Maharashtra News LIVE : नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम आंदोलन
Maharashtra News LIVE : नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरात असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.

LIVE NEWS & UPDATES
-
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91 वर्षाचा मंगलमय प्रारंभ व त्यांचा प्रेरणादायी जीवन कार्याचा सोहळा
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91 वर्षाचा मंगलमय प्रारंभ व त्यांचा प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतीचा उद्घाटन सोहळा आज सांगलीच्या आष्टामध्ये पार पडत आहे. या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जयकुमार गोरे, सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जंगी तयारी करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अण्णासाहेब डांगे यांना मानणाऱ्या अनेक मान्यवर देखील उपस्थित राहत आहेत.
-
मुलांना वाचवताना वडिलांचा तलावात बुडून मृत्य
बीड येथे धक्कादायक घटना घडली आहे. मुलांना वाचवताना वडिलांचा तलावात बुडून मृत्य झाला आहे. तिन्ही मुलांना बाहेर काढल्यानंतर वडिलांना पाण्याचा अंदाज आला नाही, ज्यामुळे वडिलांचा मृत्यू झाला… पोलीस आणि अग्निशमन दलाने मृतदेह पाण्यातून काढला आहे.
-
-
पुस्तकाचं ज्ञान असतं तर कायद्याच्या चौकटीत जरांगे बोलले असते – विजय वडेट्टीवर
धमक्या देणं चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काय ते मिळवा… पुस्तकाचं ज्ञान असतं तर कायद्याच्या चौकटीत जरांगे बोलले असते… जरांगेंनी पुस्तकातून नाही तर, आभाळातून ज्ञान आलं आहे.. असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
-
नाशिक-पुणे रेल्वेसाठी आज समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याची मागणी करण्यात आली. सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिक येथील नागरिक रस्त्यावर उतरून चक्कजाम आंदोलन करणार आहेत. आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे व आमदार सत्यजित तांबे सहभागी होणार आहेत. नाशिक पुणे मार्गावर आज आंदोलनामुळे वाहतूक कोंडीचे मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता… नाशिक- पुणे रेल्वे साठी सिन्नर संगमनेर चाकण येथे एकाच वेळी आंदोलन करणार आहेत.
-
UPI वापरासाठी कोणतेही शुल्क नसणार, वित्त मंत्रालयाचे स्पष्टीकरण
UPI वापरासाठी कोणतेही शुल्क नसणार आहे असं स्पष्टीकरण वित्त मंत्रालयाने दिलं आहे. सर्व व्यवहार पुर्णपणे मोफत असणार आहे… नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे…
-
-
प्रसाद लाड यांनी वातावरण केलंय, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे प्रसाद लाडच – लक्ष्मण हाके
मध्ये मध्ये जे लुडबूड करतात, उदय सामंत यांच्यापासून प्रसाद लाड यांच्यापर्यंत… यांना आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही टीका केली तर, मारहाण केली जाते… जरांगेंनी आई – बहिणीवरून शिव्या दिल्या त्यांना काहीच करणार नाही, हा कसला दुजाभाव.. हे वातावरण प्रसाद लाड यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे प्रसाद लाडच आहे…. असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं…
-
राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 526 शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस
राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 526 शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे. माहितीच्या अधिकारात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली आहे. या अनधिकृत शाळांपैकी 43 शाळा बंद करण्यात आले असून 155 शाळाविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहे तसेच 422 शाळांना दंड किंवा नोटीस बजावण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यासाठी मान्यता आणि ‘यू डायस’ क्रमांक घेणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून या शाळा चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधीक 452 शाळा मुंबई विभागातील आहेत
-
नवी मुबंईतील कोपरखैरणे रेल्वे स्थानकात महिलेची छेड
नवी मुबंईतील कोपरखैरणे रेल्वे स्थानकात महिलेची छेड एक हात नसलेला व्यक्ती काढत होता, हा व्हिडिओ सोशल मीडियावर viral झाला होता. वाशी लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या सहा तासात सदर इसमाला अटक केलीय. सदर व्यक्ती मनोरुग्ण आहें, अधिक तपास वाशी लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
-
परभणीत ॲम्बुलन्स न मिळाल्याने प्रसुती दरम्यान आईसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू
परभणीत ॲम्बुलन्स न मिळाल्याने प्रसुती दरम्यान आईसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परभणीच्या शासकीय रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूती दरम्यान गरोदर मातेची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी नांदेड येथे हलवण्याचा नातेवाईकांना सल्ला दिला होता. मात्र तीन तास ॲम्बुलन्स लेट झाल्याने आईसह बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. डॉक्टरसह रुग्णवाहिकेत चार ड्रायव्हर वर कारवाई करण्याची मयत महिलेच्या पतीने मागणी केली आहे.
