Maharashtra News LIVE : काशीद बीचवर दुर्दैवी घटना, समुद्रात बुडून तरुण पर्यटकाचा मृत्यू, दुसरा थोडक्यात बचावला
Maharashtra News LIVE Updates : राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे आहे. नाशिकमध्ये मोठा पेच निर्माण झाला. आज गोकुळ गीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यादरम्यानच हालचालींना वेग आला.

राज्यात विधान परिषद निवडणुकीचे वारे आहे. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याकरिता मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, नाशिकमध्ये यश मिळाले नाही. नाशिकचा तिढा सुटताना दिसत नाहीये. गोकुळ गीते यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली. राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. मात्र, शेतकऱ्यांनी पेरण्या लगेचच करू नये, असे आवाहन करण्यात आले. जोरदार पाऊस राज्यात काही भागात सुरू आहे. इराणवर मोठा हल्ला अमेरिकेने केला आहे. इराणच्या अनेक महत्वाच्या भागात अमेरिकेचे हल्ले सुरू आहेत, ज्यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढण्याचे संकेत आहेत. गोकुळ गीते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. काल आमदार किशोर दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नाशिक विधान परिषद निवडणूक संदर्भात गोकुळ गीते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात
नागपुरात काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात
सकाळपासून उन्हाच्या ताडाख्यानंतर दुपारपासून ढगाळ वातावरण
सायंकाळ होताच हलक्या पावसाने लावली हजेरी
वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाला सुरुवात
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना दिलासा
-
नाशिक विधानपरिषदचा तिढा सुटला?
नाशिक विधानपरिषदचा तिढा सुटला?
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या घरी उदय सामंत यांची बैठक
बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
उद्या गोकुळ गीते नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याची शक्यता
-
-
केडीएमसीच्या स्थायी समिती बैठकीत गोंधळ
केडीएमसीच्या स्थायी समिती बैठकीत गोंधळ
स्थायी समिती सभापतींच्याच प्रभागातील नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर
नालेसफाईतील अनियमितता, गाळाची चुकीची विल्हेवाट आणि निकृष्ट कामांवरून प्रशासनाला धरलं धारेवर
संबंधित ठेकेदाराला सात नोटिसा बजावल्याने चक्क उपअभियंत्याला धमकी
सरकारी अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करा
स्थायी समिती सदस्यांची जोरदार मागणी
-
काशीद बीचवर दुर्दैवी घटना, समुद्रात बुडून तरुण पर्यटकाचा मृत्यू, दुसरा थोडक्यात बचावला
काशीद बीचवर दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रात बुडून तरुण पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण थोडक्यात बचावला. हे तरुण जळगावहून कामानिमित्त रायगडमधील काशिद बीचवर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण ताडपत्री विक्रेते होते. त्यापैकी एकाचा समृद्रात बुडून अंत झाला. तर दुसरा लाइफगार्ड आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला.
-
काही भागात पावसाला सुरुवात , नागपूरकर सुखावले
नागपुरात काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाला सुरुवात झालीय. रिमझिम पाऊस आल्याने उन्हामुळे त्रासलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून उन्हाच्या तडाख्यानंतर दुपारपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
-
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली : संगीता तिवारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या संगिता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्याव जोरदार हल्लाबोल केला आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाची गरीमा घालवली. खरं वस्त्रहरण तर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग पदाचे केले आहे, अशा शब्दात संगिता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांना सुनावलं आहे.
-
टीएमसीच्या बंडखोर खासदारांच्या नावांची यादी समोर
पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर तृणमूल काँग्रेसची पडझड सुरू झाली आहे. टीएमसीत काही खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यांची यादीच आता समोर आली आहे. टीएमसीच्या बंडखोर खासदारांमध्ये सयानी घोष, युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा यांची नावं असल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सेवा क्षेत्रातील मोकळ्या जागेवर अनधिकृत आच्छादन करणाऱ्या अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ने कारवाईचा बडगा उगारला आहे. वीरा देसाई मार्ग आणि न्यू लिंक रोडवरील चार हॉटेल्सची वाढीव बांधकामे जेसीबीने तोडण्यात आली.
-
गरज पडल्यास इस्रायल एकटाच इराणशी लढेल: नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला. गरज पडल्यास इस्रायल इराणविरुद्ध एकट्याने लढेल, असे त्यांनी सांगितले. नेतान्याहू यांनी इस्रायली संरक्षण दलाला (आयडीएफ) एकट्याने युद्ध जिंकण्याची रणनीती विकसित करण्याचे निर्देश दिले.
-
सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवू, राजू शेट्टी यांचा इशारा
शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबवावी अन्यथा सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्या आडवू, सभेत घुसून जाब विचारू,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
-
पंतप्रधान मोदी नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, गुरुवारी, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. “2047 पर्यंत विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास” ही या बैठकीची संकल्पना आहे.
-
जळगाव : बकरीसाठी चारा तोडताना लागला वीजेचा धक्का; 9 वर्षीय बालकाचा मृत्यू
जळगावच्या भडगाव तालुक्यातील कोठली येथे बकरीसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या कुणाल विलास भिल (9) या बालकाचा वीजवाहिन्यांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. आजी हिराबाई भिल यांच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
-
चंद्रपूर मान्सूनपूर्व पावसानंतर पुन्हा उष्णतेचा तडाखा, तापमानात वाढ
चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पावसाने विश्रांती घेताच पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढू लागला आहे. सकाळपासूनच कडक उन्हामुळे उष्णतेचे चटके जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवरही तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपट्टा, रुमाल, टोपी वापर करत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे जनजीवनावर परिणाम होत असून नागरिकांना आता मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.
-
वाशीम : लॉजच्या छतावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू…
वाशीम शहराच्या शिवाजी चौक परिसरातील एका लॉजच्या छतावरून एक व्यक्तीचा बाजूच्या छतावर पडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. वर्धा जिल्ह्यातील चार ते पाच जण काही या लॉजमध्ये कामानिमित्त थांबलेले होते. मात्र रात्रीच्या सुमारास यामधील मृतक आशीष शेळके हा लॉजच्या छतावर गेला आणि बाजूला असलेल्या 25 ते 30 फूट खालच्या छतावर कडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
-
सांगली : शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेक्षणाला तीव्र विरोध
सांगली जिल्ह्याततील विटा भागात शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणास तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोन सर्वेक्षण विटा जवळील भाग्यनगर नागेवाडी या गावात करण्याचा प्रयत्न पहाटेपासून करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर हे सर्वेक्षण थांबवण्यात आलं. दरम्यान ज्या भागांमध्ये दोन दिवस दोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला त्या भागामध्ये आज माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भेट देत कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी ऍड दीपक लाड आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे .
-
महाराष्ट्राच्या विकासातही मोदींचे मोठे योगदान : एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली असून देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासालाही त्यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व गती मिळाली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
-
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी विजेता सिकंदर शेख याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवर ही दुर्घटना घडली. अपघात इतका भयंकर होता की सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे.
-
पुणे महापालिका आणि विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी
पुणे महानगरपालिका तसेच मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून संपूर्ण परिसराला कडेकोट सुरक्षा कवच देण्यात आले आहे.
-
नेहरुंचं कर्तृत्व आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही- शरद पवार
“नेहरुंनी स्वातंत्र्याआधी देश संघटित करण्याचं काम केलं. नेहरुंचं कर्तृत्व आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही. पंडित नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली,” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.
-
ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाजासाठी आजवर काय केलं ते सांगावं- लक्ष्मण हाके
“माझा रोष हा वैयक्तिक छगन भुजबळ यांच्यावर नाही, पण ओबीसी समाजाचे जेवढे नेते आहेत त्यांनी ओबीसी समाजासाठी आजपर्यंत काय केलं हे त्यांनी सांगावं. मी मेलो तरी पिछे हटणार नाही, माझी भूमिका मी मांडतच राहणार. मी कुणाला घाबरत नाही. अजित पवार यांच्या मृत्यूपश्चात राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन साजरा करत आहेत, त्यांना शुभेच्छा. कायम ओबीसींवर अन्याय करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,” अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
-
अनिकेत तटकरे यांनी घेतली भरत गोगावले यांची भेट
अनिकेत तटकरे यांनी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची भेट घेतली आहे. विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरे भरत गोगावले यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी अनिकेत तटकरेंना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
-
‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत अनिल अंबानींविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला दिले आहेत. दोन स्विस बँक खात्यांमध्ये असलेल्या 814 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अघोषित निधीवर 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याच्या आरोपावरून, प्राप्तिकर विभागाने अंबानी यांच्यावर ‘काळा पैसा कायद्या’अंतर्गत खटला चालवण्याची तयारी केली होती.
-
सांगलीत पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
सांगलीत पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीडवळ सिकंदरच्या गाडीचा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर हायवेवर विठ्ठलवाडी इथं गाडीने डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गाडीत सिकंदर शेख होता की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हायवे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
-
सोलापुरातील संभाजी महाराज तलावात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
सोलापुरात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. संभाजी महाराज तलावात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. 130 कोटींच्या थकीत बिलासाठी शेतकरी हे आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार याठिकाणी दाखल झाले आहेत. उपोषणाची दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी हे आंदोलन करत आहेत.
-
दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत आंदोलन
दीपक केसरकर यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी आज सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. दीपक केसरकर हे निवडून आल्यानंतर गायब आहेत , ते मतदारसंघात सापडत नाही अशा पद्धतीचा आरोप यावेळी करण्यात आला.
-
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
सोलापूर : गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन सुरू आहे. मात्र पोलिसांकडून शेतकऱ्यांचा मोर्चा तलावाच्या अलीकडेच अडवण्यात आला. मात्र पोलिसांचा हा प्रयत्न धुडकावून लावू शेतकऱ्यांनी बॅरिकेटिंग तोडून तलावात उड्या घेतल्या. गोकुळ कारखान्याने 130 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याने मागील 17 दिवसापासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे.
-
महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान मोदींचा सिंहाचा वाटा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मोदींनी भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणली . महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान मोदींचा सिंहाचा वाटा आहे. सर्व क्षेत्रात पंतप्रधान मोदींचं भरीव योगदान आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं कौतुक केलं.
-
पुणे – महापौर कार्यालय बॉम्बे उडून देण्याचा धमकीचा मेल, तपासानंतर अखेर कामकाज पुन्हा सुरू
पुणे महानगरपालिकेतील महापौर कार्यालय बॉम्बे उडून देण्याचा धमकीचा मेल मिळाला होता. त्यानंतर पोलिसांकडून तसेच दोन शोधक बॉम्ब शोधक पथकाकडून महापौर कार्यालयात कसून तपास आणि चौकशी करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या मुख्य इमारती बाहेर काढून तब्बल दिड तास कसुन चौकशीन झाली. अखपे कर्मचारी पुन्हा पालिकेत परतले असून आता कामकाज सुरू झालं आहे.
-
उमरगा तहसील समोर भर रस्त्यामध्ये महिलेचे ठिय्या आंदोलन, मुख्य रोडवर ट्राफिक जाम
धाराशिव – उमरगा तहसील समोर भर रस्त्यामध्ये महिलेचे ठिय्या आंदोलन सुरू असून मुख्य रोडवर ट्राफिक जाम झालं आहे. वनिता बंकट वाडेकर असे आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी जमीन व घरावर अतिक्रमण केल्यामुळे ती हे आंदोलन करत आहे. मात्र यामुळे शहरातील तहसील कार्यालयासमोरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
पुण्यानंतर मुंबईच्या महापौरांना धमकीचा ई-मेल; गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी
पुण्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना धमकीचा ई-मेल आल्याची माहिती समोर आली आहे. या ई-मेलमध्ये महापौरांची गाडी आणि महापौरांचे केबिन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
-
जालना – माजी सरपंचाचा17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी सरपंचाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला ,याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी 4 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर,आरोपी असलेला माजी सरपंच फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून माजी सरपंच नवनाथ आयंदे विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दारात तब्बल 4 हजार रुपयांची तर चांदीचे दर तब्बल 11 हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 51 हजार 410 रुपये असून चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर आले आहेत.
-
शेतकऱ्याला कॅनमधून डिझेल विक्रीला बंदी, मात्र खाजगी गुत्तेदारांना पेट्रोल पंप चालकाकडून टँकर मधून डिझेल पुरवठा
शेतकऱ्याला कॅनमधून डिझेल विक्रीला बंदी, मात्र खाजगी गुत्तेदारांना पेट्रोल पंप चालकाकडून टँकर मधून डिझेल पुरवठा करण्यात येत आहे. धाराशिव शहरातील पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2000 लिटर पाण्याच्या टँकर मधून डिझेल सप्लाय करण्यात आला. डिझेल टंचाईच्या काळात खाजगी गुत्तेदाराला टँकर मधून डिझेल पुरवण्यात आलं. सरकारी परवानगी असल्याने नियमानुसारच आम्ही टँकर मधून डिझेल देत असल्याचा पंपचालकाने दावा केला.
-
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. श्री क्षेत्र देहू ते देहुफाटा मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा निर्माण झाला होता. वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा त्रास होऊ नये, तसेच पालखी मार्ग मोकळा व सुरक्षित राहावा यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर अतिक्रमणे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देहू ते देहुफाटा मार्गावरील अतिक्रमणांवर आता प्रशासनाचा हातोडा चालवला असून पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे
-
ण्यात भाजपच्या वतीने कोलबाड येथील जागमाता मंदिरात महाआरतीचे आयोजन
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची यशस्वी १२ वर्षे पूर्ण केली आहेत. भारताच्या राजकीय इतिहासात सलग सर्वात प्रदीर्घ काळ या पदावर राहणारे ते पहिलेच नेते ठरले असून, त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान कार्यकाळाचा विक्रमही मागे टाकला आहे. आज ठाण्यात भाजपच्या वतीने कोलबाड येथील जागमाता मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य उज्वल भविष्यासाठी ही महाआरती पार पडत आहे….
-
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना प्रत्युत्तर
जनतेचे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारकडे घेऊन जाण्याचे काम पोस्टमन म्हणून मी करतो. मला त्याची लाज वाटत नाही. 25-30 वर्षात त्यांची झालेली अधोगती पाहून ते वैफल्यग्रस्त झालेत.. मोहिते पाटील हे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढत असलेली ही निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2029 ला देखील पंतप्रधान राहतील. विधान परिषदेला आम्ही 500 पेक्षा अधिक मतं घेऊ… पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटिल यांनी प्रत्युत्तर…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीनिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली महाआरती
सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर मंदिरात आरती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2029 ला देखील पंतप्रधान राहतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या कालखंडात भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था झाली. यावेळी सोलापूर शहरातील सर्वच पदाधिकारी आरतीला उपस्थित होते.
-
भाजपमधील कौटुंबिक कलहाचा महाविकास आघाडीला फायदा होणार; उमेदवार महेश देशमुख यांचा दावा
बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी बीडमध्ये प्रचाराचा शुभारंभ करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत नेत्यांना डावलून आयात उमेदवाराला संधी दिल्यामुळे पक्षात अंतर्गत कलह वाढला असून, याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल, असा दावा त्यांनी केला.
-
मराठवाड्याला यंदा एल निनोचा मोठा फटका बसण्याची शक्यता
यावर्षी महाराष्ट्रात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले असून, याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनोमुळे यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील आणि उन्हाची तीव्रता अधिक असेल. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या न करता जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण होईल इतका चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, तसेच कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
-
खेडमध्ये शिव-पार्वती मंदिरात चोरी; पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्हीची तोडफोड
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निघोजे येथे एका प्रसिद्ध शिव-पार्वती मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, आपली ओळख लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीचे नुकसान केल्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-
जळगावच्या दोन मंदिरांतील चोरीचा छडा; ५६ हजारांच्या मुद्देमालासह अल्पवयीन मुलगा ताब्यात
जळगावच्या चाळीसगाव शहरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटीतील रोकड आणि दत्त मंदिरातील चांदीचा मुकूट व त्रिशूळ चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली रोख रक्कम, चांदीचा मुकूट आणि त्रिशूळ असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा अखेर यशस्वी तपास लागला आहे.
-
अमरावती विधानपरिषद निवडणूक: गायब असलेले काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख रुग्णालयात; आज होणार अँजिओप्लास्टी
अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीतून अचानक गायब झालेले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. निवडणूक ऐन रंगात आली असतानाच देशमुख अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत हर्षजीत देशमुख यांनी स्वतः ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला आणि आपण निवडणुकीतून माघार घेतली नसून आपला कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू असल्याचे स्पष्ट केले. “माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी रुग्णालयात भरती झालो आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आज त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे समजते.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन: दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण; प्रमुख नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अधिकृतपणे ध्वजारोहण करण्यात आले. पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा हा महत्त्वाचा वर्धापन दिन सोहळा आहे. या ऐतिहासिक प्रसंगी खासदार पार्थ पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांच्यासह दिल्लीतील पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वर्धापन दिनाचा मुख्य जाहीर सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे.
-
आमचे सर्व खासदार पक्षांसोबत, कुणीही कुठेही जात नाही – संजय राऊत
आमचे सर्व खासदार पक्षांसोबत, कुणीही कुठेही जात नाही. सर्व खासदारांशी आमचा संवाद सुरु आहे. ज्यांना जायचं ते गेले. सर्व खासदारांसोबत पक्षप्रमुखांचा संवाद सुरु आहे, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले
-
मी भाजपात सक्रिय नाही – गोकुळ गीते
“आधी बोलायचं आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही काही संस्कृती नाही. मी भाजपात सक्रिय नाही. माझे बंधू गणेश गीते भाजपात आहेत. त्यामुळे मी काम करत होतो” असं गोकुळ गीते म्हणाले.
-
शक्तीपीठ महामार्ग, ड्रोन सर्व्हेच्याआधी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त
शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास शेकडो पोलिसांचा बंदोबस्त नागेवाडी परिसरात तैनात करण्यात आला. या घडामोडींनंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-
माझ्या माघारीवरुन जळगाव निवडणुकीवर परिणाम होणार नाही – गोकुळ गीते
माझ्या माघारीवरुन जळगाव निवडणुकीवर परिणाम होणार नाही. जळगावचं चित्र एकतर्फी, भाजपकडे बहुमत आहे. इथले आमदार निष्क्रिय आहेत. जनभावना आहे, मी लढावं. मला फडणवीसांना भेटायचं होतं. पण मी शिंदेंना भेटणार असं गोकुळ गीते म्हणाले.
-
दराडेंच्या पुतण्याने आमचा बाप काढला – गोकुळ गीते
गोकुळ गीते आज एकनाथ शिंदे यांना भेटणार. विधान परिषद निवडणूक लढवण्यावर गोकुळ गीते ठाम. माझ्याकडे भाजपचं कुठलही पद नाही. दराडेंच्या पुतण्याने आमचा बाप काढला असं गोकुळ गीते म्हणाले.
-
सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना आणखी एक धक्का
सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश. रमेश हसापुरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे नेते असून यापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. मागील अनेक वर्षापासून ते काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होते.
-
भर दिवसा 35 हजार रुपये लुटले
इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्यावर भर दिवसा 35 हजार रुपये लुटले. ग्राहक सेवा केंद्र चालकाची 35 हजार रुपयांची रक्कम लंपास. इगतपुरीतील ग्राहक सेवा केंद्रात चोरीची घटना. बँक ऑफ बडोदा शाखेत भरणा करण्यासाठी ठेवलेली रक्कम चोरट्याने केली लंपास.
-
अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट..
काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख निवडणुकीतून अचानक गायब. नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची सूत्रांची माहिती. निवडणूक सोडून काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख अचानक रुग्णालयात भरती झाल्याने चर्चांना उधान. काँग्रेस कडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची शक्यता.
-
उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे निलंबन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी केली कारवाई. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या स्त्री रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला होता आरोप. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ तृप्ती राडकर यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी सौरभ जाधव यांना केले निलंबीत
-
गडचिरोली जिल्ह्यातील 50 गावे तीस तासांपासून अंधारात
गेल्या 30 तासापासून गडचिरोली जिल्ह्यातील दोन तालुक्यातील 50 गावांच्या विद्युत पुरवठा खंडित. अहेरी आणि सिरोंचा या दोन तालुक्यातील 50 गावांच्या संपर्क काल सायंकाळपासून खंडित झालेला आहे. आलापल्ली पासून सिरोंचा 66 KV विद्युत पुरवठा वादळ वाऱ्यामुळे जिमलगट्टा भागातून काल झाला होता खंडित. वादळामुळे या मोठ्या विद्युत पुरवठा लाईनचे पाच खांब पडल्यामुळे विद्युत विभागासमोरील विद्युत पुरवठा सुरू करण्यास मोठे आव्हान
-
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या 10 जणांवर कारवाई
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर मंदिर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. मंदिर परिसरात थुंकताना आढळलेल्या या व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंदिर संस्थानच्या विशेष पथकांकडून परिसरात नियमित गस्त घालून स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. थुंकणे, कचरा टाकणे व घाण करणाऱ्यांविरोधात मंदिर संस्थांकडून मोहीम आखण्यात आले आहे
-
म्हाडा घोटाळा प्रकरणातील दोन अधिकाऱ्यांना जामीन मंजूर
भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विपीन काजळे आणि नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना सशर्त जामीन. जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. दोघेही गेल्या महिनाभरापासून न्यायालयीन कोठडीत. तपासात सहकार्य करणे आणि साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटींवर जामीन मंजूर. प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शोध पथकाला न्यायालयाची मुदतवाढ
-
अंधेरीत श्वानाची निर्घृण हत्या, अभिनेत्री मंजिरी फडणीस आक्रमक
मुंबईतील अंधेरी परिसरात एका मुक्या श्वानाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मायकी’ नावाच्या या श्वानाच्या हत्येनंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
-
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील भारनियमन विरोधात मनसे आक्रमक
मोहोळच्या महावितरण कार्यालयावर मनसेचा ईशारा मोर्चा. मोहोळ शहरात सक्तीचे भारनियमन तसेच ग्रामीण भागात केवळ 2 तास वीज पुरवठा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी तसेच नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. दोन दिवसात विजपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयावर आणखी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.
-
गोकुळ गीते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
गोकुळ गीते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता. काल आमदार किशोर दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली होती भेट. नाशिक विधान परिषद निवडणूक संदर्भात गोकुळ गीते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता.