Yuzvendra Chahal याला एकाच वेळेस 2 आजार, डॉक्टरांचा असा सल्ला, किती दिवस ऑफ फिल्ड राहणार?
Yuzvendra Chahal Illness : आपल्या फिरकीने फलंदाजांना गार करणारा टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या गार पडलाय.युझवेंद्र चहल याला एकाच वेळेस 2 आजारांचा सामना करावा लागतोय. युझीला नक्की काय झालंय? जाणून घ्या.

टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यासाठी गेली काही महिने फार संघर्षाची राहिली आहेत. युझवेंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. युझवेंद्रला संधी मिळाली तरी त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. तसेच युझवेंद्र गेल्या काही महिन्यांत क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे चर्चेत राहिला. युझवेंद्र चहल याचा घटस्फोट झाला. मात्र युझीने न खचता आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली. मात्र त्यानंतरही युझीला टीम इंडियात कमबॅकची प्रतिक्षा आहे. आता युझीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
युझीवर दुहेरी संकट
युझीला एकाच वेळेस 2 आजाराने ग्रासलं आहे. युझीला एकाच वेळेस डेंग्यू आणि चिकनगुनिया झाला आहे. त्यामुळे युझीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हरयाणा विरुद्ध झारखंड यांच्यातील अंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे. युझी या स्पर्धेत हरयाणाचं प्रतिनिधित्व करत आहे. युझीला याआधीच्या काही सामन्यांनाही मुकावं लागलं होतं. मात्र तेव्हा युझीच्या न खेळण्याामागील कारण स्पष्ट नव्हतं. मात्र हरयाणा टीम 18 डिसेंबरला अंतिम सामन्यासाठी मैदनात उतरल्यानंतर युझीच्या न खेळण्यामागील कारण स्पष्ट झालं.
युझीला डॉक्टरांचा असा सल्ला
युझीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्याला डेंग्यू आणि चिकनगुनिया झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. तसेच डॉक्टरांच्या विश्रांतीच्या सल्ल्यामुळे अंतिम सामन्यात खेळता येणार नसल्याचं चहलने स्पष्ट केलं.
युझीची एक्स पोस्ट
Wishing my team Haryana all the very best for the SMAT finals. I wished to be a part of the team but unfortunately I am down with dengue and chikungunya, which have really taken a toll on my health. The doctors have asked to focus only on rest and recovery. I’ll be back to the…
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) December 18, 2025
“सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी हरयाणा टीमला माझ्या शुभेच्छा. मला टीमचा भाग होणं आवडलं असतं. मात्र मी डेंग्यू आणि चिकनगुनियासह लढतोय. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मी लवकरच फिट होऊन मैदानात परतेन आणि बॉलिंग करेन”, असा विश्वास युझीने या पोस्टमधून व्यक्त केला.
युझीसाठी यंदाचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा हंगाम काही खास राहिला नाही. युझीला 3 सामन्यांनंतर बाहेर व्हावं लागलं. युझीला या 3 सामन्यांत टीमसाठी उल्लेखनीय अशी कामगिरी करता आली नाही. युझीला 3 सामन्यांमध्ये केवळ 4 विकेट्सच घेता आले.
युझीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दरम्यान युझवेंद्र चहल याने आतापर्यंत टीम इंडियाचं वनडे आणि टी 20i फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. युझीने 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच युझीने 80 टी 20i सामन्यांमध्ये 96 विकेट्स मिळवल्या आहेत.
