Maharashtra News LIVE : राजकारणात कुठे थांबले पाहिजे हे कळायला हवे- संजय राऊत

Maharashtra News LIVE : मुंबई व उपनगरांत सलग 4 दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मुंबईच्या विविध भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. विविध भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : राजकारणात कुठे थांबले पाहिजे हे कळायला हवे- संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jul 05, 2026 | 11:08 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Jul 2026 11:08 AM (IST)

    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिग्गजांची एन्ट्री

    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिग्गजांची एन्ट्री. बँकेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदारांचेच वर्चस्व. संचालक मंडळाच्या 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार संचालक मंडळावर पालकमंत्री संजय शिरसाट बिनविरोध, कॅबिनेट मंत्री अतुल सावे विजयी. आमदार रमेश बोरनारे बिनविरोध. आमदार अंबादास दानवे विजयी. आमदार विलास भुमरे बिनविरोध.
    आमदार अनुराधा चव्हाण विजयी. आमदार संजना जाधव विजयी. खासदार डॉ. कल्याण काळे विजयी

  • 05 Jul 2026 10:50 AM (IST)

    नाशिकच्या म्हासरुळ येथील पीकॉक हील येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण

    हरित कुंभ अभियानाच्या अंतर्गत नाशिकचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड आणि नदी संवर्धन, स्वच्छता मोहीम नाशिकमध्ये सुरू. नाशिकचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच महापौर उपमहापौर यांच्या उपस्थितीत उन्नत नाशिक अभियान अंतर्गत वृक्ष लागवड

  • 05 Jul 2026 10:40 AM (IST)

    चार दिवसांपासून संततधार पाऊस; धरणसाठ्यात झपाट्याने वाढ

    पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो. अतिरिक्त पाणी थेट मुळा धरणाकडे; आवक वेगाने सुरू. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 30% वर. 24 तासांत 218 एमसीएफटी नव्या पाण्याची आवक. निळवंडे, आढळा, वाकी धरणांमध्येही पाणीसाठ्यात वाढ. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये‌ समाधानाचे वातावरण…

  • 05 Jul 2026 10:30 AM (IST)

    सीतेला अर्पण केलेली 27 मंगळसूत्रे चोरीला संजय राऊतांचा दावा

    सीतेला अर्पण केलेली 27 मंगळसूत्रे चोरीला गेल्याचा मोठा दावा नुकताच संजय राऊत यांनी केला. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना संजय राऊत दिसले आहेत.

  • 05 Jul 2026 10:20 AM (IST)

    एका आमदाराला 20 कोटींची ऑफर- संजय राऊत

    नुकताच संजय राऊत यांनी मोठा दावा केला. संजय राऊत म्हणाले की, एका आमदाराला 20 कोटीची ऑफर देण्यात आली. राऊतांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडालीये.

  • 05 Jul 2026 10:05 AM (IST)

    राजकारणात कुठे थांबायचे हे कळायला हवे- संजय राऊत

    नुकताच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, अजून किती पाहिजे आहे? शिंदे जर आजारी असतील तर त्यांना आाराम मिळतो. राजकारणात कुठे थांबायचे हे कळायला हवे.

  • 05 Jul 2026 10:00 AM (IST)

    पुण्यात जोरदार पाऊस, सोसायटीची भिंत कोसळली

    पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सोसायटीची सीमा भिंत कोसळली. पुण्यातील जांभूळवाडी परिसरात ही घटना घडली. पार्किंग शेडवर भिंत कोसळून वाहनांचे नुकसान झालं. सोसायटीची सीमा भिंत कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झालं.

  • 05 Jul 2026 09:45 AM (IST)

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात साखळी आंदोलन

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) वाचवण्यासाठी ठाण्यात पर्यावरणप्रेमीकडून मानवी दीड ते दोन किलोमीटर लांब साखळी आंदोलन करण्यात आलं. मिशन ‘SAVE SGNP’ अंतर्गत मानपाडा ते खेवर सर्कल पर्यंत पर्यावरणप्रेमी कडून मानवी साखळी करत शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. उद्यानाची १९३ एकर वनजमीन तातडीने वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची आंदोलकांची मुख्य मागणी आहे. ठाणे महानगरपालिकेने (TMC) १०० एकर जागेवर टाकलेली सर्व आरक्षणे रद्द करण्याची मागणी आहे. वनसंपदेला धोका निर्माण करणारा ४० मीटर पायथ्याचा रस्ता रद्द करण्यासाठी पर्यावरणप्रेमी तसेच ठाणेकर रस्त्यावर उतरले आहेत.
    ठाण्यातील मानपाडा ते खेवरा सर्कल अशी तब्बल दीड ते दोन किलोमीटर मानवी साखळी रचत हजार पेक्षाही अधिक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

  • 05 Jul 2026 09:24 AM (IST)

    नवी मुंबईत जॉगिंग ट्रॅकवर कोसळलं झाड

    सानपाडा ते वाशी दरम्यान फुटपाथच्या मध्ये असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर दोन दिवसांपूर्वी झाड कोसळलं होतं. मात्र अद्यापही नवी मुबंई उद्यान विभागाने हे झाड फुटपाथ वरच ठेवलंय. जॉगिंग ट्रॅकवर झाड कोसळ होतं, तेव्हा जॉकिंग करणारा वर्ग नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. अद्यापही भलं मोठं झाड हे फुटपाथ वरतीच असल्याचे चित्र पाहायला मिळतय. त्यामुळे नवी मुबंईकरानी फुटपाथ वरती कसं चालणार आत कारण झाड अजून फूटपाथ वरतीच आहे.

  • 05 Jul 2026 09:12 AM (IST)

    अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी

    अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं आहे.  या पावसामुळे वाहतूक मंद गतीने होत आहे.  मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. या मुसळधार पावसामुळे प्रशासनही अलर्ट झालं आहे.

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. वसईमध्ये रस्त्यावर जवळपास तीन फूट पाणी साचलं आहे. या पाण्यातून लोकांना वाट काढत चालावे लागत आहे. हवामान विभागाने कालनंतर आज देखील रेड अलर्ट जारी केला आहे. तर पावसांचं संकट सोमवारपर्यंत असणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि जवळच्या शहरात झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. तर याच पावसात मुंबईच्या दादरमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन होणार आहे. ठाकरे गट अयोध्या येथील कथिक गैरव्यवहाराच्या विरोधात दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहे. यासह राज्यातील महत्वाच्या बातम्या, पावसाचे अपडेट्स, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करायला विसरू नका.

Follow Us