AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीतेचं मंगळसूत्र चोरताय… विष पिऊन मेलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी, तुमचा बाप दुर्योधन; संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सीतेचं मंगळसूत्र चोरताय... विष पिऊन मेलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी, तुमचा बाप दुर्योधन; संजय राऊत यांचा घणाघाती हल्ला
| Updated on: Jul 05, 2026 | 11:01 AM
Share

उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील कथित राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. देणगी चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या विरोधात दादरमध्ये थेट आंदोलनाची घोषणा केली. या प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार करत आहेत. संजय राऊत यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सीतेचं मंगळसूत्र चोरताय. खरंतर सत्ताधाऱ्यांनी विष पिऊन मेलं पाहिजे, अशा कठोर शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर घाणाघात केला.

अयोध्या येथील कथित राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत देणगी चोरी प्रकरणी 8 हून अधिक जणांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे राम मंदिराची ट्रस्ट देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, राम मंदिराची लूट सुरू आहे. दरोडे पडत आहे. राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही. मोदी निवडणुकीत सांगत होतं. मंगळसूत्र चोरणार. सीतेचं मंगळसूत्र चोरलं गेलं. सीतेला दान केलेलं मंगळसूत्र चोरलं गेलं. २७ मंगळसूत्र चोरली गेली. तिथे अब्दूल रहीम शमशाद आले होते का चोरायला. चोरणारे, मिश्रादुबे, चंपत राय राव हेच आहे. नेतृत्व मोदींचं आहे’.

सत्ताधाऱ्यांनी विष पिऊन मेलं पाहिजे : संजयल राऊत भडकले

‘सीतेचं मंगळसूत्र चोरताय काय तुमचं धाडस. एसआयटीच्या रेकॉर्डवर आलंय. आभूषणे चोरून तुम्ही राज्य करता. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात. कोण सत्ताधारी. विष पिऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. हे दुर्योधनवादी आहेत. आम्हाला राम रक्षा आंदोलनावरून प्रश्न विचारणाऱ्यांचा बाप दुर्योधन आहे. आम्ही ४ वाजता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राम रक्षा आंदोलन करत आहोत. राज्यात आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे. राज्याच्या सीमेबाहेर हे आंदोलन जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे