Maharashtra News LIVE : डीजे विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरणार, विद्यानंद बापटही सामील होण्याची शक्यता

Maharashtra News LIVE : डीजे विरोधात पुणेकर आज रविवारी रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापटही सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News LIVE : डीजे विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरणार, विद्यानंद बापटही सामील होण्याची शक्यता
maharashtra live news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 9:19 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Sep 2026 09:22 AM (IST)

    मनोज जरांगे यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर पोहोचले

    मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांच पथक दाखल झाले आहे .  जरांगे पाटील यांच्या निर्णयाक आमरण उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे.  प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांचे पथक त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती करण्याची शक्यता आहे. परंतु डॉक्टरांच्या विनंतीला जरांगे पाटील प्रतिसाद देतात का, हे पाहावे लागेल.

  • 06 Sep 2026 09:10 AM (IST)

    पर्यटकांची पावले इगतपुरीकडे, सेल्फी पॉईंटजवळ तुफान गर्दी

    -आज रविवार वीकेंड असल्याने पर्यटकांची पावले इगतपुरीकडे वळली आहेत. सकाळपासून महाराष्ट्रासह इतर राज्यातून पर्यटक पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. पर्यटकांची इगतपुरीत अलोट गर्दी झाली आहे.  उंटदरी येथील निसर्ग सौंदर्याचा पर्यटक आनंद घेत आहे.  उंटदरीवर असलेल्या सेल्फी पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे .


  • 06 Sep 2026 09:01 AM (IST)

    कल्याणमध्ये एफडीएची नामांकित बेकरीवर मोठी कारवाई

    कल्याणमधील नामांकित प्रिन्स बेकरीवर एफडीएने धडक कारवाई केली. एफडीएने कारवाई करत बेकरी सील केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही एलपीजी, पाईप गॅस किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर न करता लाकडाच्या भट्टीवर पाव निर्मिती केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर लाकडाच्या भट्टीतून निघणाऱ्या धूर आणि प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. या  तक्रारींची दखल घेत प्रशासनाने कारवाई केली.

डीजे आणि स्पीकरच्या आवाजाविरोधात पुणेकर आज रविवारी रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौक ते पुणे महानगरपालिकेपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौक येथून मोर्चा निघणार असून महापालिकेच्या दिशेने जाणार आहे. डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट देखील मोर्चात सामील होण्याची शक्यता आहे. पुण्यातील लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचच्या वतीने मोर्चाचे करण्यात आयोजन करण्यात आलं आहे. यासहित मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्ताराची देखील चर्चा सुरू आहे. देशासहित महाराष्ट्रातील विविध घडामोडी जाणून घ्या

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us