
राज ठाकरे काही माझे शत्रू नाहीत. पुढेही आमचे मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नव्हे राजकीय निरिक्षक म्हणून सांगतो की महापालिका निवडणुकीत सगळ्यात मोठं नुकसना राज ठाकरेंचं होईल – टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
ठाण्यातील खारीगावात प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना आमने सामने आलेत. राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजीत पवार यांच्या प्रचारादरम्यान अश्लील शिवीगाळ आणि इशारे करण्यात आले. प्रचारादरम्यान खासदार बाळ्या उपस्थित असताना अश्लील प्रकार घडला. धमकावून आणि शिवीगाळ केल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.
शिवरायांनी सुरत लुटली नाही. ते लुटारू नव्हते. त्यांना स्वारी केली. स्वराज्याचा खजिना मोघलांनी नेला होता. त्यांनी पत्र लिहिलं. त्यांनी तो आणला. शिवरायांना लुटारू म्हणणारे हे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत का ? असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उपस्थित केला .
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत तब्बल १८ बंडखोर उमेदवारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या आणि माघार न घेणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या १८ जणांना पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेतृत्वाच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली असून, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे. या बंडखोरीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या निलंबनाचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गट आणि अजित पवार गट युतीने मोठी ताकद लावली आहे. प्रभाग क्रमांक ३० (कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी) मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कर्वेनगर परिसरात जोरदार पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच स्थानिक समस्या जाणून घेतल्या. सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील विविध भागांमध्ये पदयात्रांचे आयोजन केले असून, राष्ट्रवादीच्या अष्टसूत्री जाहीरनाम्यातील आश्वासने त्या मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. भविष्यात राष्ट्रवादीचाच महापौर असेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे.
धाराशिव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावेळी सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी खुद्द दिग्गज नेत्यांचे नातेवाईकच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी नेत्यांच्या घराघरातून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनीही भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच शर्यतीत माजी मंत्री बसवराज पाटील यांनी आपले पुत्र शरण पाटील यांना मैदानात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. बड्या नेत्यांच्या या नातलगांमुळे जिल्हा परिषदेचा हा राजकीय संघर्ष आता अधिक धारदार आणि औत्सुक्याचा ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २१ मध्ये राजकीय वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी ३३ वर्षीय महिला डॉक्टरने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली?” असे म्हणत घरात बेकायदेशीर प्रवेश केला. यावेळी आरोपींनी महिलेशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला, तसेच चुलत सासरे आणि दिराला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र स्कूलजवळ काल रात्री १२:१५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत दुचाकींचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गेली ३५ वर्षे मी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केले, पण तिथे नेत्यांकडूनच कार्यकर्त्यांचे पाय खेचले जातात, असा खळबळजनक आरोप हेमलता पाटील यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीत अडवणूक केली जाते आणि अडचणीच्या वेळी नेते सोबत राहत नाहीत, म्हणूनच आपण अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या कामाची पद्धत लोकांना आवडते आणि सत्ता असेल तरच रस्ते, फ्लायओव्हर यांसारखी विकासकामे वेगाने होतात, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसमध्ये दुसऱ्या पक्षांचे लोक सक्रिय असून ते आपल्याच नेत्यांचे खच्चीकरण करतात, अशी टीका करत त्यांनी आता विकासासाठी नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे स्पष्ट केले.
कालची शिवतीर्थावरील सभा ही गेम चेंजर सभा आहे. ही सभा परिवर्तन करणारी आहे. शिवतीर्थ ओसांडून वाहत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण, यांचे विचार फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही, तर महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते. त्यांनी ते पाहिलं. कालचं भाषण तुफान होतं. आपला विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला आहे, असे संजय राऊत म्हणाले
जिजाऊ माताला अभिवादन करण्यासाठी आली आहे दरवर्षी सिंदखेडराजाला जाते मात्र यावर्षी इथे आली. ही लोकशाही आहे लोकशाहीत राहतात बस आणि मेट्रो सेवेचा जो शब्द आम्ही पुणेकरांना दिला आहेत तो 100% पाळण्यात येईल मेट्रो आणि बस यावरील तज्ञांकडून आम्ही सल्ला घेतलाय अभ्यास करून हा निर्णय घेतलाय पुणेकरांवर तुमचा आवाज अतिरिक्त बोजा पडणार नाही
अंबरनाथ विकास आघाडी अवैद्य , आमदार बालाजी किणीकर. अंबरनाथ विकास आघाडीचा व्हीप लागू होणार नाही. अंबरनाथ नगरपालिका मध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक
अमरावती महानगरपालिकेच्या प्रचार सभेत भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांचं वक्तव्य. भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटल्याने अपक्ष उमेदवारांना दिला आहे भाजपने पाठिंबा. भाजप सोबतच अपक्ष उमेदवारांना निवडून आणण्याचा मंत्री आकाश फुंडकर यांच्या कडून प्रचार.
चिपळूण शहरात आज सकाळी गजबजलेल्या चिंचनाका–बस डेपो मार्गावर दोन मोकाट बैलांमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली. बाजारपेठेकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर अचानक सुरू झालेल्या झुंजीमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
– राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंती निमित्त सिंदखेड राजा येथे जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिजाऊंच्या जन्मस्थळाला अभिवादन केल आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 706 गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राष्ट्रमाता जिजाऊंचा 428 वा जयंती सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. जिजाऊंचे जन्मगाव असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊ भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.. सकाळी लखोजीराव जाधव यांच्या वंशजाकडून विधिवत जिजाऊंची पूजा करण्यात आली आहे.. तर प्रशासनाचेवतीने शासकीय पूजा देखील या ठिकाणी घेण्यात आली आहे.. दिवसभर लाखो जिजाऊ भक्त याठिकाणी दाखल होत असतात.
उत्तरेकडून होणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीची लाट पसरलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पुणेकर अनुभवत आहेत… हवेतील आर्द्रतेमुळे दृश्य मानता ही कमी झालेली पाहायला मिळत आहे.
भयमुक्त मतदानासाठी कल्याण–डोंबिवलीत पोलिसांचा तगडा रूट मार्च काढण्यात आला. संवेदनशील भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लोगल्ली पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. 100 पेक्षा अधिक कर्मचारी, 25 अधिकारी, SRPF व दंगल नियंत्रण पथक सहभागी झालेले. कल्याण डोंबिवलीत 25 संवेदनशील परिसर व 125 संवेदनशील मतदान केंद्र असून या ठिकाणी मतदानाच्या दिवशी राहणार 24 तास कडक बंदोबस्त राहणार आहे. मतदारांनी भयमुक्त मतदान करावे पोलिसांचे मतदारांना आवाहन…
पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका मुकेश शहाणे यांच्यावर आहे. मुकेश शहाणे यांचा तिकीट कापून बडगुजर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली. मुकेश शहाणे बडगुजर यांच्या मुला विरोधात अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.स कधीकाळी गिरीश महाजनांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले मुकेश शहाणे पक्षाबाहेर पडले आहेत.
प्रचारासाठी दोन दिवस उरले तरी अद्याप एकही मोठ्या नेत्याची सभा नाही. इतर पक्षाने प्रचारासाठी मोठी ताकद लावली असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता दिसत आहे. नाशिक मधील काँग्रेस उमेदवार मोठ्या नेत्यांच्या प्रचाराच्या प्रतीक्षेत आहेत.
– नाशिक मध्ये आतापर्यंत एकनाथ शिंदे, ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्या झाल्या सभा
– नाशिक काँग्रेसमध्ये मात्र निवडणुकीच्या तोंडावर निराशा जनक चित्र
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे, तसेच प्रिंट मिडीयाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील. प्रचारासाठी शेवटचा रविवार ‘सुपर संडे’ ठरला. कल्याण–डोंबिवलीत उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. बाईक रॅल्या, पदयात्रा आणि घरोघरी भेटी देण्यात आल्या, तर दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची बदली बढती करताना राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राच्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांक अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल…