Maharashtra News LIVE : अंबरनाथमध्ये खड्ड्यांमध्ये पीपीई किट घालून ‘मूनवॉक’, मनसेचं अनोखं आंदोलन

Maharashtra News LIVE : आज कोर्टात पक्षाच्या चिन्हावर सुनावणी आहे. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत. आज भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला

Maharashtra News LIVE : अंबरनाथमध्ये खड्ड्यांमध्ये पीपीई किट घालून ‘मूनवॉक’, मनसेचं अनोखं आंदोलन
live updates
| Edited By: | Updated on: Aug 05, 2026 | 8:01 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Aug 2026 07:54 PM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरजवळ भरधाव यामाहा R15 रेलिंगवर आदळली. या अपघातात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

  • 05 Aug 2026 07:40 PM (IST)

    अंबरनाथमध्ये खड्ड्यांमध्ये पीपीई किट घालून ‘मूनवॉक’, मनसेचं अनोखं आंदोलन

    अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना अंबरनाथकरांचे दररोज मोठे हाल होत आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडीही होतेय. मात्र याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत मनसे शहर उपाध्यक्ष बबलू खान आणि प्रकाश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं आज उड्डाणपुलावर अनोखं आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी चक्क पीपीई किट घालून खड्ड्यांमध्ये मुनवॉक केला. हे खड्डे पाहून आपण जणूकाही चंद्रावरच आहोत, असा भास होत असल्यामुळे पालिकेचं या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन केल्याचं मनसेचे बबलू खान यांनी सांगितलं.


  • 05 Aug 2026 07:24 PM (IST)

    बोरिवली पोलिसांनी 130 हरवलेले व चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत केले

    मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळणे कठीण मानले जाते. मात्र, बोरिवली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल 130 मोबाईल शोधून त्यांचे मूळ मालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवले आहेत. सखोल तपास आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणांहून हे मोबाईल शोधून काढले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी बोरिवली पोलिसांच्या तत्परतेचे आणि प्रभावी तपासाचे कौतुक केले.

  • 05 Aug 2026 07:13 PM (IST)

    वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

    वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या पहायला मिळाला. फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर वारंवार पालिकेकडून तोडक कारवाई केली जात असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी शहरातील फेरीवाल्यांची बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 05 Aug 2026 06:57 PM (IST)

    सभागृहात चर्चा झाल्यास गृहमंत्री अमित शाह नक्कीच येतील: भाजप

    भाजप खासदार संबित पात्रा यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधी संसदेचे कामकाज रोखत आहेत. जर सभागृहात या विषयावर चर्चा झाली तर गृहमंत्री अमित शाह नक्कीच उपस्थित राहतील. संबित पात्रा यांनी प्रश्न विचारला की, राहुल गांधी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात का सहभागी होत नाहीत.


  • 05 Aug 2026 06:50 PM (IST)

    एकनाथ शिंदेंचा आजपासून तीन दिवस दरे गावात मुक्काम

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरहून कारने थेट दरे गावाकडे रवाना झाले आहे.तीन दिवस त्यांचा या गावात मुक्काम असणार आहे.

  • 05 Aug 2026 06:42 PM (IST)

    एसआयआरनंतर झारखंडने 43 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली

    मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी सांगितले की, एसआयआर अंतर्गत मतमोजणीच्या टप्प्यानंतर झारखंडमध्ये निवडणूक आयोगाने मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली तेव्हा 43 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

  • 05 Aug 2026 06:27 PM (IST)

    म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी उद्या जाहीर होणार

    म्हाडाकडून उद्या म्हणजेच 6 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 2640 घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने म्हाडाच्या घरांची लॉटरी लांबवणीवर पडली होती. आता घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

  • 05 Aug 2026 06:24 PM (IST)

    जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे: पंतप्रधान मोदी

    “कलम 370 आणि 35अ रद्द केल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विकास, सक्षमीकरण आणि घटनात्मक हक्क आणत एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये लिहिले, आणि या प्रदेशाच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त त्याच्या प्रगतीसाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

  • 05 Aug 2026 06:13 PM (IST)

    पंतप्रधानांच्या व्हिडिओ वादाबद्दल मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली

    मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी पंतप्रधानांच्या व्हिडिओ वादाबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी औपचारिक माफीनामा पाठवला आहे.

  • 05 Aug 2026 06:06 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याच्या विधेयकास मंजुरी

    संसदेने बुधवारी सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38पर्यंत वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. राज्यसभेने चर्चेनंतर ‘सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, 2026’ आवाजी मतदानाने परत पाठवले. लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केले आहे.

  • 05 Aug 2026 05:00 PM (IST)

    गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर नाशिक शहरातील खड्डे बुजवायला सुरुवात

    गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर नाशिक शहरातील खड्डे बुजवायला सुरुवात

    महापौर, उपमहापौर थेट रस्त्यावर

    ठेकेदारांकडून खड्डे बुजवून घेण्यास सुरुवात

    15 ऑगस्ट पर्यंत शहरातील सगळे खड्डे बुजवू असे गिरीश महाजन यांचे आश्वासन

    अधिकाऱ्यांना घेऊन महापौर उपमहापौर थेट रस्त्यांवर

  • 05 Aug 2026 04:50 PM (IST)

    जालना- छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

    :जालना ते छत्रपती संभाजी नगर या मुख्य महामार्गावर बदनापूर तालुक्यातल्या वरुडी परिसरात असलेल्या नूर हॉस्पिटल जवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झालाय,या अपघातामध्ये दुचाकी वर असलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.

  • 05 Aug 2026 04:30 PM (IST)

    राष्ट्रवादीचं काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

    उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ अशी वादग्रस्त टीका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज पुन्हा काँग्रेसच्या दादर टिळक भवन कार्यालबाहेर आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे, यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

     

  • 05 Aug 2026 04:15 PM (IST)

    विनायक राऊत विरुद्ध गिरिजा राऊत कौटुंबिक प्रकरणाचा निकाल उद्या

    विनायक राऊत विरुद्ध गिरिजा राऊत कौटुंबिक प्रकरण

    या प्रकरणाचा निकाल उद्या देण्यात येणार

    ठाणे कोर्टाने उद्या साठी राखून ठेवला निकाल

    विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला अटकेपासून संरक्षण मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष

     

     

  • 05 Aug 2026 03:50 PM (IST)

    काँग्रेसच्या दादर टिळक भवन कार्यालबाहेर कार्यकर्ते आक्रमक

    उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ अशी वादग्रस्त टीका केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज पुन्हा काँग्रेसच्या दादर टिळक भवन कार्यालबाहेर आक्रमक.

  • 05 Aug 2026 03:40 PM (IST)

    उल्हासनगरच्या नगरसेवकांची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली शाळा?

    ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून उल्हासनगरच्या नगरसेवकांची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ७०० कोटींचं कर्ज असताना ६५ लाखांचा दौरा केला. दौरे नको, विकासकामांकडे लक्ष द्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या नगरसेवकांना शिंदेंच्या सूचना.

  • 05 Aug 2026 03:30 PM (IST)

    सरनाईकांना केवळ आरोप करण्याची सवय- नरेंद्र मेहता

    नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईक यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास भाजप पूर्णपणे सक्षम, आरसीसी पुलाचे अर्धे काम पूर्ण, उर्वरित काम वेगाने सुरू. सरनाईकांना केवळ आरोप करण्याची सवय असे ते म्हणाले.

  • 05 Aug 2026 03:20 PM (IST)

    सुनेत्रा पवारांवरील ‘गुडिया’ टिप्पणीचा निषेध, अमृता फडणवीस यांची टीका

    बीड जिल्ह्यातील भव्य महाआरोग्य शिबिराला अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी या उपक्रमासाठी सुरेश धस यांचे आभार मानत, सुमारे 60 हजार नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतल्याचे सांगितले. तसेच सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीचा त्यांनी निषेध करत, महिलांबद्दल अशा प्रकारची भाषा अयोग्य असल्याचे म्हटले.

  • 05 Aug 2026 03:10 PM (IST)

    बाजारात डाळिंबाची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण

    नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळबाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने राज्यात डाळिंबाचे उत्पादन वाढले असून त्याचा परिणाम बाजारातील दरांवर झाला आहे. वाढलेल्या उत्पन्नामुळे डाळिंबाच्या किमतीत घसरण झाली असून ग्राहकांना तुलनेने स्वस्त दरात डाळिंब उपलब्ध होत आहे.

  • 05 Aug 2026 03:00 PM (IST)

    वाल्मिक कराडला बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवा

    मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे. न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी.आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

  • 05 Aug 2026 02:50 PM (IST)

    लातूर महापालिकेत भाजप-काँग्रेस आमनेसामने

    लातूर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा वादळी झाली, भाजपा आणि काँग्रेसचे नगरसेवक अनेक विषयांना एकमेकां समोर आलेले पाहायला मिळाले. एकमेकांच्या विरोधातील घोषणाबाजीने मनपा दणाणून गेला होता. प्रसंगी नियम बाजूला ठेवून पीडित कुटुंबांना मदत करा असा आग्रह भाजपा नगरसेवकांचा होता, याला विरोध करीत काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. सभागृह तहकूब झाल्या नंतर देखील भाजपा आणि काँग्रेसचे नगरसेवक घोषणाबाजीत दंग झालेले पहायला मिळाले.

  • 05 Aug 2026 02:40 PM (IST)

    जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची एकमताने बिनविरोध निवड

    जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली,तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निर्मला मरकड यांची निवड करण्यात आली.17 संचालक असलेल्या या बँकेत अडीच वर्षापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन पक्षाच मताधिक्य होत,अडीच वर्षापूर्वी अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ताब्यात होत.आता अडीच वर्षानंतर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आल आहे.दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकरांची निवड झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि सर्व स्थानिक आमदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आल.यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.

  • 05 Aug 2026 02:30 PM (IST)

    खड्डयात बसून आंदोलनाचा इशारा

    चेंबूरच्या श्रमजीवी नगरातील सर्विस रोडचे काम अर्धवट आहे. रस्त्यात पावसाने खड्डे पडल्याने समाजसेवकांचं खड्डयात बसून आंदलनाचा इशारा दिला आहे. चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक १५१ मधील श्रमजीवी नगर परिसराती नाल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याचे योग्य लेव्हलिंग न केल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याची स्थानिकांची तक्रार आहे. नागरिकांनी एम/पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तातडीने रस्त्याचे लेव्हलिंग व उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी केली.

  • 05 Aug 2026 02:20 PM (IST)

    हे टेंडर महापौर बंगल्यासाठी नाही-महापौर रीतू तावडे

    उबाठाच्या नेत्या आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा अद्याप काही मोह जात नाहीये असे दिसते आहे. किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर आता आदित्य ठाकरे यांच्याही बुद्धीची कीव यायला लागलीय. कामकाज कसे चालते हे माहिती घेऊन आदित्य ठाकरे यांनी बोलायला हवे होते. त्यांनी जो राडारोडा करून ठेवला आहे तो आम्ही निस्तरत आहोत. मीडियामध्येही आता फेक नरेटिव्ह पसरवले जात आहे. माझ्या हातात टेंडरची कॉपी आहे. महापौर बंगला हा हेरिटेज बंगला आहे आणि प्राणीसंग्रहालयाच्या आजूबाजूला आहे.हे टेंडर त्या प्राणीसंग्रहालयाच्या आजूबाजूला काम करण्यासाठी आहे. महापौर बंगला यात येत नाही. हे टेंडर महापौर बंगल्यासाठी नाही राणीच्या बागेचे उद्यान डिपार्टमेंटचे टेंडर आहे महापौर बंगल्याशी त्याचा अजिबात सबंध नाही, असे महापौर रीतू तावडे म्हणाल्या.

  • 05 Aug 2026 02:10 PM (IST)

    भूमिगत गटार योजनेमुळे धुळे शहरातील रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

    धुळे शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. विविध भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांसह चारचाकी चालकांची मोठी कसरत होत असून लहान-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. महापालिकेकडून खोदकामानंतर खड्डे योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रमुख रस्त्यावर भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. नागरिकांनी महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्त करून खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत आणि भूमिगत गटार योजनेची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशी मागणी केली आहे.

  • 05 Aug 2026 02:00 PM (IST)

    मला खोट्या गुन्ह्यात अडकवले; 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा VC द्वारे जबाब

    मला खोट्या गुन्ह्यात अडकवले असे 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा VC द्वारे जबाब दिला. शिंदे गटाच्या वकिलांनी याविषयीची माहिती दिली. कल्याण सत्र न्यायालयात जवाब साठी उद्धव ठाकरे व्हीसी द्वारा हजर झाले. सिविल मॅजिस्ट्रेट संतोष आगे यांच्या दालनात उद्धव ठाकरे यांनी आपला जबाब नोंदवला आहे.

  • 05 Aug 2026 01:44 PM (IST)

    शरद पवार यांनी काय बोलावं हे काकडेंनी सांगू नये – शशिकांत शिंदे

    तुमच्या सुनेवर टीका केल्यावरही तुम्ही गप्प बसला आहात, महाविकास आघाडीसोबत आहात, असं म्हणत संजय काकडे यांनी शरद पवारांवर प्रश्न उपस्थित केला. मात्र यावर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी काय बोलावं हे काकडेंनी सांगू नये. त्यांनी पवार साहेबांना उपदेश देण्याऐवजी, पवार साहेबांनी त्यांना किती मदत केली, याची जाणीव ठेवावी, असं शिंदे म्हणाले.

  • 05 Aug 2026 01:41 PM (IST)

    काँग्रेसने रिकामटेकडे उद्योग थांबवावेत -‘गुंगी गुडिया’ वादावर सुरेश धसांची टीका

    आमदार सुरेश धस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षाकडे आता काहीच उरले नसून पक्षाची नियतच बिघडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “रिकामटेकडे उद्योग करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्या,” असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. “गुंगी गुडिया”सारखी वक्तव्ये किंवा पत्रकार परिषदांमधून ट्रोल करण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी धस यांनी केली.

  • 05 Aug 2026 01:37 PM (IST)

    दिवा रेल्वे फाटकाचा फटका ! मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी

    दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक तब्बल 25 मिनिटे बंद न झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक कोंडीमुळे फाटक बंद करण्यात विलंब झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. डाऊन मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. अप मार्गावरील काही गाड्याही गेल्या तासभरापासून विलंबाने धावत असल्याची  तक्रार प्रवाशांनी केली.

  • 05 Aug 2026 01:32 PM (IST)

    काँग्रेसची टीका वैयक्तिक नव्हती, विपर्यास करू नये – हर्षवर्धन सपकाळ 

    काँग्रेसचं ट्विट संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं.  ती टीका व्यक्तिगत पातळीवर घेऊन विपर्यास करू नये – हर्षवर्धन सपकाळ यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • 05 Aug 2026 01:26 PM (IST)

    गोरेगाव पूर्व – हार्मोनी सोसायटीत घुसलं जंगली डुक्कर, रहिवासी भीतीच्या सावटाखाली

    गोरेगाव पूर्वमधील बिबट्या आणि हिरेननंतर आता रिहायशी भागात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. हार्मोनी सोसायटीत आज सकाळी एक जंगली डुक्कर घुसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  मिळालेल्या माहितीनुसार डुक्कर थेट सोसायटीच्या स्टोअर रूममध्ये शिरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी त्याला तातडीने स्टोअर रूममध्येच बंदिस्त केलं.

  • 05 Aug 2026 01:12 PM (IST)

    एखाद्या महिलेला बोलणे हे नालायकपणाचे लक्ष आहे- संजय शिरसाट यांची टीका

    एखाद्या महिलेला बोलणे हे नालायकपणाचे लक्ष आहे. काँग्रेसकडून नवीन संस्कृती निर्माण केली जात आहे. हा समस्त महिलांचा अपमान आहे. लोक जोड्याने मारतील यांना आता अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.  हर्षवर्धन सकपाळ डोक्यावर पडलेले आहेत. ते संजय राऊतांचे भाऊ आहेत. पातळी सोडून बोलणारा तो वेडा माणूस आहे, असंही टीकास्त्र त्यांनी सोडलं.

  • 05 Aug 2026 01:06 PM (IST)

    अमित शाह तोंड लपवत आहेत कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार – राहुल गांधीचे टीकास्त्र

    अमित शाह तोंड लपवतायत,  कारण ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असं म्हणत राहुल गांधी यांनी शहांच्या  संसदेतील गैरहजेरीवरून टीकास्त्र सोडलं.

  • 05 Aug 2026 12:55 PM (IST)

    ठाणे कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय डॉक्टरांचे आंदोलन

    BHMS-CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा विचार केला जात आहे, जो सर्वोपचार (Allopathic) वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या दृष्टीने आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला धक्का देणारा आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्ण सुरक्षिततेवर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका आयएमए त्यासोबतच इतर संघटनांनी घेतली आहे. यासंदर्भात संबंधित शासकीय विभाग आणि मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदां‌द्वारे चिंता व्यक्त करण्यात आली आहे, तरीही वैद्यकीय क्षेत्रातील या चिंतेकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही, सार्वजनिक आरोग्याच्या व्यापक हितासाठी आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय पद्धतींचे मानदंड जपण्यासाठी हा निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे, असं आयएमए कडून सांगण्यात आल होते.

  • 05 Aug 2026 12:50 PM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया या काँग्रेसच्या विधानावर आता राष्ट्रवादी आक्रमक

    मुंबई मंत्रालयाच्या बाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे मूक आंदोलन सुरु आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया या काँग्रेसच्या विधानावर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. यामुळे आता टिळक भवनासमोर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • 05 Aug 2026 12:45 PM (IST)

    सोलापूर शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर

    सोलापूर शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर. मार्ड संघटनेच्या माध्यमातून निवासी डॉक्टरांचा संप सुरू. बीएचएमएस डॉक्टरांचे सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करण्यासाठी संप. सोलापूर शासकीय रुग्णालयातील अडीचशे निवासी डॉक्टर संपावर. आम्ही साडेपाच वर्ष कष्ट करुन डिग्री मिळवतो मात्र बीएचएमएस डॉक्टर तोच कोर्स 6 महिन्यात करुन आमच्यासोबत येतात. हा आमच्यावर अन्याय असून आमचा या गोष्टीला विरोध आहे. बीएचएमएस च्या डॉक्टरांनी त्यांच्या कौन्सीलकडून रजिस्ट्रेशन करावे मात्र एमबीबीएस मध्ये करू नये. आज आम्ही संप पुकारला आहे मात्र येत्या 48 तासात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर इमर्जन्सी सेवा पण बंद करणार आहोत.

  • 05 Aug 2026 12:40 PM (IST)

    सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना आता सुनावलं

    बीडमधील पत्रकार परिषदेवरुन सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना आता सुनावलं आहे. ते म्हणाले की, मंत्री बोलत असताना मध्ये बोलणं चुकीचे आहे, सर्वांनी संकेत पाळावेत, नेत्यांना समज देणार.”

  • 05 Aug 2026 12:35 PM (IST)

    मुंबई मंत्रालयाबाहेर राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

    मुंबई मंत्रालयाबाहेर राष्ट्रवादीचे मूक आंदोलन सुरु आहे. मंत्रालयाच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सुरु आहे. आंदोनलाआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले होते.

  • 05 Aug 2026 12:30 PM (IST)

    सेंट्रल मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपात छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा सहभाग

    सेंट्रल मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.मार्ड ने पुकारलेल्या संपत सहभाग नोंदवत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय.घाटी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्या असून इमर्जन्सी सेवा सुरू ठेवण्यात आल्या असल्याचं ही मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी सांगितलं,दरम्यान आज सरकारसोबत होणार असलेल्या चर्चेमधून समाधान झालं नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उद्यापासून आम्ही आपत्कालीन सेवा पूर्णपणे बंद करू असा थेट इशारा घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी दिलाय.

  • 05 Aug 2026 12:25 PM (IST)

    सुधीर मुनंगटीवार यांचा काँग्रेसला सल्ला

    सुधीर मुनंगटीवार यांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले की, “शब्दांचा उपयोग संयमाना करा, बहिणीसमान उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या महिलेचा अपमान करतायेत.”

  • 05 Aug 2026 12:20 PM (IST)

    संजय काकडे यांचा हर्षवर्धन सपकाळ आणि पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा

    संजय काकडे यांचा हर्षवर्धन सपकाळ आणि पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा दिला आहे. संजय काकडे म्हणाले की”मी पवार, राहुल गांधीना पत्र पाठवलं आहे, 24 तास वाट पाहू, 24 तासानंतर आम्ही अॅक्शन घेऊ, नाहीतर कार्यकर्ते जाऊन त्यांना सरळ करतील’.”

  • 05 Aug 2026 12:14 PM (IST)

    लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही गदारोळ

    राज्यसभेच्या कामकाजा पुन्हा सुरुवात झाली आहे. पण सुरुवात होताच लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही गदारोळ पाहायला मिळाला आहे. अमित शाह जवाब दो अशी विरोधकांकडून घोषणाबाजी सुरु झाली.

  • 05 Aug 2026 12:06 PM (IST)

    खासदार म्हात्रेंच्या नेतृत्त्वात जंतर मंतरवर आंदोलन

    शदर पवार यांच्या NCP चे खासदार म्हात्रेंच्या नेतृत्त्वात जंतर मंतरवर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन एक दिवसाचे असणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासाठी जंतरमंतर आंदोलन सुरु आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे.

  • 05 Aug 2026 12:02 PM (IST)

    दुरबार शहरातील सोनार गल्ली परिसरातील मुख्य रस्ता खड्डेमय

    नंदुरबार शहरातील सोनार गल्ली परिसरातील मुख्य रस्ता खड्डेमय. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती; नागरिकांचा संताप वाढला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आणि आरटीओ कार्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग झाला धोकादायक. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे. वाहनचालकांना मोठा मनस्ताप; अपघाताचा धोका वाढला. निवडणुकीत दिलेल्या दर्जेदार रस्त्यांच्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार? नागरिक आणि व्यापाऱ्यांचा पालिका प्रशासनाला सवाल.

  • 05 Aug 2026 11:56 AM (IST)

    17 वर्षांनंतर कल्याणमधील राजकीय मानहानी खटल्याला वेग

    17 वर्षांनंतर कल्याणमधील राजकीय मानहानी खटल्याला वेग आला आहे. आज कल्याण न्यायालयात उद्धव ठाकरे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. 2009 लोकसभा निवडणुकीतील प्रचारसभेतील व्हिडिओवरून स्वर्गीय राष्ट्रवादी नेते वसंत डावखरे यांनी कल्याण न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे यांच्यासह 5 जणांवर खटला दाखल केला होता. 29 पैकी 25 साक्षीदारांच्या आणि 2 तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या तारखेला उद्धव ठाकरे यांच्या व्हीसीद्वारे जबाबासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आज कल्याण न्यायालय आधी व्हीसी अर्जावर निर्णय सुनावणार त्या नंतर उद्धव ठाकरे यांचा जबाब नोंदवला नोंदवणार असल्याची वकिलांची माहिती आहे.

  • 05 Aug 2026 11:50 AM (IST)

    महापौर बंगल्यासाठी 5.50 कोटींचा निधी कशासाठी? आदित्य ठाकरेंचा सवाल

    महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का? महापौर बंगल्यासाठी 5.50 कोटींचा निधी कशासाठी? गाड्या आणि बंगल्यांवर इतका खर्च कशासाठी केला जातोय, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. यावेळी “महाराष्ट्र आता अदानीच सांभाळतील,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

  • 05 Aug 2026 11:41 AM (IST)

    काँग्रेसने केलेलं ‘गुंगी गुडिया’ हे वक्तव्य विकृत- संजय काकडे

    काँग्रेसने केलेलं ‘गुंगी गुडिया’ हे वक्तव्य विकृत आहे. शरद पवारांचा महिलांबद्दलचा आदर कुठे गेला, असा सवाल संजय काकडे यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण ज्ञानी आहेत, प्रदेशाध्यक्ष विकृत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

  • 05 Aug 2026 11:37 AM (IST)

    राजकीय पक्ष सोडून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे- अभिजीत दीपके

    “राजकीय पक्ष सोडून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. लोकशाहीसाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मीडिया, न्यायपालिका, बेरोजगारी, E20 यावर आम्ही या बैठकीत चर्चा करणार आहोत,” अशी माहिती सीजेपीच्या अभिजीत दीपके यांनी दिली.

  • 05 Aug 2026 11:26 AM (IST)

    आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही- अभिजीत दीपके

    “आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही, मात्र मीडियावाल्यांना त्याची उत्सुकता आहे. आज राजकीय पक्षांची परिस्थिती खूप वाईट आहे. सकाळी आमदार-खासदार एका पक्षात असतात, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात,” अशी टिप्पणी अभिजीत दीपके यांनी केली.

  • 05 Aug 2026 11:17 AM (IST)

    देशभरात संघटन कसं वाढवलं जाईल याविषयी चर्चा करणार- दीपके

    आमचा पुढील रोड मॅप कसा असेल, देशभरात संघटन कसं वाढवलं जाईल, याविषयी आम्ही या बैठकीत चर्चा करणार आहोत. झारखंडच्या आंदोलनासंदर्भात आम्ही बोललो आहोत. आम्ही त्यांना पूर्ण समर्थन दिलं आहे. झारखंडच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत, असं अभिजीत दीपके म्हणाले.

  • 05 Aug 2026 11:09 AM (IST)

    अभिजीत दीपकेंच्या निवासस्थानी आज आणि उद्या सीजेपीची बैठक

    कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी आज आणि उद्या सीजेपीची बैठक होणार आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी दोन दिवस ही बैठक होणार आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका याठिकाणी उपस्थित आहेत.

  • 05 Aug 2026 11:08 AM (IST)

    लोकसभेनंतर राज्यसभेतरी विरोधकांचा गदारोळ सुरू

    सभागृहातील गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्यसभेतही विरोधांनी गदारोळ केला.

