Maharashtra News LIVE : मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ, कालच्या तुलनेत AQI 137 वरुन थेट146 वर

Maharashtra News LIVE : मुंबईच्या हवामान फटाक्यांमुळे दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. आता कालच्या तुलनेत आज प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.

Maharashtra News LIVE : मुंबईच्या प्रदूषणात पुन्हा वाढ, कालच्या तुलनेत AQI 137 वरुन थेट146 वर
| Updated on: Nov 12, 2026 | 8:37 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 12 Nov 2026 08:45 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये एकाच वेळी दिसले पाच वाघ…

    अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये एकाच वेळी दिसले पाच वाघ…मेळघाट मधील अति कोर असलेला एका चेक पोस्ट जवळ रस्ता क्रॉस करत असताना या पाचही वाघांचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद….मेळघाट मधील शिक्षक हे परतत असताना त्यांच्या कारला हे पाचही वाघ आडवे आले असताना त्यांनी वाघांचे व्हिडिओ केली मोबाईल मध्ये कैद

  • 12 Nov 2026 08:40 AM (IST)

    नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापन सरकार नियुक्त सदस्यांकडे सोपवणे वैध

    नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापन सरकार नियुक्त सदस्यांकडे सोपवणे वैध, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्वाळा. निवडून आलेल्या प्रतिनिधींऐवजी सरकार नियुक्त सदस्यांची व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या तरतुदीला न्यायालयाची मान्यता. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमात २०२५ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्यांना आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार घोषित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही याचिकांमधून आव्हान


  • 12 Nov 2026 08:35 AM (IST)

    भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली.

    भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकावर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. मराठी सणाच्या दिवशी भोजपुरी गाणांचा ठेका, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महाराष्ट्राच्या सणाला मराठी गाणी सोडून भोजपुरी गाण्यांचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित झाला. ‘महाराष्ट्राला बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का?’ म्हणत मराठी माणसाने संताप व्यक्त केला.

  • 12 Nov 2026 08:25 AM (IST)

    नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात

    नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक महाकाय दरडीला जाऊन धडकला, ट्रक मध्ये आठ ते दहा जण प्रवास करत असल्याची माहिती. अपघातात एकाचा जागीच मृत्यू एक जण गंभीर तर आठ ते दहा जण किरकोळ जखमी. जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी केले दाखल

  • 12 Nov 2026 08:20 AM (IST)

    अखेर 24 दिवसानंतर फरार असलेले डॉ. भोजने दाम्पत्य अटकेत…

    अखेर 24 दिवसानंतर फरार असलेले डॉ. भोजने दाम्पत्य अटकेत…डॉक्टर वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांना अमरावतीच्या साईनगर अकोली परिसरातून केली पोलिसांनी अटक….नवजात बाळाला ३ लाख ५० हजार रुपयात विकत असल्याच्या डॉक्टर भोजने यांच्यावर आरोप…१५ ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलीची आपल्या दवाखान्यात प्रसूती करून ते बाळ दुसऱ्यांना विकत असल्याच कथित प्रकरण…


  • 12 Nov 2026 08:20 AM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांच्या बळींची मालिका

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांच्या बळींची मालिका सुरूच आहे. ताज्या घटनेत सावली तालुक्यातील बोरचांदली जंगलात महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मूल तालुक्यातील ताडाळा येथील महिला संगीता पेडुकर वय वर्ष 55 ही सावली तालुक्यातील शेत शिवारात कापूस वेचणीसाठी गेली होती. मात्र अचानक वाघाने हल्ला करत तिला ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

  • 12 Nov 2026 08:15 AM (IST)

    पाचोऱ्यात पहाटे चोरीचा थरार; नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार पसार

    पाचोऱ्यात पहाटे चोरीचा थरार; नागरिकांनी चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार पसार. समर्थ व्हॅली परिसरातील घरात पहाटे चार ते साडेचारदरम्यान चोरीचा प्रयत्न. घरातील सदस्य आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा जेरबंद. चोरट्याच्या खिशात आढळले सोन्याचे दागिने; अन्य ठिकाणीही चोरी केल्याचा संशय

  • 12 Nov 2026 08:10 AM (IST)

    बदलापुरात छटपूजेवरून राजकीय वातावरण तापले

    बदलापुरात छटपूजेवरून राजकीय वातावरण तापले. उल्हास नदीकाठी होणाऱ्या छटपूजेला मनसेचा विरोध

  • 12 Nov 2026 08:05 AM (IST)

    ऐन दिवाळीत अमूल दुधात प्रति लिटर चार रुपयाची दरवाढ

    ऐन दिवाळीत अमूल दुधात प्रति लिटर चार रुपयाची दरवाढ झाल्याने ग्राहकांनी व्यक्त केल्या संतप्त भावना….. सरकारने दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये दरवाढ करून ग्राहकांवर अतिरिक्त भार लादू नये: ग्राहकांची मागणी. गेल्या सहा महिन्यात अमूलने दुसऱ्यांदा दुधाच्या दरवाढ करून ऐन दिवाळीत अमूलचे दूध चार रुपयांनी महागल्याने ग्राहकांना दैनंदिन खर्चामध्ये सोसावा लागणार अतिरिक्त भार… मनोरंजनाच्या गोष्टीचे दर वाढवा मात्र दैनंदिन जीवनातील वस्तूंचे दर वाढून गरिबावर अन्याय करू नका

  • 12 Nov 2026 08:00 AM (IST)

    जुन्नर तालुक्यात ३,५५४ शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद

    राज्य सरकारच्या मिशन सुधार अभियान अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ३५५४ लाभार्थी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित राहणार आहेत. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ३५५४ जणांचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. दिवाळीनंतर तिसरा टप्पा तील उत्पन्न निर्धारित मर्यादित पडताळणी करण्यात येणार असून अंदाजे ४००० पेक्षा जास्त शिधापत्रिका धारकांचे रेशन बंद होणार आहे.

मुंबई महापालिकेने रॉकेट फोडण्यावर निर्बंध घातले असतानाही अनेक भागांत आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटताना दिसले.  रात्रीनंतर मुंबईच्या हवेचा निर्देशांक वाढलेला दिसला. मात्र, इतर वेळी दिल्लीशी स्पर्धा करणाऱ्या पातळीपर्यंत तो पोहोचला नसल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले. मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. आता काल मुंबईचा AQI 137 तर आजचा AQI 146 वर आला आहे. मुंबईतील देवनार सर्वात प्रदूषित ठिकाण असल्याचे समजत आहे. देवनार 214, शिवाजी नगर 208, नेव्ही नगर कुलाबा 201, बीकेसी 199,
मालाड पश्चिम 210, खेरवाडी 168, शिवडी 139, कांदिवली 174, चेंबूर 167, अंधेरी चकाला 192, घाटकोपर 168 आहे. यातच आता छठपूजेचा सणाची लगबग सुरु झाली आहे. मुंबईत छठपूजेवरुन वातावरण तापले आहे. छठपूजेच्या सणासाठी आता मुंबईतील लोकलच्या उद्घोषणा थांबवून छठपूजेची गाणी वाजवण्याचे आदेश सरकारने दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us