AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना – मंत्री विखे पाटील

| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 9:07 PM
Share

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या. आज सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेईल.

Maharashtra News LIVE : कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना - मंत्री विखे पाटील

LIVE NEWS & UPDATES

  • 29 May 2026 09:07 PM (IST)

    अंबरनाथ पालिकेत सेना-भाजप आमने-सामने 

    अंबरनाथ पालिकेत सेना-भाजप आमने-सामने

    मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून राजकीय संघर्ष पेटला

    भाजपने अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेनेकडून सुपारी राजकारणचा गंभीर आरोप

    अंबरनाथमध्ये महायुतीतच जुंपली, टीडीआर फायलीवरून सेना-भाजप आमने सामने

  • 29 May 2026 09:06 PM (IST)

    शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

    कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची निर्घृण हत्या

    जमिनीच्या वादातून गोळीबार आणि कोयत्याने वार करत 6 जणांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती..

    सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत कर्नाटक हद्दीतील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावातील घटना

    विजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून तपास सुरू

  • 29 May 2026 09:04 PM (IST)

    मालाडमध्ये बेस्ट बसच्या धडकेत 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    मुंबईतून एक दुर्दैवी बातमी समोर येते आहे. मालाड पूर्व भागातील आप्पा पाडा येथे बेस्ट बसची धडक बसल्याने एका 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  मालाड पूर्वेतील आप्पा पाडा परिसरात आज ही दुर्दैवी घटना घडली. बेस्टची बस रस्त्यावरून जात असताना 7 वर्षीय कार्तिक राजू धोत्रे या चिमुकल्याला बसची जोरदार धडक बसली, या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे.

  • 29 May 2026 05:45 PM (IST)

    मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे उपोषणावर ठाम

    ५८ लाखांच्या नावाच्या नोंदी आम्हाला नावानिशी दिल्या नाही तर उपोषणवर आपण ठाम राहणार असे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांच्यासमोर जरांगे यांनी हे म्हटले आहे.

  • 29 May 2026 05:35 PM (IST)

    शिंदे समितीच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत – राधाकृष्ण विखे- पाटील

    शिंदे समितीच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या आधीही दाखले दिलेले आहेत. १२ लाख दाखले आतापर्यंत दिले आहेत असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

  • 29 May 2026 05:17 PM (IST)

    कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना – मंत्री विखे पाटील

    कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांना भेटण्यास आल्यानंतर सांगितले आहे.

  • 29 May 2026 04:54 PM (IST)

    धाराशिव : 33 केव्ही सब स्टेशनच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन

    भूम तालुक्यातील अंजनसोंडा, गिरवली, सोन्नेवाडी आणि डोकेवाडी गावांमध्ये अनेक वर्षापासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. 30 के व्ही सबस्टेशन मंजूर होऊनही अनेक दिवसापासून हे काम प्रलंबित आहे, हे काम तात्काळ करून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

  • 29 May 2026 04:39 PM (IST)

    अमरावती : तिवसा तहसील कार्यालयावर काँग्रेसचे आंदोलन

    केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी तसेच सतत वाढणारी महागाई पेट्रोल डिझेल सीएनजी व इतर दरवाढीच्या निषेधार्थ अमरावतीच्या तिवसा तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं. यावेळी मेलोडी चॉकलेटचे वाटप करत सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

  • 29 May 2026 04:23 PM (IST)

    लासलगाव : बाजार समितीतून थेट शासकीय कांदा खरेदी सुरू होणार

    शासकीय कांद्याची खरेदी आता थेट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या निर्णयाचे व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आले असून सध्या नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सोसायट्यांमार्फत 15 रुपये 80 पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदी सुरू आहे. मात्र, या खरेदी प्रक्रियेमध्ये असलेल्या विविध जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना कांदा विक्री करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता थेट बाजार समितीतून शासकीय कांदा खरेदी सुरू होणार आहे.

