Maharashtra News LIVE : राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षकांची मेगाभरती
Maharashtra News LIVE : फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षकांची मेगा भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. काल रात्री पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा व्हिडिओ शेअर करत तरुणाईला मोठे आवाहन केले.

LIVE NEWS & UPDATES
-
राज्यात ३० हजार जागांसाठी होणार शिक्षक भरती
११ ऑगस्ट पर्यंत अर्ज लॉक करता येणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी आस्थापना या मध्ये पवित्र पोर्टल द्वारे भरती होत आहे. जिल्हा परिषद १३ हजार ३५१ , महापालिका १९५४ , नगरपालिका आणि नगरपरिषद २८० आदिवासींचे विकास विभाग २४२१ खाजगी शिक्षण संस्था १२ हजार शिक्षकांची भरती करणार आहेत.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट
सूत्रांनुसार, मागील बैठकीत ठरल्यानुसार मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिला होता. ‘Gen Z’ आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू आहे सुनावणी, त्यामुळे मोदी- शिंदे भेटीला महत्त्व आले आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मोदी–शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.. बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
-
-
नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा परिणाम केवळ पेरण्यांवरच नव्हे, तर पीक विमा नोंदणीवरही झाल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी लागवड क्षेत्र घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पीक विमा भरण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत असून अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अपेक्षित प्रमाणात नोंदणी झालेली नाही. दुसरीकडे, ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीएससी केंद्रांवर पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने अनेक अर्ज अपूर्ण राहत असून, शेतीची कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. अंतिम मुदतीपूर्वी पोर्टल सुरळीत करावे किंवा आवश्यक असल्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
-
पोळा सणानिमित्त मातीचे बैल बनवण्यात कुंभार व्यस्त. यंदा मातीच्या बैलांच्या किमतीत होणार वाढ
पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना माती आणि पी.ओ.पी.पासून तयार होणाऱ्या पारंपरिक बैलांच्या विक्रेत्यांवर यंदा महागाईचे सावट आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मातीच्या टंचाईमुळे उत्पादन खर्च वाढल्याने कुंभार बांधवांनी बैलांना योग्य दर मिळण्याची मागणी केली आहे.धुळ्यातील पारंपरिक कुंभार कमला सीताराम मोरे यांनी सांगितले की, यंदा माती उपलब्ध न झाल्याने मातीच्या बैलांचे उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे पी.ओ.पी., रंग, प्लास्टिकची शिंगे आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्याने बैल तयार करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यामुळे लहान पी.ओ.पी. बैलांच्या जोडीला किमान ५० ते १०० रुपये, तर मोठ्या बैलांच्या जोडीला १५० ते २०० रुपये अधिक दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मातीच्या बैलांनाही योग्य भाव मिळाल्यास हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणे शक्य होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.महागाई आणि कच्च्या मालाच्या टंचाईमुळे कारागिरांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, नागरिकांनी स्थानिक कुंभारांकडून बैल खरेदी करून त्यांच्या कलेला आणि उपजीविकेला पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. -
कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील फोडाफोडीचा मनसेला फायदा
मनसे माजी आमदार राजू पाटील आणि शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांच्या नेतृत्वात पलावा कार्यालयात शेकडो पदाधिकाऱ्यांचा भव्य पक्षप्रवेश झाला. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीसह डॉक्टर आणि रुग्णांसाठी मनसेने नवीन ‘वैद्यकीय कक्ष’ ही सुरू केलेय भाजप खोटं हिंदुत्व गळ्यात मारून तरुणांचा वापर करते असा मनसे नेते राजू पाटलांचा भाजपवर घणाघाती प्रहार केला.
-
-
विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा
आठवडभराच्या विश्रांती नंतर नागपूर सह विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाने इशारा दिला. काही जिल्ह्यांना साधारण पावसाचा इशारा तर अकोला , अमरावती , यवतमाळ जिल्ह्याला ऍलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपुरात सकाळ पासून पावसाचं आणि ढगाळ वातावरण , काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरात पावसाने विश्रांती घेतली होती काही प्रमाणात तापमानात सुद्धा वाढ झाली होतीय पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणात उकाळा वाढला होता मात्र सकाळ पासून वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकळ्या पासून दिलासा मिळताना दिसून येत आहेय हा पाऊस शेती साठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे
-
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कामानसंदर्भात बैठक होईल. बैठकीत नाशिकच्या खड्ड्यांबाबत देखील मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बैठकीत शहरातील कॉलनी रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर होण्याची शक्यता आहे.महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त तसेच कुंभमेळा आयुक्त बैठकीला उपस्थित असतील.
Maharashtra News LIVE : राज्यात शिक्षकांची मेगाभरती होणार आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीची सुरू असलेली बैठक संपली. राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पुढील महिन्यात नवीन पक्ष हा देशातील तरुणाईशी संवाद साधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री इन्स्टावर पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला. त्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला. देशवासियांना स्वदेशी वापराचे आवाहन केले. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा इन्स्टावरून तरुणाईशी संवाद साधणार आहेत. उपमुख्तयमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे काल राज्य सरकारवर चांगलेच संतापले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डबल गेम केल्याचा आरोप केला. तर जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस यांच्यावरही त्यांनी आरोपांची राळ उडवली. आज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सुनेने आरोप केल्याप्रकरणी आज विनायक राऊत यांच्या खटल्यात निकाल येण्याची शक्यता आहे. आज भंडारा बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ दिसू शकतो. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.