Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, जगभरात भूकंप, भारतालाही बसणार मोठा हादरा
मोठी बातमी समोर येत आहे, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली असून, ज्याचा हादरला हा भारताला देखील बसण्याची शक्यता आहे.

जगभरात सध्या मोठ्या तणावाची स्थिती आहे. आशिया खंडामध्ये चीन आणि जपान आमने-सामने आले आहेत. दुसरीकडे चीनच्या समर्थनार्थ रशियानं देखील या वादात उडी घेतली आहे, काही दिवसांपूर्वीच चीन आणि रशियाच्या फायटर जेटनं संयुक्तरित्या पेट्रोलिंग केलं होतं, त्यानंतर अमेरिकेनं देखील जपानच्या समर्थनार्थ आपले बॉम्बर विमानं पाठवले होते. दुसरीकडे अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये देखील युद्धजन्य परिस्थिती आहे. रशिया आणि युक्रेनचं देखील युद्ध सुरूच आहे. आता अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात खळबळ उडून देणारा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आशिया खंडात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं आता थेट चीनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चीन वारंवार तैवानवर आपला हक्क सांगत आलेलं आहे. कोणत्याही देशानं तैवानचं समर्थन केलं तर चीन थेट आक्रमक भूमिका घेतो. जपानसोबत देखील हेच झालं आहे, जपानच्या पंतप्रधानांनी तैवानच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. त्यानंतर चीन आणि जपानमध्ये नव्या संघर्षाला सुरुवात झाली. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट तैवानसोबत तब्बल 11.1 अब्ज डॉलर किंमतीच्या शस्त्र सौद्याला मंजुरी दिली आहे, तैवानसाठी अमेरिकेचं सर्वात मोठं शस्त्र आस्त्र पॅकेज म्हणून या सौद्याकडे पाहिलं जात आहे, आणि विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय अशा परिस्थितीमध्ये घेतला आहे, जेव्हा अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे चीन आणि अमेरिकेमधील संबंध आता आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या शस्त्रास्त्र पॅकेज मध्ये आठ प्रकारच्या खतरनाक शस्त्रांचा समावेश आहे, दरम्यान जर भविष्यात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष वाढला तर त्याचा फटका हा भारताला देखील बसू शकतो, कारण चीन हे भारताच्या शेजारचं राष्ट्र आहे, आधीच तर बांग्लादेश, पाकिस्तान, आणि अफागाणिस्तान भारताच्या शेजारी असलेले हे राष्ट्र प्रचंड अशांत आहेत, त्यातच आता चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष वाढला तर तो देखील भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकतो.