  • 29 May 2026 04:05 PM (IST)

    वाशीम : विविध मागण्याकरिता मनसेचे रास्ता रोको आंदोलन

    वाशीम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी व दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,तसेच शेतकरी व दिव्यांगांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

  • 29 May 2026 01:55 PM (IST)

    अजित पवारांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहणार नाही- संजय राऊत

    अजित पवारांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहणार नाही. राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादावर राऊतांचा मोठा दावा. शरद पवारांपासून अजितदादांना तोडल्याचा भुजबळ, तटकरेंना पश्चाताप झाला असेल- राऊत

  • 29 May 2026 01:45 PM (IST)

    अर्थखातं आमच्या पक्षाचं, लवकरच आम्हाला दिलं जाईल-उमेश पाटील

    अर्थखातं आमच्या पक्षाचं, लवकरच आम्हाला दिलं जाईल. लवकरच अर्थखातं मिळेल अशी आम्हाला अपेक्षा.  दादांच्या निधनानंतर खातं मुख्यमंत्र्यांकडे तात्पुरतं दिलं होतं-उमेश पाटील

  • 29 May 2026 01:30 PM (IST)

    संभाजीनगरच्या ढोरकीनमध्ये शेतकरी महिलेचं पाण्याच्या टाकीवर आंदोलन

    संभाजीनगरच्या ढोरकीनमध्ये शेतकरी महिलेचं पाण्याच्या टाकीवर आंदोलन. सातबारा फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन. तहसील कार्यालयाच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोभा कुदळे यांच आंदोलन

  • 29 May 2026 01:15 PM (IST)

    रोहित पवारांकडून पुणे पोलिसांचा व्हिडीओ शेअर

    रोहित पवारांकडून पुणे पोलिसांचा व्हिडीओ शेअर. पोलीस वसूली करत असल्याचा रोहित पवारांचा दावा. ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा तेच वसूली करतायत- रोहित पवार

  • 29 May 2026 12:56 PM (IST)

    पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर अपघात, 2 गंभीर जखमी

    पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर पोलीस व्हॅन आणि दुचाकी व कारची धडक होऊन मोठा अपघात झाला. आरोपीला घेऊन येणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात झाला असून यात 2 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 29 May 2026 12:50 PM (IST)

    शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये वृद्धाला आली भोवळ

    बीडच्या केज येथे शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी आलेल्या एका वृद्धाला उष्णतेमुळे अचानक भोवळ आली. यानंतर गर्दीतून त्याला बाजूला काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान संवाद मेळाव्याची बैठक देखील बंदिस्त हॉलमध्ये असल्याने शिवसैनिकांना देखील उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला.

  • 29 May 2026 12:47 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – थोड्याच वेळात विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

    छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात बैठक होणार . मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाचा मंत्री विखे पाटील आयुक्तांकडून आढावा घेणार आहेत.  राज्य सरकारने वाटप केलेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राची जरांगे पाटलांना मंत्री विखे पाटील माहिती देणार आहेत.

  • 29 May 2026 12:37 PM (IST)

    पुण्यात विषारी दारमुळे 15 लोकं मेली, त्याला पोलिस जबाबादार – रोहित पवार

    हडपसरमध्ये पोलिस स्टेशनपासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते. ती विषारी दारू तिथे बनवली गेली, आता पोलिस स्टेशनच्या जवळ जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील, आणि पोलिस झोपत असतील तर लोकांनी काय समजायचं ?असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी विचारला.

    म्हणजे पोलिसांच या घाणेरड्या धंद्याला कुठे ना कुठे पाठिंबा आहे. तिथे 15 लोकं मेली, त्याला पोलिस जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

  • 29 May 2026 12:23 PM (IST)

    छ. संभाजीनगर – जलसंपदा विभागाची कार्यालयं नाशिक – अहिल्यानगरला हलविण्याच्या निर्णयावरून वाद

    छत्रपती संभाजीनगर –  जलसंपदा विभागाची 5 महत्त्वाची कार्यालये नाशिक – अहिल्यानगरला हलविण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे.   मराठवाड्यातील सिंचन अनुशेष कायम असताना कार्यालयांचे स्थलांतर; जलतज्ज्ञांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

    आज कार्यालयं पळवली, उद्या पाणीही पळवतील” असा गंभीर आरोप करण्यात येत आहे.  स्थानिक लोकप्रतिनिधी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडावा असं आवाहन डॉ. शंकरराव नागरे यांनी केलं आहे.

  • 29 May 2026 12:12 PM (IST)

    नांदेड – इंधन दरवाढ आणि इंधन तुटवड्या विरोधात काँग्रेस आक्रमक

    नांदेड – इंधन दरवाढ आणि इंधन तुटवड्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील आयटीआय चौकात काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे आंदोलन सुरू,  भर रुस्त्यावर चुलीवर स्वयंपाक बनवला. बैलगाडीत दुचाकी टाकून आंदोलन सुरु आहे.

  • 29 May 2026 12:05 PM (IST)

    दिल्ली दौऱ्यानंतरही महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम

    दिल्ली दौऱ्यानंतरही महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम आहे.  छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजपने दावा केला आहे. फडणवीस शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही संभाजीनगरचा तिढा सुटेना. संभाजीनगरच्या जागेबाबत प्रदेश नेतृत्वाची शीर्षस्थ नेत्यांसमोर आग्रही भूमिका आहे.

  • 29 May 2026 11:57 AM (IST)

    समृद्ध पंचायतराज अभियानातून वाघोलीला बाद केल्याने ग्रामस्थ संतप्त; शेवगाव पंचायत समितीसमोर लेझीम खेळत अनोखे आंदोलन

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या परीक्षण अहवालातून वाघोली गावाला चुकीच्या पद्धतीने गुणांकन करून बाद करण्यात आल्याने ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. याआधी ‘माझी वसुंधरा अभियानात’ सलग तीन वर्षे प्रथम पुरस्कार पटकावणाऱ्या वाघोली गावासोबत झालेल्या या अन्यायाविरोधात महिला, मुलांसह ग्रामस्थांनी अहिल्यानगरच्या शेवगाव पंचायत समितीसमोर अनोखे आंदोलन सुरू केले आहे. हातात निषेधाचे फलक घेऊन आणि लेझीम खेळत मूल्यांकन समितीचा निषेध नोंदवणाऱ्या ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे; प्रशासनाने या प्रकरणात तातडीने दखल घेऊन योग्य न्याय न दिल्यास काही वेळातच सामूहिक मुंडन करण्याचा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे.

  • 29 May 2026 11:47 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरण: फॉरेन्सिक टीम दापोडी पोलीस ठाण्यात दाखल; कुणाचीही गय न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, या गुन्ह्यातील ठोस पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची (FSL) विशेष टीम दापोडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या टीमकडून विषारी दारूचे सॅम्पल ताब्यात घेतले जात असून, केमिकल ॲनालिसिसद्वारे दारूमध्ये कोणत्या घातक रसायनांचा वापर करण्यात आला होता, याचा छडा लावला जाणार आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतली असून, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रॅकेटमधील कोणत्याही दोषीची गय न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे थेट आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कर्नल सिंग विरखा, त्याचा मुलगा आणि योगेश वानखेडेसह ८ आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात असून, फॉरेन्सिक तपासातून या रॅकेटचे अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 29 May 2026 11:37 AM (IST)

    धाराशिव-बीड-लातूर विधान परिषदेसाठी हालचालींना वेग; भाजपकडून 4 नावांची दिल्लीत शिफारस

    धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या ४ प्रमुख नेत्यांची नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील-निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांच्या नावांचा समावेश आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत दिल्लीतून अंतिम उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असून, तीन जिल्ह्यांतील राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांतील ९८८ मतदार २९ मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार असून, २२ जून रोजी लागणाऱ्या निकालावरच या जागेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

