Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी ॲक्शन मोडवर

Maharashtra News LIVE Updates: मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीनंतर नाशिकमधील सर्व संबंधित अधिकारी ॲक्शन मोडवर आहेत. कुंभमेळ्याच्या कामांसोबतच खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीच्यान प्रश्नावर प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार आहे.

Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी ॲक्शन मोडवर
लाइव्ह अपडेट्स
Image Credit source: Tv9
| Updated on: Aug 11, 2026 | 9:09 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 11 Aug 2026 09:40 AM (IST)

    धाराशिवच्या आठही तालुका कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन

    धाराशिव जिल्ह्यामध्ये कृषी निविष्ठेच्या घोटाळा प्रकरणांमध्ये निलंबित झालेल्या 15 कृषी अधिकाऱ्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी निलंबित झाले आहेत.यामुळे कृषी विभागाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. तालुक्याला कृषी अधिकारी नसल्याने मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांच्या योजनांसह पीक पाहणी, पंचनामे आणि अनुदानाच्या कामांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे

  • 11 Aug 2026 09:30 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात पोलिस दलाची धडक अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम

    जळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या शेकडो हातभट्टी व गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी. दारूबंदी कायद्यान्वये दाखल ८२ गुन्ह्यांत ८२ आरोपींना अटक करत २४ लाख १३ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत २२,०२३ लिटर गावठी दारू, रसायने जप्त करून जागीच नष्ट. शैक्षणिक संस्था व रुग्णालयाच्या ५० मीटर अंतराच्या आत असलेल्या ३१ पानटपऱ्या निष्कासित. चोरीचा माल खरेदी-विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यातील ११३ भंगार दुकानांची झाडाझडती

     


  • 11 Aug 2026 09:20 AM (IST)

    सिंहगड रोडवरील सुयोगश्री सोसायटी समोरील गाड्यांची तोडफोड नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

    पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणी वरती आला आहे सिंहगड रोडवरील आमची सोसायटी हा शांत परिसर आहे मात्र अज्ञात व्यक्तीकडून या ठिकाणी येऊन गाड्यांची तोडफोड करत अशांतता प्रस्थापित करण्यात आली
    पोलिसांकडून आरोपीला जबर वचक बसला पाहिजे आमच्या महिलांमध्ये तसेच मुलांमध्ये भीतीच वातावरण आहे.

  • 11 Aug 2026 09:07 AM (IST)

    सातपुड्यातील मोलगी-मनीबेली रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा जीवघेणा प्रवास

    जिल्ह्याच्या ठिकाणापासून १२५ किलोमीटर अंतरावरील रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष….मोलगी-मनीबेली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; दहा गावांचा दळणवळणाचा मार्ग धोक्यात….२००९ मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार झालेला रस्ता देखभालीअभावी उद्ध्वस्त…. रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने नागरिकांमध्ये संताप; आरोग्यसेवेसाठीही हालअपेष्टा….जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम….

  • 11 Aug 2026 08:54 AM (IST)

    वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचारी यांचा आज सकाळपासून संप

    वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचारी यांचा आज सकाळपासून संप सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. आज सकाळपासूनच परिवहन कर्मचारी संपावर गेल्याने सर्व परिवहनच्या बस आगारातच ठप्प झाल्या आहेत. इतर महापालिकांप्रमाणे परिवहन सेवेचं वेतन लागू करा, ओटी चालू करा, कामाचे आठ तास करा, यासह अन्य मागण्यासाठी परिवहन कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. परिवहनच्या संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत.


  • 11 Aug 2026 08:44 AM (IST)

    नाशिक- अवघ्या चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटचा रस्ता पुन्हा फोडल्याने नगरसेविका हेमलता पाटील आक्रमक

    नाशिक- अवघ्या चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटचा रस्ता पुन्हा फोडल्याने नगरसेविका हेमलता पाटील आक्रमक झाल्या आहेत. महापालिकेने काँक्रिटीकरण केलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरातील रस्त्याची चार महिन्यांतच पुन्हा स्मार्ट सिटीकडून खोदकाम करण्यात आलं. वर्षभर बंद असलेला रस्ता नुकताच सुरू झाला असताना पुन्हा काँक्रिट फोडण्याचं काम सुरू झालं. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्हीसाठी चेंबरचं काम सुरू असल्याचं समोर आलं आहे.

  • 11 Aug 2026 08:34 AM (IST)

    अमरावतीच्या धामोरी इथल्या हत्याकांडातील आरोपींची पोलिसांकडून धिंड

    अमरावतीच्या धामोरी इथल्या हत्याकांडातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. मृत राहुल रावेरकर यांच्या वाठोडा शुक्लेश्वर गावात आरोपी साहिल भगत आणि पियुष गायकवाड यांची गावकऱ्यांसमोर धिंड काढण्यात आली. आरोपीची धिंड काढत असताना संपूर्ण गाव एकत्र जमा झालं होतं. आरोपींची धिंड काढत असताना गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते. राहुल रावेरकर यांच्या हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 11 Aug 2026 08:24 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यात आज भाजपची तिरंगा यात्रा

    पुण्यात आज भाजपची तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी ४ वाजता फर्ग्युसन रस्त्यावरील ललित महाल हॉटेल पोलीस परेड ग्राउंड ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा डेक्कन इथपर्यंत रॅली असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक यांच्याकडून रॅलीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

     

  • 11 Aug 2026 08:23 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान व्हीआयपी दर्शन राहणार बंद

    नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवर देखील मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दिवसभरात ठरवून दिलेल्या वेळेत फक्त वीस अति महत्त्वाच्या व्यक्तींची दर्शन व्यवस्था होणार आहे.

  • 11 Aug 2026 08:20 AM (IST)

    नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त आक्रमक

    नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त आक्रमक झाले आहेत. खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांकडून 5 कार्यकारीसह 8 उपअभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसला सात दिवसात उत्तर द्या अन्यथा थेट राज्य शासनाकडे अहवाल पाठवणार, अशा इशारा देण्यात आला आहे. शहरातील खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत 6 जणांचा बळी गेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं आणि शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत. किमान 1 लेन सुरू होईल या अनुषंगाने 31 ऑगस्टपर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत एक लेन सुरू करण्याचं नियोजन आहे. त्र्यंबक रोडवरील कामेही वेगाने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्रातील आणि इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us