Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

विदर्भात भंडारा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती पाऊस वाढायला सुरुवात होईल. विदर्भात 27 जूनपर्यंत चांगला पाऊस बरसणार आहे. तेथे शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. मराठवाड्यातही परभणी, लातूर, बीड, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगरात पाऊस दाखल होईल.

Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
maharashtra rain update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 9:15 PM

Monsoon Update : उशिराने का होईना पण राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. मुंबई, कोकण यासारख्या भागात पावसाने आता हजेरी लावली आहे. येणाऱ्या काही दिवसात राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस पोहोचणार असून आता शेतकऱ्यांना लवकरच पेरणी करता येण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान, हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी आता पावसाच्या काही नव्या तारखा सांगितलेल्या आहेत. या तारखांना पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंजाद त्यांनी व्यक्त केला आहे. सोबतच काही ठिकाणी राज्यात अतिवृष्टी होणार असल्याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

आज म्हणजेच 23 जून रोजी सगळीकडे पाऊस सुरू झाला आहे. मी म्हटलं होतं की 21 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस 23 जूनपर्यंत वाढत जाईल, असे मी सांगितले होते. आज महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पाऊस झाला आहे. आता 24 जून, 25 जून, 26 जून रोजी तसेच 27 ते 30 जून या काळात राज्यात बऱ्याच भागात पाऊस पोहोचणार आहे. आता पेरणीयोग्य पाऊस झाल्यास पेरणी करायला हरकत नाही. परंतु जमिनीत पुरेसी ओल गेलेली असेल तरच पेरणी करावी. जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस राहणार आहे, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

तसेच, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस वाढत जाईल. 5 जुलैपर्यंत सर्व राज्यात पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहेत. दुष्काळ वगैरे काहीही पडणार नाही. 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. पुणे जिल्हा, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल. या पावसाळामुळे धरणात पाणी जमा व्हायला सुरुवात होईल. मराठवाड्यातील जायकवाडी, कोयना धरणात पाणी जमा होईल, असेही भाकित त्यांनी वर्तवले आहे.

विदर्भात भंडारा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती पाऊस वाढायला सुरुवात होईल. विदर्भात 27 जूनपर्यंत चांगला पाऊस बरसणार आहे. तेथे शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. मराठवाड्यातही परभणी, लातूर, बीड, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगरात पाऊस दाखल होईल. पुढच्या पाच ते सात दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथे आणखी 10 दिवसात चांगला पाऊस होईल. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, या परिसरातही 5 जुलैपर्यंत सगळीकडे पाऊस पडेल, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us