  • 05 Aug 2026 10:57 AM (IST)

    100 रुपये देत 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

    छत्रपती संभाजीनगर :  100 रुपये देत 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला,  रिक्षाचालकाने कुरकुरे आणून देण्याचे आमिष दाखवत मुलीला फूस लावली.  मुलीने नकार दिल्यानंतर तोंड दाबून जबरदस्तीने रिक्षात बसवलं.  तीन जागरूक नागरिकांनी रिक्षाचा पाठलाग करत अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला, रजिस्ट्री कार्यालयाजवळ रिक्षा नालीत अडकल्याने आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी चिमुकलीची सुरक्षित सुटका करत आरोपीला अटक केली. निर्जन ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचाराचा डाव असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  असून  पुढील तपास सुरू आहे.

  • 05 Aug 2026 10:55 AM (IST)

    नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसविरोधात आंदोलन

    हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘गुंगी गुडिया’ वक्तव्याविरोधात आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहे . जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार निदर्शने केली. आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे देखील आंदोलनात उपस्थित आहेत.  आंदोलनादरम्यान काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 05 Aug 2026 10:45 AM (IST)

    धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला मोठी गळती

    धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेलं आहे. गेल्या चार दिवसांपासून दुरुस्ती करण्यात आलेल्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. ठेकेदाराच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नागरिकांच्या कॉलनी परिसरात पाणी शिरल्याने परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. तात्काळ जलवाहिनी दुरुस्त करावी वाया जाणारा पाणी थांबावं अशी मागणी नागरिकांनी केली.

  • 05 Aug 2026 10:35 AM (IST)

    जालना शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

    जालना शहरातल्या विविध भागात नागरिकांची सोनसाखळी चोरून लूटमार करणाऱ्या टोळीचा जालना पोलिसांनी पर्दाफाश केलाय, याप्रकरणी कदिम जालना पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून एक जण मात्र फरार आहे, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 11 लाख रुपयांच मुद्देमाल जप्त केलाय, या टोळीतील आरोपीवर लुटमार आणि चोरी केल्याचे या पूर्वीचे 6 गुन्हे असल्याचं पोलिस तपासात उघडकीस आल, शिवाय आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 05 Aug 2026 10:25 AM (IST)

    लाईट गेल्याने घराबाहेर गेलेल्या व्यक्तीचा करंट लागलेल्या स्थितीत विद्युत खंबावर मृतदेह आढळला

    नांदेड शहरातील खडकपुरा परिसरात वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री उशिरा खडकपुरा परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यावेळी शुऐब अब्दुल गफार हे आपल्या कुटुंबीयांसोबत घरी होते. वीज गेल्यानंतर ते घराबाहेर पडले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. कुटुंबीय बाहेर धावले असता घरासमोरील वीजेच्या खांबावर करंट लागलेल्या अवस्थेत शुऐब दिसून आले.अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली आला. शुऐब हे वीजेच्या खांबावर नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 05 Aug 2026 10:24 AM (IST)

    जी टीका केली गेली ती अयोग्य आहे – सुनील तटकरे

    जी टीका केली गेली ती अयोग्य आहे… सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करतात. काँग्रेसविरोधात संतप्त भावना उतरल्याचं लक्षात आल्यानं दिलगिरी व्यक्त केली… असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे.

  • 05 Aug 2026 10:17 AM (IST)

    काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली – सुनील तटकरे

    काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली… दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नसतो… काँग्रेसविरोधात संतप्त भावना उतरल्याचं लक्षात आल्यानं दिलगिरी व्यक्त केली… असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे.

  • 05 Aug 2026 10:12 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०० रुपयांत चाइल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडिओची विक्री

    छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०० रुपयांत चाइल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडिओची विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. बीकॉमच्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी केली अटक केली असून टेलिग्राम चॅनलवर  सगळा प्रकार सुरू होता.  अटकेपूर्वी कारवाईच्या भीतीने क्लाउड स्टोरेजवरील ३ हजार ४१ व्हिडिओ डिलीट केले. दोनही आरोपींना पोलिसांकडून अटक सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

  • 05 Aug 2026 09:58 AM (IST)

    डोंबिवलीकरांचा प्रवास ‘तारेवरची कसरत’! खड्ड्यात साचले पाणी, रस्त्यांना आले डबक्याचे स्वरूप

    डोंबिवली पूर्व सह पश्चिमेतील महाराष्ट्र नगर, गरीबाचा वाडा आणि सिद्धार्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण. सर्वत्र मोठमोठे खड्डे. विशेष म्हणजे गरीबाचा वाडा रिक्षा स्टॅन्ड परिसरात १५० ते २०० मीटरपर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप.

  • 05 Aug 2026 09:57 AM (IST)

    वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    नांदेड शहरातील खडकपुरा परिसरात वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री उशिरा खडकपुरा परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यावेळी शुऐब अब्दुल गफार हे आपल्या कुटुंबीयांसोबत घरी होते. वीज गेल्यानंतर ते घराबाहेर पडले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. कुटुंबीय बाहेर धावले असता घरासमोरील वीजेच्या खांबावर करंट लागलेल्या अवस्थेत शुऐब दिसून आले.अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली आला. शुऐब हे वीजेच्या खांबावर नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 05 Aug 2026 09:50 AM (IST)

    धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती

    धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठी गळती. लाखो लिटर शुद्ध पाणी पाणी वाया गेलं.  चार दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आलेल्या जलवाहिनीला पुन्हा गळती. ठेकेदाराच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह. नागरिकांच्या कॉलनी परिसरात पाणी शिरल्याने परिसरात नदीचे स्वरूप. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध नागरिकांची तीव्र नाराजी.

  • 05 Aug 2026 09:48 AM (IST)

    गुंगी गुडियावर हा एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचा अपमान आहे असं वाटतं नाही – संजय राऊत

    सुनेत्राताईंवरील वक्तव्याबद्दल काँग्रेसने खुलासा केलाय. राजकारणात टीका सहन केली पाहिजे. भविष्यात अशा चूका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हा एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचा अपमान आहे असं वाटतं नाही असं संजय राऊत सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर म्हणाले.

     

  • 05 Aug 2026 08:50 AM (IST)

    नगरसेवकांच्या कार्यालयासमोरच खड्ड्यांचे साम्राज्य! एकता नगर चौकातील रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त

    डोंबिवली पूर्वेतील एकता नगर चौकात मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा चौक शिवसेनेचे नगरसेवक सूरज मराठे आणि नगरसेविका ज्योती मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयालगतच असूनही खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. खड्डे चुकवत रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

  • 05 Aug 2026 08:50 AM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

    पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय. नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला अन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला, या भीषण धडकेत ट्रक खाली कोसळला अन त्याखाली वेगन-आर कार दबली आहे. सुदैवाने या भीषण अपघात कोणतीही जीवितहानी झालेली आहे.

  • 05 Aug 2026 08:40 AM (IST)

    शहरातील खड्ड्यांच्या विषयावर होणारी सात तारखेची महासभा होणार आठ तारखेला

    नाशिकचे खड्डे आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. महासभा रद्द करून मुंबईत तातडीची बैठक. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश. नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरमुख्यमंत्री घेणार आढावा

  • 05 Aug 2026 08:35 AM (IST)

    डोंबिवली पूर्वेतील झेंडा चौकातील खड्ड्यांनी डोंबिवलीकर हैराण

    डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर अर्थात झेंडा चौकातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण चौक खड्डेमय झाला आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. प्रगती कॉलेजसह तीन ते चार शाळा या परिसरात असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. पहाटेपासूनच या चौकात वाहतुकीची वर्दळ सुरू होत असून खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे रस्ते दुरुस्तीसाठी रोड रोलर चौकात उभा असला तरी खड्डे मात्र जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

  • 05 Aug 2026 08:22 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP च्या कोअर कमिटीची आजपासून दोन दिवसीय बैठक

    आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर होणार सविस्तर चर्चा. अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन. सौरभ दास, आशुतोष रांका आणि CJP चे पदाधिकारी बैठकीला उपस्थित. CJP ची पुढील दिशा, ध्येय-धोरणे आणि आंदोलनाची भूमिका ठरणार. भविष्यातील आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यावर बैठकीचा मुख्य भर

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज पक्षाच्या चिन्हावर कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्ट यावर काय निर्णय देते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल कॉंग्रेसने धक्कादायक विधान केले. ज्यानंतर मोठा वाद पेटला. राष्ट्रपतीकडून पुण्यात याविरोधात आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. जय पवार यांनी याबाबत पोस्ट शेअर करत आपला रोष व्यक्त केला. कॉंग्रेसने सुनेत्रा पवार यांना थेट गुंगी गुढिया म्हटले. गुंगी गुढियाच्या विधानावर आम्ही ठाम असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले. अभिजीत दिपके पुन्हा जंतर मंतरवर जाणार असल्याची माहिती आहे. अभिजीत दिपके यांची भेट संजय शिरसाट यांनी त्यांच्या घरी जाऊन घेतल्याने भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला. यावर एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. राज्यात आज भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज देण्यात आला. यासह राज्यातील, देश- विदेशातील, क्रीडा, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us