ट्रम्प यांनी भारताचं हे मॉडेल आता थेट अमेरिकेत केलं लागू, व्हाईट हाऊसमधून मोठी घोषणा, धक्कादायक निर्णय
मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी भारताचं मॉडेल आता थेट अमेरिकेत लागू केलं आहे, त्यांनी व्हाईट हाऊसमधून या संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मोफत योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये लोकांना मोफत धान्य वाटप योजना असो, की आरोग्य विम्यांतर्गत गरीब कुटुंबातील व्यक्तींचे मोफत उपचार असोत. सरकारच्या या योजनांची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत, जनधन योजना, मातृत्व वंदना योजना, जनधन योजना अशा विविध योजना सरकारनं देशभरात सुरू केल्या आहेत. बेरोजगार व्यक्तींसाठी देखील सरकारच्या काही योजना आहेत. केंद्र सरकारने तर या योजना सुरू केल्याच आहेत, मात्र प्रत्येक राज्य सरकारच्या देखील वेगवेगळ्या योजना आहेत, जसं की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना असेल, महिलांना एसटी प्रवासाच्या भाड्यात दिलेली सूट असेल या योजना प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत, आणि त्याचा फायदा हा तेथील सत्ताधारी पक्षांना निवडणुकीत देखील झाल्याचं पहायला मिळालं आहे. बिहार निवडणुकीपूर्वी तर सरकारने थेट तेथील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे. दरम्यान आता भारताचं हेच मॉडेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत लागू करण्यास सुरुवात केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेमधील 14.5 लाख सैनिकांच्या बँक खात्यामध्ये ख्रिसमसपूर्वी प्रत्येकी 1,776 डॉलर म्हणजे जवळपास 1.6 लाख रुपये जमा करणार आहेत. या योजनेला त्यांनी ‘वॉरियर डिव्हिडेंट’ असं नाव दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे, यामधून अमेरिकेला जो फायदा झाला आहे, त्या पैशांमधून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये अशा योजना सुरू करत असल्याचं बोललं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून या योजनेची घोषणा केली आहे, अमेरिकेत ख्रिसमच्या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी प्रत्येक सैनिकाच्या खात्यामध्ये ट्रम्प प्रशासन प्रत्येकी 1,776 डॉलर म्हणजे जवळपास 1.6 लाख रुपये जमा करणार आहे. अमेरिकेमध्ये पुढील वर्ष मिड टर्म निवडणूक होणार आहे, या निवडणुकीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी ट्रम्प अशा योजना सुरू करत असल्याचं बोललं जात आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे अमेरिकेत त्यांची लोकप्रियता प्रचंड कमी झाली आहे, ती पुन्हा मिळवण्यासाठी आता अमेरिकेमध्ये अशा योजना सुरू केल्या जाणार आहेत.
