Maharashtra News LIVE : रितेश देशमुख यांच्या भावाला जिल्हा बँकेचं अध्यक्ष बनवण्यावर भाजपला आक्षेप
Maharashtra News LIVE : भारतीय लष्कराच्या ‘टीम माउंटन ईगल्स’च्या 4 मायक्रोलाइट विमानांचे गुजरातमध्ये महामार्गावर यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ. 'विंग्स ऑफ व्हॅलर अँड युनिटी’ मोहिमेअंतर्गत अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवरील NH-754A वर प्रात्यक्षिक. गुजरातमध्ये महामार्गावरील किलोमीटर 946 ते 949 दरम्यान विमानांचे लँडिंग आणि उड्डाण.

LIVE NEWS & UPDATES
-
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय
उन्हाळी सत्राच्या परीक्षा 15 एप्रिल पूर्वी होणार. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय. विविध पदवी, पदवीत्तर अशा सर्व अभ्यासक्रमांच्या सुमारे 700 परीक्षांचा समावेश. अभ्यास मंडळ, तज्ञांची मते घेऊन लवकरच या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केल जाणार.
-
रितेश देशमुख यांच्या भावाला जिल्हा बँकेचं अध्यक्ष बनवण्यावर भाजपला आक्षेप
लातूर जिल्हा बँकेतील भाजप-काँग्रेसमधील वाद कायम. संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध देशमुख वादाचा नवा अंक. जिल्हा बँक अध्यक्ष पदावरील धीरज देशमुख यांच्या निवडीवर भाजपचा आक्षेप. धीरज देशमुख यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याचा आरोप.
-
दादर माहीम चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकल्यास मुंबई महानगर पालिकेकडून दंड ठोठावला जाणार. दादर आणि माहीम चौपाटीवर कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर आता मुंबई महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. चौपाट्यांवर सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 4 नंतर दोन ते तीन तास कर्मचारी तैनात राहणार. कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. स्थानिक रहिवाशांकडून अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याबाबत सातत्याने तक्रारी आल्यानंतर जी उत्तर वॉर्डने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही चौपाट्यांवर कर्मचारी तैनात केले जाणार असून, नियमावलीचे फलकही लावले जाणार आहेत. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, दादर येथील कबुतरखाना बंद झाल्यानंतर काही नागरिकांनी चौपाट्यांचा पर्याय निवडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ऑगस्ट 2025 मध्ये दादर कबुतरखाना बंद केल्यानंतर चौपाटी परिसरात कबुतरांची संख्या वाढली होती.