  • 29 May 2026 11:27 AM (IST)

    गोंदियात नवतपाचा कहर! पारा 46.1 अंशांच्या पार, सूर्य ओकतोय आग अन् रस्ते पडले ओस

    नवतपाच्या पाचव्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात उष्णतेने रौद्ररूप धारण केले असून जिल्ह्याचे तापमान तब्बल ४६.१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सकाळपासूनच सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने आणि दुपारच्या वेळी वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गोंदियावासी उकाड्याने प्रचंड हैराण झाले आहेत. या कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत बाजारपेठा, चौक आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका मजूर, शेतमजूर आणि वाहनचालकांना बसत असून नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर हवामान विभागाने पुढील काही दिवस हा उष्णतेचा तडाखा असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • 29 May 2026 11:17 AM (IST)

    जळगाव सराफ बाजारात मोठी उसळी, सोन्याचे दर 1.59 लाखांवर, तर चांदी थेट 2.76 लाखांच्या पार

    सुवर्णनगरी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी गरुडझेप घेतली आहे. बाजारात सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची घसघशीत वाढ नोंदवली गेली. या दरवाढीमुळे आता जळगावात २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५९ हजार ६५० रुपये प्रति तोळ्यावर (१० ग्रॅम) पोहोचले आहेत. तर दुसरीकडे, औद्योगिक मागणी आणि जागतिक संकेतांमुळे चांदीचा दर जीएसटीसह २ लाख ७६ हजार ४० रुपये प्रति किलोच्या ऐतिहासिक पातळीवर गेला आहे. लग्नसराईच्या काळात झालेल्या या अचानक दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच कात्री लागणार आहे.

  • 29 May 2026 11:07 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड हादरले, विषारी दारू प्रकरणात कर्नल सिंग विरखा, मुलासह ८ आरोपींना अटक

    पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी कर्नल सिंग विरखा, त्यांचा मुलगा आणि योगेश वानखेडे यांच्यासह एकूण ८ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या जीवघेण्या विषारी दारूच्या साठ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास सुरू केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

  • 29 May 2026 10:45 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांना भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत यांचा समावेश नाही

    उदय सामंत यांचा आज सातारा आणि रत्नागिरी जिल्हा दौरा असल्याने उदय सामंत अंतरवाली सराटीमध्ये येणार नसल्याचे स्पष्ट. राधाकृष्ण विखे पाटील, बच्चू कडू, प्रसाद लाड यांच्यासह उदय सामंत देखील जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार असल्याची होती चर्चा. मात्र उदय सामंत यांचा शासकीय दौरा आल्याने उदय सामंत शिष्टमंडळामध्ये नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड जरांगे पाटील यांची भेट घेतील.

  • 29 May 2026 10:31 AM (IST)

    मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प

    मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प. कर्जत-खोपोली लोकल रद्द. शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकांदरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड. डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प. उद्यान एक्सप्रेस सह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबली. कर्जत-खोपोली लोकल बदलापूर रेल्वे स्थानकात रद्द.

  • 29 May 2026 10:10 AM (IST)

    ताब्यात घ्यायला या मग तुम्हाला कळेल – मनोज जरांगे पाटील

    ताब्यात घ्यायला या मग तुम्हाला कळेल. गोरगरीबांची मन कशी जिंकता येतील. त्यांच्यासाठी काय सुविधा देता येतील ते पहा. सरकार मराठा समाजाची अग्निपरीक्षा घेत आहे असं मनोज जरांगे पाटील बोलले.

  • 29 May 2026 10:09 AM (IST)

    माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे – मनोज जरांगे पाटील

    माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. सरकार मराठ्याबाबत भावनाशुन्य आहे का? हे मे महिन्याचं तळपत ऊन आहे. आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तडपडतोय. मी सावलीत बसू शकलो असतो. मी का भाजून घेतोय स्वत:ला?. सरकारला हे कळत नाहीय का? मराठा समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांना कळत नाहीय का?

  • 29 May 2026 10:05 AM (IST)

    आश्वसानवर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे का? – मनोज जरांगे पाटील

    सरकारच्या शिष्टमंडळाची रुपरेषा कशी आहे हे मला माहित नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार. 29 मे पूर्वी सर्व मागण्या मान्य करा असं आम्ही सांगितलं होतं. आश्वासन नको बाबा. आश्वसानवर माझ्या समाजाच्या लेकराचं पोट भरणार आहे का? उपोषण फायनल आहे. आधी तीन वर्ष आता 10 महिने थांबलो आहे असं मनोज जरांगे पाटील बोलले.

  • 29 May 2026 09:50 AM (IST)

    हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका पुन्हा एकदा सरसावली

    93 ठिकाणची पडताळणी 1एप्रिल ते 15 मे या काळात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण आणि शहर विकास विभागामार्फत करण्यात आली. नियम न पाळणाऱ्या 69 बांधकाम व्यवसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 428 ठिकाणी बांधकाम सुरू… निवासी बांधकाम होत असताना व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. पत्र्यांची भिंत उभारावी तसेच जाळीचे आवरण बसवावे…

  • 29 May 2026 09:40 AM (IST)

    नगर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत सभेत सदस्याला मारहाण

    ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे यांच्यावर हल्ला. सरकारी पाईपलाईन मुद्द्यावरून झाला वाद. सभेत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मारहाण. मारहाणीत हिंगे जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. तक्रार केल्याचा राग मनात धरून हल्ल्याचा आरोप. जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल… प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

  • 29 May 2026 09:30 AM (IST)

    भाजप नगरसेविका प्रीती सातम धमकीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    भाजप नगरसेविका प्रीती सातम धमकीसंदर्भात आज सकाळी ११:३० वाजता दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.गोरेगाव गोकुळ धाममध्ये उघड्यावर बकऱ्यांचा कुर्बानीवर बंदी घालण्याची मागणी होती. त्यानंतर बीएमसीने कुर्बानी देण्याची परवानगी रद्द केली. त्यानंतर प्रीती सातमला सोशल मीडियावर आणि फोनवर धमक्या येऊ लागल्या.

  • 29 May 2026 09:20 AM (IST)

    मुंबईतील बीकेसीमधील ५ एकर सिटी पार्कवरून नवा वाद

    बीकेसीतील कोट्यवधींच्या जागेचा सार्वजनिक वापर थांबवल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई यांनी गंभीर आरोप केलेयत. एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी पार्कचा वापर ‘खाजगी जागे’सारखा केल्याचा दावा त्यांनी केलाय. अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीच पार्क वापरले जात असल्याचा आरोप. सर्वसामान्य नागरिकांसाठी सिटी पार्कमध्ये प्रवेश बंद असल्याची तक्रार

  • 29 May 2026 09:05 AM (IST)

    विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीत मतमतांतर

    जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणूकीवरून शिवसेनेतील नेते, नगरसेवक आणि पदाधिकार्यांमध्ये नाराजी. अनेक जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये आमदार नगरसेवक आणि पदधिकार्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजी नगर आणि रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपलेली पहायला मिळाली. साताऱ्यात तर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा पाटील यांना झालेल्या धक्काबुकीचे पडसाद विधानसभेत उमटले

  • 29 May 2026 09:00 AM (IST)

    मेट्रो-५ची धाव आता उल्हासनगरपर्यंत

    मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत होणार आहे. सध्या काम सुरू असलेल्या मेट्रो-५ या सुमारे २२.३८ किमीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार मेट्रो-५ए ही विस्तारित मार्गिका सुमारे ११.८३ किलोमीटर लांबीची असणार असून, ती उल्हासनगरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे एकूण मार्गिका सुमारे ३४.२१ किलोमीटर लांबीची होणार आहे. त्यामुळे ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती मिळणार असून, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 29 May 2026 08:50 AM (IST)

    मोसंबीचा शेतकऱ्यांना दिलासा

    मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला विक्रमी 40 ते 50 हजार प्रति टन भाव मिळत आहे. आवक घटल्याने दरात वाढ, पाचोड बाजार समिती मोसंबीला भाव आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • 29 May 2026 08:40 AM (IST)

    धाराशिव बीड लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग

    भाजपाकडून चार जणांची नावे दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघासाठी भाजपने बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील-निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावे हायकमांडकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.पुढील दोन ते तीन दिवसांत दिल्ली हायकमांडकडून अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान 18 जून रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आ

  • 29 May 2026 08:30 AM (IST)

    देवरीत अवकाळी पावसाची रिपरिप

    गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आज सकाळच्या वेळी अवकाळी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काल गोंदिया जिल्ह्याचे तापमान तब्बल 46.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. दरम्यान, रब्बी धान कापणीला सुरुवात झाल्याने जोरदार पाऊस झाल्यास कापलेले धान भिजण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत.

  • 29 May 2026 08:20 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा

    28 मे 2026 रोजीच्या जिल्हा पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा 27 लाख 84 हजार लिटर होता. त्यापैकी 5 लाख 5 हजार लिटर विक्री झाली असून सध्या 22 लाख 79 हजार लिटर पेट्रोल शिल्लक आहे. तसेच 5 लाख 91 हजार लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये आहे.डिझेलचा एकूण साठा 24 लाख 68 हजार लिटर होता. त्यापैकी 9 लाख 88 हजार लिटर विक्री झाली असून सध्या 14 लाख 80 हजार लिटर डिझेल उपलब्ध आहे. तसेच 11 लाख 76 हजार लिटर डिझेल ट्रान्झिटमध्ये आहे. BPCL, HPCL आणि IOCL या तीनही कंपन्यांकडून इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 29 May 2026 08:09 AM (IST)

    31 मुलींचा शैक्षणिक खर्च उचलणार

    विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या हस्ते सोलापुरात अहिल्यादेवींच्या 51 पुतळ्यांचे वाटप आणि 31 मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. धनगरी महोत्सवाच्या निमित्ताने राम शिंदे यांनी धनगरी ढोल वाजवत कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश आणि विधान परिषद उमेदवारीवर त्यांनी प्रत्यक्ष भाष्य करणे टाळले. राम शिंदेंकडून सोलापुरातील देशी वृक्ष तोडीबाबतही कारवाई करण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

  • 29 May 2026 08:06 AM (IST)

    आज अंतरवाली सराटीत तोडगा निघणार?

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल होणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांची भेट घेतील. सरकारने त्यांच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी काय प्रक्रिया राबवली याची माहिती देण्यात येईल. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Maharashtra News LIVE : मराठा आरक्षणातील आश्वासन देऊनही प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. कालचा अल्टिमेटम संपताच त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. उद्यापासून मंडप न घालता भर उन्हात कडकडीत उपोषणाचा इशारा त्यांनी केला दिला. तर सरकार त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक असल्याचा दावा आमदार प्रसाद लाड यांनी केला. काल मुंबईत बैठकांचे सत्र सुरू झाले. आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मागण्यांवर सरकार दरबारी सुरू असलेल्या प्रक्रियांची माहिती देतील. तर राष्ट्रवादी पक्षातील धुसफूस पुन्हा समोर आली आहे. काल परवा सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता पार्थ पवार आणि भुजबळ असा सामना रंगल्याचे समोर येत आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा भुजबळांवर टीकेची झोड उठवली आहे. विधान परिषद निवडणूक जागा वाटपातील तिढा सुटण्याची चिन्हं दिसताच अनेक इच्छुकांनी दावेदारी समोर केली आहे. 2 जागेचा तिढा आज संपण्याची शक्यता आहे. तर राज्यात विदर्भासह काही भागात उष्णेतेचा कहर दिसत आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Published On - May 29,2026 8:05 AM

Follow Us
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल.
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न......
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर...
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.