-
नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन
नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आज चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आला आहे. चाकण पासून सिन्नर पर्यंत चक्काजाम केला जाणार आहे. नारायणगाव मधील GMRT चे कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गावर सत्यजीत तांबे करणार आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. यामुळे नाशिक पुणे महामार्ग वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
पुणे शहरामध्ये स्वच्छताग्रहांची अवस्था दयनीय
पुणे शहरामध्ये स्वच्छताग्रहांची अवस्था दयनीय झाली आहे. महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न आणखीच गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरात स्वच्छतागृह शोधण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. अनेक स्वच्छतागृहामध्ये दिवे नसल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणी वीज आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव जाणवत आहे.
-
जळगावातील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांच्याकडून पोलखोल
जळगावातील आकाशवाणीतील चौकातील खड्ड्यांच्या दुरुस्तीची पोलखोल भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी केली आहे. महापालिकेकडून खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी माती आणि मुरूम टाकून मलमपट्टी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नगरसेविका वैशाली पाटील यांनी स्वतः खड्ड्यांमधली माती उकरून दाखवत दुरुस्ती बद्दल अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत जाब विचारला. महापालिकेने 24 तासात शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे बुजवले नाही तर स्वखर्चाने काँक्रिटीकरण करून हे खड्डे बुजवू असा इशारा नगरसेविका वैशाली पाटील यांनी दिला आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात होणार चार जाहीर सभा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. सांगलीच्या आटपाडी कवठेमंकाळ, बोरगाव आणि कडेगाव येथे सभा होणार आहेत. जरांगे पाटील आज आटपाडी येथे त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी त्यांची जाहीर सभा आटपाडी मध्ये पार पडणार आहे. तर उद्या सकाळी कवठेमंकाळ तालुक्यात दौरा करून त्यांची सकाळी दहा वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे येथे मराठा समाजाच्या वतीने दुपारी तीन वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे जरांगे पाटील यांचे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.
-
मनसेतून भाजपात गेलेल्या वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर टीका
मुंबई – गोवा महामार्गाचं काम 97 टक्के पूर्ण, मग राज ठाकरे कशाची पाहणी करण्यासाठी येत आहेत? असा प्रश्न वैभव खेडेकर यांनी उपस्थित केला आहे. मनसेतून भाजपात गेलेल्या वैभव खेडेकरांची राज ठाकरे यांच्यावर टीका..
-
त्र्यंबकेश्वर खरोली रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या सलून व्यावसायिकाला मारहाण
मोटारसायकल बंद पडल्याने खरोली येथे रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक उभा होता. स्कॉर्पिओ चालकाने रस्त्याच्या मध्ये का उभा राहतोस? म्हणत वाद घातल्याचा आरोप होत आहे. वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कारमधून धारदार वस्तू काढून मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत सलून व्यावसायिकाच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले, मध्यस्थी करणाऱ्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहेत. दमदाटीनंतर गाडीचालक नाशिकच्या दिशेने गेला निघून, याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर; माणगाव बायपासची पाहणी करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. माणगाव बायपास आणि मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी राज ठाकरे करणार आहेत. महामार्गाच्या रखडलेल्या कामासह रस्त्याच्या सद्यस्थितीचा ते आढावा घेणार असून, यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांशीही चर्चा होणार आहे. राज ठाकरे ज्या ठिकाणी पाहणी करणार आहेत, या मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.
-
युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पोर्तुगालमध्ये विकले
युरोपमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून नागपूरच्या एका महिलेला पुण्यातील कथित कंपनी संचालकांनी चक्क पोर्तुगालमध्ये विकले. तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर या महिलेने स्वतःची सुटका करून घेत पुन्हा पुणे गाठले आणि नंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पीडित महिला २८ वर्षांची आहे. ती जॉब सर्चिग करीत असताना डिसेंबर २०२५ मध्ये इंस्टाग्रामवर पुण्यातील विमान नगर परिसरातील ‘वी मायग्रेट’ नावाच्या कन्सल्टन्सीची तिला माहिती मिळाली. संपर्क केल्यावर एजन्सीने तिला पोर्तुगालमध्ये कॅशिअरच्या नोकरीचे आमिष दाखवले. दरमहा १.५ लाख रुपये पगार आणि दररोज फक्त ८ तासांचे काम, असे सांगण्यात आले. नोकरीसाठी विविध प्रक्रियेकरिता तिच्याकडून टप्प्याटप्प्याने ११ लाख रुपये उकळण्यात आले. धक्कादायक म्हणजे, नंतर आरोपींनी तिची पोर्तुगालमधील एका बिअर शॉपच्या मालकाला विक्री केली. तिथे तिच्याकडून जबरदस्तीने नको ते काम करून घेण्यात आले. जेव्हा महिलेने याचा विरोध केला, तेव्हा मालकाने तिला ‘तुला खरेदी करण्यासाठी मी भारतातील एजंट्सना पैसे दिले आहेत’ असे सांगितले.. सध्या पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
-
मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा-मुलुंडसह सीएसएमटी-चुनाभट्टी, गोरेगाव-वांद्रे मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे. धीम्या लोकल जलद मार्गावर वळवणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
-
नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण मात्र पावसाचा जोर नाही
नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण मात्र पावसाचा जोर नाही. आज सकाळ पासून सुद्धा ढगाळ आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काही भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचं वातावरण बनल असलं तरी पावसाने उसंत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र पावसाची प्रतीक्षा नागपूरकर करत आहे.
-
पुण्यातील गुन्हे शाखेची पब वर कारवाई, पहाटेपर्यंत 3 पर्यंत सुरु होता पब
पुण्यातील गुन्हे शाखेची पबवर कारवाई करण्यात आली. पहाटे 3 पर्यंत पब सुरू होता. पुण्यातील विमानतळ जवळ असलेल्या हौज कम्युन नावाच्या पबवर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. पबमध्ये पार्टी करणाऱ्या ६२ जणांची चौकशी सुरू आहे.
-
नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे
नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे आले आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या घरांना तडे गेल्याची माहिती देण्यात आली. 4.3 रिश्टर स्केल पाच किलोमीटर खोल भूकंपाची नोंद करण्यात आली. रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी सुरगाणा तालुक्यात सह निफाड पेठ सुरगाणा देवळा त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरात भूकंपाचे धक्के जाणवले.
-
गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठी वाढ
गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस येत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यामध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणापैकी पुजारीटोला धरणाचे 6 गेट हे दीड फूट उंचीने सुरू करण्यात आले असून 2 गेट एक फूट उंचीने सुरू करण्यात आले आहेत. पाणीसाठ्यात वाढ झाल्यास पुन्हा धरणाचे गेट उघडण्यात येतील असे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले. तर कालीसरार धरणाची 4 गेट एक फूट उंचीने सुरू करण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला…. त्याचबरोबर इतर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत असल्याचे दिसून येते आहे….
-
पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची दखल राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली
पुणे विमानतळाच्या सुरक्षा हालचालींची दखल राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. विमानतळ लगतच्या परिसरात असणाऱ्या कचऱ्यामुळे हवाई सुरक्षेला निर्माण झालेला धोका आणि वाढता पक्षी व प्राण्यांचा वावर यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुढील आठवड्यात तातडीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. बैठकीला हवाई दल भारतीय विमान प्राधिकरण आणि पुणे महापालिकेच्या येथे नवल किशोर उपस्थित राहणार आहेत. विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापन आणि त्यामुळे होणारा हवाई सुरक्षेचा धोका कायमस्वरूपी कसा दूर करता येईल यावर बैठकीत ठोस निर्णय होण्याची शक्यता.
-
नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे केंद्रबिंदू गुजरातमध्ये ,नाशिक जिल्हा प्रशासनाची माहिती
गुजरात राज्यातील हतगडच्या डोंगरा रंगातील भणवड या ठिकाणी भूनकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहे. काल रात्री नाशिकमध्ये दहा वाजेच्या सुमारास जाणवलेल्या भूकंपाचे धक्क्यांची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल तर खोली पाच किलोमीटरची नोंद करण्यात आली आहे. नाशिकला लागूनच गुजरात राज्य असून गुजरात मधील काही भागासह नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्याची शक्यता वर्तवली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
नाशिकच्या सुरगाणा दिंडोरी तालुक्यातील घरांना भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे आले आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या घरांना तडे गेल्याची माहिती देण्यात आली. 4.3 रिश्टर स्केल पाच किलोमीटर खोल भूकंपाची नोंद करण्यात आली. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे केंद्रबिंदू गुजरातमध्ये असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध मनूदेवी मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि छत्री लंपास करण्यात आल्या. सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना उघडकीस आली. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.