Maharashtra News LIVE : एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर वाढले..

Maharashtra News LIVE : महागाई दिवसागणिक वाढत आहे. याचा फाटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पडत असून, गृहिणींच्या महिन्याचं गणित बिघडत आहे. सोनं - चांदी, पेर्टोल - डिझेल सोबतच, भाजीपाल्यांचे दर देखील वाढले आग

Maharashtra News LIVE : एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर वाढले..
| Edited By: | Updated on: May 15, 2026 | 9:06 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 15 May 2026 09:40 AM (IST)

    राज्यात सर्वाधिक पेट्रोलचे दर अमरावतीमध्ये

    अमरावतीत पेट्रोलचे दर 108 रुपये 24 पैसे प्रति लिटर…तर डिझेल 94 रुपये 74 पैसे. मध्यरात्रीपासून अमरावतीमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर 3 रुपये 13 पैशांची वाढ. यापूर्वी अमरावती मध्ये पेट्रोलचे दर होते. 104 रुपये 11 पैसे…तर डिझेल 91 रुपये 63 पैसे. भारत आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ…

  • 15 May 2026 09:30 AM (IST)

    सोलापुरातही 3 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले

    पेट्रोल दर वाढल्यानंतर सोलापूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया. पेट्रोलचे दर वाढवल्याने आमच्या खिशाला झळ पोहचते. आम्हाला कमी पेट्रोल वापरण्यास सांगत असले तरी त्यांनी स्वतः देखील त्याचे पालन करावे. पेट्रोल वाढले असले तरी आम्ही गाडी ऐवजी सायकल वापरू. पंतप्रधानांनी सांगितले म्हणून मी सायकल वापरायला तयार

  • 15 May 2026 09:20 AM (IST)

    एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला

    एअर इंडियाने इंधनाच्या वाढत्या किंमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे दरमहा सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा मर्यादित केली आहेत. एअर इंडियाच्या विमानांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरावर झाला आहे. दिल्ली ते मेलबर्न दरम्यानचे तिकीट तब्बल २ लाख ७६ हजारांच्या घरात पोहोचले आहे. याशिवाय अनेक मार्गावरील तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

  • 15 May 2026 09:05 AM (IST)

    बेस्टच्या बसची धडक; वाहकाचा मृत्यू, मोठी खळबळ

    अंधेरी पश्चिम परिसरात गुरुवारी दुपारी बेस्टच्या चार बस एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात एका वाहकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची चौकशी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने एक समिती स्थापन केली आहे.

  • 15 May 2026 08:52 AM (IST)

    ठाण्यात सीएनजीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरांत तीन रुपयांनी वाढ

    ठाण्यात सीएनजीनंतर पेट्रोल डिझेलचे दर तीन रुपये ने वाढ झाली आहे… आजचे पेट्रोलचे 106 रुपये 73 पैसे तर डिझेलचे 93.23 पैसे दर दिसून येत आहे.. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे… तर काहींचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक गाड्या देखील महाग असल्यामुळे घेतलेल्या गाड्याचे काय करायचे … सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी अशी देखील मागणी यावेळेस वाहन चालकांनी केली आहे.

  • 15 May 2026 08:40 AM (IST)

    मुंबई महापालिकेकडून देवनार डंपिंग ग्राउंडवरील तब्बल २ कोटी टन कचऱ्याच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम

    कचरा व्यवस्थापनासाठी ६४८ कोटी रुपयांचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.  जैविक प्रक्रियेद्वारे कचरा निर्मूलनासाठी २,३६८ कोटी रुपयांचा बायोरिमेडिएशन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.  ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून दररोज ६०० ते १,८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.  प्रकल्पाचे काम चेन्नई एमएसडब्ल्यू प्रा. लि. कंपनीकडे सोपवले आहे. एमपीसीबीच्या मंजुरीनंतर प्रकल्पाचे टप्प्याटप्प्याने कार्यान्वयन सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन मोकळी करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे.  संपूर्ण बायोरिमेडिएशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३ ते १४ वर्षांचा कालावधी लागू शकतो…

  • 15 May 2026 08:30 AM (IST)

    मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ

    तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे दरवाढ करण्यात आली आहे.  फ्रेंच बीन्सचा दर २०० रुपये प्रति किलोवर; आठवडाभरापूर्वी १३०-१७० रुपये होता. हिरवी मिरची १०० रुपयांवरून १५० रुपये प्रति किलो. टोमॅटोचे दर दुपटीने वाढले; २५ रुपयांवरून ५०-६० रुपये प्रति किलो, लिंबू ५ ते ७ रुपये नग दराने विक्री, कोथिंबिरीच्या जुडीचे दर ४०-६० रुपये; यापूर्वी ३०-४० रुपये होते, पापडी आणि फ्लॉवरचे दर १००-१२० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले, गवार १२० ते १६० रुपये प्रति किलो दराने विक्री, वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक २०-३० टक्क्यांनी घटली आहे.  पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचे नुकसान झालं आहे.  वाहतुकीदरम्यान भाजीपाला लवकर खराब होत असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

  • 15 May 2026 08:25 AM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांचा एकाच वाहनातून प्रवास

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांनी  एकाच वाहनातून प्रवास केला आहे.  अक्कलकोट येथील केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी एकत्र प्रवास केला. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, भाजपा आमदार देवेंद्र कोठे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी  एकाच गाडीतून प्रवास केला.

     

  • 15 May 2026 08:20 AM (IST)

    गाडीचा धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड

    धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे गाडीचा धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड झाली. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जमावाकडून ईटकळ येथे मंगल कार्यालयात तोडफोड, गोंधळ, घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ईटकळ येथील स्थानिकाकडून बाहेरगावच्या वऱ्हाडी मंडळींना महिलांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटातील गोंधळ करणाऱ्या विरोधात नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 May 2026 08:15 AM (IST)

    वाहनांवर १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ अनिवार्य

    राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी; तसेच आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने वाहनांची ओळख अधिक सुरक्षित राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील एचएसआरपीच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • 15 May 2026 08:07 AM (IST)

    वसई किल्ल्यात मित्राचा मैत्रिणीवर प्राणघातक चाकू हल्ला

    वसई किल्ल्यात 21 वर्षीय तरुणीवर तिच्या मित्राने चाकू हल्ला केला आहे. आपल्या सोबत मैत्री असताना मैत्रीण दुसऱ्या सोबत ही मैत्री वाढवत असल्याच्या संशयावरून पहिल्या मित्राने मैत्रिणीला वसई किल्ल्यात बोलावून, तिच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 351 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला वसई पोलिसांनी अटक केले आहे. संचित डॉमाणिक बला ( वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून हा वसईच्या पाचूबंदर येथील रहिवासी आहे.

  • 15 May 2026 08:03 AM (IST)

    अंबरनाथमध्ये युतीवरून शिवसेनेतच अंतर्गत नाराजी

    अंबरनाथमध्ये युतीवरून शिवसेनेतच अंतर्गत नाराजी दिसत आहे. काहींनी निवडणुकीत भाजपसाठी काम केलं…’ असं वक्तव्य  सेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं आहे. भाजपने स्वतःहून युतीची मागणी करायला हवी होती. सेना-भाजप युतीवरून आता शिवसेनेतच मतभेद दिसून येत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडताना दिसत आहे. सोनं – चांदीनंतर आता इंधनांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल – डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असून मुंबई, पुणे, नागपुरात पेट्रोलच्या दरांनी 100 चा आकडा पार केला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 106.50 रुपये, पुण्यात 106.95 रुपये आणि नागपुरात पेट्रोलचे दर 107.18 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसताना दिसत आहे. एवढंच नाही तर, मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही भागात पाणीटंचाईमुळे शेतीवर परिणाम झाल्याने उत्पादनही घटले, ज्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतींवर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक 20 – 30 टक्क्यांनी घटली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशाच देशातील, परदेशातील, राजकीय, क्रिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…

Follow Us