसार होत आहे. याअनुषंगाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड यंत्रणा सुसज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वे,त्रिसुत्रींचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री
यांनी केले.