Maharashtra News LIVE : दिशा सालियानचे वडील आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन देणार नोटीस

Maharashtra News LIVE : दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आज दिशाचे वडिल सतीश सालियन हे नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

Maharashtra News LIVE : दिशा सालियानचे वडील आदित्य ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन देणार नोटीस
Big Breaking
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 9:29 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Sep 2026 09:50 AM (IST)

    शिक्षकाच्या पदोन्नतीनंतर बदलीला विद्यार्थ्यांचा विरोध

    गोंदिया येथे जिल्हा परिषद शाळेसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. शिक्षकाच्या पदोन्नतीनंतर बदलीला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ‘सरांची पदोन्नती याच शाळेत करा’, विद्यार्थ्यांची मागणी आहे. शिक्षक परत येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा.

  • 19 Sep 2026 09:40 AM (IST)

    पाऊस नाहीच, आता लोडशेडिंगचाही शेतकऱ्यांना फटका

    धाराशिव जिल्ह्यात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात थोडेफार शिल्लक असलेल्या पाण्यावर पीक वाचवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, वीजपुरवठ्याच्या लोडशेडिंगमुळे उपलब्ध पाणीही पिकांना देता येत नसल्याची शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.


  • 19 Sep 2026 09:29 AM (IST)

    आर्वी मार्गावर तळेगाव शिवारात भीषण अपघात

    वर्धा येथील आर्वी मार्गावर तळेगाव शिवारात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  आयशर वाहन, डंपर, ट्रॅक्टरचा पहाटेच्या सुमारास अपघात घडला आहे.

  • 19 Sep 2026 09:20 AM (IST)

    आमदार बच्चू कडू आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट

    मागील काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि अनिल बोंडे यांच्यामध्ये टीकाटिपणी सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला बच्चू कडू यांनी हजेरी लावली.

  • 19 Sep 2026 09:15 AM (IST)

    नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

    नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. डांगराळे, शिंदे, रोकडपाडा परिसरात भूकंपाचे धक्के जाणले आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.


  • 19 Sep 2026 09:09 AM (IST)

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महत्त्वाचा निर्णय

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून पुढील ६ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गणेश मंडळांना देखावे खुले ठेवता येणार. आवाजाच्या मर्यादित ध्वनिवर्धक वापरास प्रशासनाची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यापासून अनेक अपडेट समोर येत आहेत. दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आज दिशाचे वडिल सतीश सालियन हे नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे.

पुढील काही दिवस राज्यात पाऊस दांडी मारणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मुंबईसह काही उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. फक्त मुंबईच नाही तर पुण्यातही पाऊस सुरू आहे.

लाखो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. आज गौरी-गणपती विसर्जन आहे. त्यानंतर उद्या म्हणजे रविवारपासून भाविकांची गर्दी वाढेल. लालबागचा राजा, जीएसबी तसच अन्य प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी नियमित मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी नियमित ब्लॉक उद्या रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us