AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा.. मान्सूनची अपडेट काय?

मुंबईत सकाळीच काळे ढग दाटून गार हवा सुटली, जणू काही संध्याकाळचा अनुभव. राज्यात मान्सून उशिरा पोहोचल्याने चिंतेचे वातावरण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा केवळ 10% राहिल्याने पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे, तर पेरण्या खोळंबल्याने शेतकरीही हवालदिल आहेत.

Monsoon Update : मुंबईत दिवसाच संध्याकाळ? काळेकुट्ट ढग जमले, गार हवा.. मान्सूनची अपडेट काय?
मान्सूनची अपडेट काय ?Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 16, 2026 | 10:48 AM
Share

जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी अजून राज्यात पावसाचं आगमन झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. तर पेरण्या खोळंबल्याने बळीराजा टेन्शनमध्ये आला आहे. त्यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा केवळ 10 टक्केच राहिल्याने मुंबईकरांवरही मोठं संकट घोंगावू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आजचा दिवस वेगळाच ठरला आहे. मुंबईत 9 ते 10च्या सुमारास काही भागात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. त्यामुळे पाऊस येणार की काय अशी चिन्हे दिसत होती. दुपार किंवा संध्याकाळपर्यंत तरी पाऊस पडेल, अशी चर्चा सध्या मुंबईकरांमध्ये रंगली आहे.

आज सकाळपासूनच मुंबईचं हवामान ढगाळ आहे. सकाळी 9 ते 10च्या दरम्यान तर आकाशात काळेकुट्ट ढग जमले होते. गार वारा सुटला होता. ऐन सकाळीच संध्याकाळचा फील येत होता. गार वाऱ्यामुळे वातावरणात गारवा मिळाल्याने मुंबईकर सुखावले होते. पाऊस नसला तरी गारवा निर्माण झाल्याने उकाड्यातून सुटका झाल्याची भावना मुंबईकरांच्या मनात होती. तर काळे ढग दाटून आल्याने पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे आज छत्री आणायला हवी होती, अशा भावना मुंबईकर बोलून दाखवत होते. संध्याकाळपर्यंत तरी पाऊस येऊ दे रे बाबा , असं साकडंही मुंबईकर देवाला घालताना दिसत होते.

पावसाअभावी निम्मा जून कोरडाच

मुंबईपाठोपाठ पुणेकरही मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिकूल वातावरणामुळे एकीकडे मान्सूनचा प्रवास गेल्या आठवडाभरापासून कोकणातच रेंगाळत असताना पुण्यात यंदा पूर्व मोसमी पावसाने ही निराशा केली आहे. मान्सूनच्या आगमनाची संकेत घेऊन येणारा हा पाऊस यंदा जूनमध्ये बरसलाच नाही. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आयएमडी नोंदवही जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात 0 पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 2014 मध्ये पुण्यातील परिस्थिती नोंदवण्यात आली होती.

कधी बरसणार ?

दरम्यान, हवामान खात्याची नवी अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 4-5 दिवसात मान्सून अनेक राज्यात दाखल होणार आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये वादळ, अतिमुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. खासकरून 15 जून नंतर पश्चिम बंगाल, तेलंगना, ओडिशा, झारखंड आणि बिहार आदी राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे.

तर, आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकचा काही भाग आणि तेलंगना, ओडिशा, झारखंड, बिहारच्या काही भागात पावसाला अनुकूल वातावरण होणार आहे. या भागात लवकरच चांगला पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे.

Follow Us
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत