Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द..

Maharashtra News LIVE Updates In Marathi : गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ नऊ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे वाचण्यासाठी दिवसभर पॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग..

Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द..
| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 9:26 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 17 Jul 2026 09:40 AM (IST)

    म्यानमार मधील ओलिस ठेवलेल्या तरुणांच्याच्या सुटकेसाठी टास्क फोर्स

    बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे असणार मोहिमेची जबाबदारी. टास्कफोर्स मध्ये असणार एटीएस,आयबी चे अधिकारी. थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी ओलीस ठेवलेल्या राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी शासन आता ॲक्शन मोड मध्ये. राज्यातील सर्व तक्रारदार राज्यगृह विभाग व परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबी चे अधिकारी देखील असणार आहेत.

  • 17 Jul 2026 09:30 AM (IST)

    कर्जासोबतच्या विमा क्लेमवरून HDFC लाईफ आणि चोलामंडलमच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा

    मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विमा दावा नाकारल्याचा आरोप; पीडित कुटुंबाची फौजदारी तक्रार. केवळ एसएमएस पाठवून विमा क्लेम फेटाळल्याचा आरोप. पॉलिसीच्या अटी-शर्ती न सांगताच विमा विकल्याचा दावा. ग्राहक आयोगाच्या अंतरिम आदेशानंतरही कर्जवसुलीचा प्रयत्न?


  • 17 Jul 2026 09:25 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास रद्द. अकरा वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार. काल एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर आज एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती

  • 17 Jul 2026 09:20 AM (IST)

    आठ-नऊ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी…

    गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते नऊ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते…. पेरणी झाल्यानंतर भाताची पिके आणि पऱ्ह्यांना पावसाची नितांत गरज होती. मात्र, आज गोंदिया शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे…. काही भागात रिमझिम सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे…. जर येत्या काही दिवसांतही पावसाची साथ कायम राहिली, तर खरीप पिकांसाठी ही परिस्थिती लाभदायक ठरणार आहे…..

  • 17 Jul 2026 09:06 AM (IST)

    जालन्यात अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात घर दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केलाय,याप्रकरणी रील स्टार महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.महिलेने परतूर तालुक्यातल्या एका पीडित व्यक्तीला घर दाखविण्याच्या बहाण्याने जालन्यात बोलावून घेतले त्यानंतर 3 साथीदारांच्या मदतीने त्याला मारहाण करून त्याचे अश्लील फोटो काढत व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्या जवळ असलेले रोख 75 हजार आणि दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या लुटल्या होत्या.दरम्यान या प्रकरणी या टोळीच्या विरोधात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


  • 17 Jul 2026 08:49 AM (IST)

    ओडिशा – पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

    ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात 100 हून अधिक जखमी झाले तर दोन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रथयात्रेत 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते.

  • 17 Jul 2026 08:42 AM (IST)

    मनसेच्या मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची सकाळी होणार बैठक

    मनसेच्या मुंबई, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची सकाळी बैठक पार पडणार आहे. शिवतीऱथ येथे आज सकाळी 10 वाजता ही महत्वाची बैठक होणार असून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • 17 Jul 2026 08:38 AM (IST)

    गोंदिया – शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या मुलीवर कुत्र्यांचा हल्ला, मुलगी जखमी

    गोंदिया शहरात बेवारस मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.  सकाळी, शाळेत जाण्यासाठी घरासमोर उभ्या असलेल्या एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून तिला जखमी केले. मोकाट कुत्र्यांची दहशत शहरात पसरली आहे.

  • 17 Jul 2026 08:23 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर सुरूच

    नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वापरण्यात येत आहे.  जिल्ह्यात सव्वादोन लाखांहून अधिक नागरिक अजूनही टंचाईग्रस्त आहेत.  मुसळधार पावसानंतर नाशिकच्या पश्चिम भाग म्हणजे इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि कळवण तालुके टँकरमुक्त झाले. मात्र  पूर्व भागात अध्याप 70 हुन अधिक टँकरने पाणीपुरवठा  सुरू आहे.  येवला, नांदगाव आणि सिन्नर तालुक्यांत अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

  • 17 Jul 2026 08:14 AM (IST)

    खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

    राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वर्षा निवासस्थानी पार्थ पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले.  दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेत सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता पार्थ पवार हेही मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले.

  • 17 Jul 2026 08:12 AM (IST)

    तीन दिवस पुराच्या पाण्यात अडकलेल्या ‘टॉमी’ची थरारक सुटका

    मावळ तालुक्यातील भांगरवाडी येथे पुराच्या पाण्यात तीन दिवस घराच्या पत्र्यावर अडकलेल्या ‘टॉमी’ या पाळीव कुत्र्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली.  या बचाव मोहिमेदरम्यान टीमलाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.

    भांगरवाडीतील कालेकर यांच्या घरामागे पुराच्या पाण्यामुळे ‘टॉमी’ हा कुत्रा तीन दिवस पत्र्यावर अडकून पडला होता. पावसात भिजत तो सतत मदतीसाठी ओरडत होता. अखेर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

  • 17 Jul 2026 08:08 AM (IST)

    आईच्या कुशीतून ६ महिन्यांचा मुलगा गायब, कल्याण स्टेशनबाहेरील अपहरणाने खळबळ

    आईच्या कुशीतून ६ महिन्यांचा मुलगा गायब झाल्याचे उघड झाले. कल्याण स्टेशनबाहेरील थरारक अपहरणाने खळबळ माजली आहे.  दादरा नगर हवेली येथून आलेल्या महिलेला कल्याण कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाखाली झोप लागली. तेव्हाच चोरट्यांनी बाळाचे अपहरण केलं एवढंच नव्हे तर त्या महिलेचा मोबाईल फोनही लंपास केला.  पहाटे जाग आल्यानंतर बाळ बेपत्ता असल्याचे लक्षात येताच आईने आक्रोश केला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकल्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके सक्रिय झाली आहेत.  सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

  • 17 Jul 2026 08:04 AM (IST)

    विठुराया, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर ! केडीएमसीच्या नगरसेवकाने घातलं साकडं

    विठुराया, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री कर.. असं साकडं आषाढी वारीत कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी घआतल्याचं समोर आलं.  कुणाल पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

बोनस बियाणे व खते या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन केलेली पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे. बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता, पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन त्यांची तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. अर्नाळा येथील समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा शोध अद्यापही सुरूच आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर, अर्नाळा पोलीस , वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मागच्या 20 तासांपासून शोधमोहिम सुरू आहे. – नंदुरबार जिल्ह्यात दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर पेरणी केली; मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने उगवलेली पिके धोक्यात सापडली आहेत. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेटस या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Follow Us