Maharashtra News LIVE : बीड – ग्रामीण भागात गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात

Maharashtra News LIVE Updates : भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आज भोंदूला कोर्टात हजर केले जाणार आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Maharashtra News LIVE :  बीड – ग्रामीण भागात गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात
Maharashtra news
| Edited By: | Updated on: Apr 01, 2026 | 11:07 PM

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. हेच नाही तर अशोक घरात याचे अनेक नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचे उघड झाले. भोंदू बाबा अशोक खरातला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस कोठडी संपत असल्याने अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. SIT न्यायालयात काय सांगणार याकडे राज्याचे लक्ष आहे. रात्री उशिरा भोंदू बाबाच्या मुलाला अटक करण्यात आली. पण पत्नी फरार झाली. राज्यात सध्या अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्टसह येलो अलर्ट जारी करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्याचे संकेत आहेत. या युद्धामुळे एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Apr 2026 07:00 PM (IST)

    पुण्यातील खराडी परिसरात जोरदार पाऊस

    पुण्यातील खराडी परिसरात जोरदार पाऊस

    रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ

    पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस

    हवामान विभागाच्या अंदाजनं चिंता वाढली

     

  • 01 Apr 2026 06:50 PM (IST)

    नांदेडमध्ये 19 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

    19 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

    ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील घटना

    गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

    मृत तरुणी नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावची रहिवासी

     

  • 01 Apr 2026 06:48 PM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

    धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात

    कळंब, वाशी तालुका परिसरात अर्धा तासापासून वादळी वाऱ्यासह पाऊस

    अवकाळी पावसाने फळ पिकाचं व काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान

    जिल्ह्यातील इतर ठिकाणी ढगाळ वातावरण

    हवामान खात्याने वर्तवला आहे ३ तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज

  • 01 Apr 2026 06:19 PM (IST)

    आखाती युद्धाचा परिणाम विदेशी पर्यटनावर, ट्रॅव्हल एजंटला मोठा फटका

    आखाती युद्धाचा परिणाम विदेशी पर्यटनावर

    पर्यटक आणि ट्रॅव्हल एजंटला मोठा फटका

    युद्ध जन्य परिस्थिती मुळे ट्रॅव्हल्स एजंटच्या व्यवसायाला बसला फटका

    पर्यटकांची संख्या खालावली

  • 01 Apr 2026 05:40 PM (IST)

    बारामती : विविध गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

    बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ पाणी साठले आहे.

  • 01 Apr 2026 05:29 PM (IST)

    रत्नागिरी-गॅस तुटवड्यामुळे वाहन चालक हैराण

    रत्नागिरीत एलपीजी ऑटो गॅस पंपावर गॅस तुटवड्यामुळे वाहन चालक हैराण झाले होते. तब्बल वीस दिवसानंतर रत्नागिरी शहरातील रिक्षा व्यवसायिकांना एलपीजी गॅस मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या एका लिटर गॅसला 105 रुपये मोजावे लागत आहेत.

  • 01 Apr 2026 05:25 PM (IST)

    भंडारा : बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन

    बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पासाठी 1972 मध्ये कमकासूर, सितेकसा व सुसूरडोह येथील आदिवासींची जमीन संपादित करण्यात आली. मात्र योग्य मोबदला, पुनर्वसन, जमिनीच्या बदल्यात जमीन, नोकरी व घरासाठी मदत या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याविरोधात तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी 18 मार्च रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे आता कमकासूर येथे जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलक पाण्यात उतरले आहेत.

  • 01 Apr 2026 05:13 PM (IST)

    बीड – ग्रामीण भागात गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात

    बीड जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पाऊस गारा आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी, बीड आणि धारूर तालुक्यातील काही भागात गारांसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेती पिकांचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे. तर या अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

  • 01 Apr 2026 03:54 PM (IST)

    डोंबिवली एमआयडीसीत 3 दिवस पाणीपुरवठा ठप्प, स्थानिक त्रस्त

    डोंबिवली एमआयडीसीत 3 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने स्थानिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मनसेच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला आणि प्रशासनाला जाब विचारला आहे. तर संध्याकाळपर्यंत पाणी देण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे.

  • 01 Apr 2026 03:25 PM (IST)

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, सरकारकडून असा निर्णय

    राज्यातील असंख्य दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तब्बल 12 वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ होणार आहे. या निर्णयाचा आठवी ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना फायदा होणार आहे.

  • 01 Apr 2026 03:19 PM (IST)

    अशोक खरात पुन्हा एसआयटीच्या ताब्यात, कारण?

    नाशिकमधून मोठी अपडेट समोर आली आहे. एसआयटीने अशोक खरात याला पुन्हा ताब्यात घेतलं आहे. अशोक खरात याचा एसआयटीने आजच ताबा घेतला. एसआयटीने अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. एसआयटीने न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज मंजूर करताच एसआयटीकडून अशोक खरातला ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येत आहे.

  • 01 Apr 2026 02:45 PM (IST)

    अश्लील व्हिडीओचा वापर करून ब्लॅकमेल करत तरुणीशी केले लग्न

    एका २१ वर्षीय तरुणीला अश्लील व्हिडीओचा वापर करून ब्लॅकमेल करीत तिचे बळजबरीने लग्न लावून दिल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे.सोबतच जादू-टोना केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

  • 01 Apr 2026 02:30 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांच्या पिक्चर अभी बाकीवरून, जयंत पाटलांचा खोचक टोला

    चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत,ते काही बोलले तरी त्यांच्याविषयी आपण काहीच बोलणार नाही,आणि हा दुसरा पार्ट आहे,अश्या शब्दात आमदार जयंत पाटलांनी, मंत्री चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे.

  • 01 Apr 2026 02:15 PM (IST)

    इगतपुरी तालुक्यात पाण्याची टंचाई

    इगतपुरी तालुक्यातील भगतवाडी आणि बकुळवाडी परिसरात पाणी टंचाई झाली आहे. लहान लेकरं आणि महिलांना टेकड्या चढ उतार करून भर उन्हात पायपीट करत भरावे लागतेय पाणी. एका पडीक विहिरीवरून भरावे लागते पाणी

  • 01 Apr 2026 01:57 PM (IST)

    मिरची, भात, मक्का शेतीला अवकाळी पावसाचा फटका

    गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका तिसऱ्यांदा मिरची, भात, मक्का शेतीला बसला असून मोठं नुकसान झालं आहे. हातात आलेली मिरची 25 ते 30 हजार क्विंटलचा दर असताना अवकाळी पावसाच्या मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या मिरचीला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे मिरची पूर्णपणे खराब झालेली आहे.

  • 01 Apr 2026 01:43 PM (IST)

    प्रियंका गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

    चाळीसगावात प्रियंका गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. बुकिंगनंतरही महिनाभर गॅस सिलेंडर न मिळाल्याने संताप. स्वयंपाक कशावर करायचा? नागरिकांसमोर गंभीर प्रश्न?. कामधंदा सोडून तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ. केवायसीसाठी स्वतंत्र काउंटरची ग्राहकांची मागणी. गॅस वितरण तातडीने सुरळीत करण्याची प्रशासनाकडे मागणी.

  • 01 Apr 2026 01:32 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेनेची विभागीय बैठक

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेनेची विभागीय बैठक. छत्रपती संभाजीनगरच्या संत एकनाथ रंगमंदिरात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक.बैठकीला खासदार खासदार संदिपान भूमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार संतोष बांगर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासह जिल्हाप्रमुखांची उपस्थिती. पक्ष मजबुतीकरण व पक्ष वाढीबाबत बैठकीत होणार चर्चा.

  • 01 Apr 2026 01:14 PM (IST)

    ट्रोल करणाऱ्या राऊतांच्या जिभेला हाड नाही – मुंबई महापौर

    माझ्या कर्तुत्वाने मी महापौरपदी बसले आहे. खरात अजून जिवंत कसा? खरातला ठोकून, ठेचून मारलं पाहिजे. ट्रोल करणाऱ्या राऊतांच्या जिभेला हाड नाही.अंधश्रद्धेचा हा विषय नाही. श्रद्धेचा हा विषय आहे. गेली दीडवर्ष मी घशामुळे मी सफर करत होते. आता माझा घसा क्लियर झाला असं रितू तावडे म्हणाल्या.

  • 01 Apr 2026 01:11 PM (IST)

    गळ्याचा व्यायाम जैन मुनींनी करुन घेतला होता – रितू तावडे

    गळ्याचा व्यायाम जैन मुनींनी करुन घेतला होता. ओमचा उच्चार जैन मुनींनी करुन घेतला होता. नम्रमुनी महाराजांनी मोठा चमत्कार केला असं मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या.

  • 01 Apr 2026 12:59 PM (IST)

    शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींची पोलिसांकडून चौकशी

    शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोन आरोपींची चौकशी करण्यात आली. तब्बल तीन तास शिर्डी पोलिसांनी त्यांची चौकशी केली. आरोपींचे बँक अकाउंट, तसेच प्रमुख आरोपीसोबतचे संबंध याबाबत चौकशी झाली. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात मात्र अद्याप फरार आहे. वेगवेगळ्या तीन पथकांच्या माध्यमातून कल्पना खरातचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

  • 01 Apr 2026 12:50 PM (IST)

    नाशिक- अशोक खरातला आता न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार

    नाशिक- अशोक खरातला आता न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार आहेत. प्रत्येक गुन्ह्याची SIT कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे. आत्तापर्यंत नाशिकमध्ये खरात विरोधात १० गुन्हे तर शिर्डीत १ गुन्हा दाखल आहे. पहिल्याच गुन्ह्यात अशोक खरातचा पोलीस कोठडीत १४ दिवसांचा मुक्काम होता. ११ गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेने खरातची मोठी कोंडी होणार आहे.

  • 01 Apr 2026 12:40 PM (IST)

    अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची न्यायालयाची परवानगी

    नाशिक- अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. तपास अधिकाऱ्यांचा हा अर्ज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला. अशोक खरात याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची न्यायालयाने परवानगी दिली. खरातला उद्या पुन्हा दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात येणार आहे. उद्या पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी अशोक खरात याला न्यायालयात हजर करणार आहेत.

  • 01 Apr 2026 12:30 PM (IST)

    भोंदू अशोक खरातला पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात आणलं

    नाशिक – भोंदू अशोक खरातला पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात आणलं गेलंय. पोलिसांच्या पाच ते सहा गाड्यांच्या बंदोबस्तात खरातला मध्यवर्ती कारागृहात आणलं. वैद्यकीय तपासणी करून मध्यवर्ती कारागृहात खरात पोहोचला आहे.

  • 01 Apr 2026 12:20 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात ३ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या दरात ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५३ हजार ९८५ रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५३ हजार ३८० रुपयांवर पोहोचले आहे.

  • 01 Apr 2026 12:08 PM (IST)

    अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 8 हजार हेक्टरवर नुकसान

    दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 8 हजार हेक्टरवर नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान साखरी तालुक्यात आणि त्यापाठोपाठ धुळे तालुक्यात नुकसान झालं आहे. कांदा ,गहू ,हरभरा, फळ पिकांचं नुकसान झालं आहे. पंचनामे सुरू असून तात्काळ मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. धुळे आणि साखरी तालुक्यातील 80 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

  • 01 Apr 2026 11:57 AM (IST)

    घडीची टिकटीक बंद करणारा महाराष्ट्रात कोण पैदा झाला नाहीये – प्रताप पाटील चिखलीकर

    काम पडलं कि दादांचे जोडे उचलायचे आणि दादांच्या जाण्यानंतर आठ दिवसातच घड्याळाची टिक टिक आता बंद पडणार असे भान न ठेवता वक्तव्य करायचे हे कोणालाही आवडले नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात चिखलीकर यांनी हे वक्तव्य केले. नांदेड शहरातील जुना मोंढा टॉवरवरील घड्याळ बंद असल्याबाबत पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना घड्याळ चालू आहे का जिल्ह्यात असे खोचक अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावरून चिखलीकर यांनी भर सभेतून अशोक चव्हानाच्या त्या विधानाचा समाचार घेतलाय. घड्याळ्याची टिक टिक बंद करणारा नांदेडच सोडा महाराष्ट्रात कोणी पैदा झाला नाही असेही चिखलीकर म्हणाले.

  • 01 Apr 2026 11:42 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 01 Apr 2026 11:35 AM (IST)

    भोंदू अशोक खरातला महाराष्ट्र पोलीस अकादमी मधून काढले बाहेर

    भोंदू अशोक खरातला घेऊन पोलीस नाशिक कोर्टाच्या दिशेने रवाना झाले आहेत.पोलीस बंदोबस्तात कोर्टात  हजर केले जात आहे. आज भोंदू अशोक खराची कस्टडी संपत असल्याने कोर्टासमोर हजर करणार.

  • 01 Apr 2026 11:25 AM (IST)

    वसई विरार महापालिका सभागृहात  पक्षाचे चिन्ह लावून येणाऱ्या भाजपा नगरसेवकांना महापौरांची तंबी

    वसई विरार सभागृहात भाजपाचे कमळ चिन्ह लावून येणाऱ्या भाजप नगरसेवकांना महापौर अजीव पाटील यांनी तंबी दिली आहे. सभागृहाच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाने आपल्या पक्षाचे चिन्ह लावून येऊ नये असा नियम आहे. यापुढे कुणीही आपल्या पक्षाचे छातीचे बिल्ले लावून आल्यास सभागृहात प्रवेश मिळणार नाही, असे भाजपा नगरसेवकाना महापौरांनी खडसावले. वसई-विरार महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाचे ४४ सदस्य निवडून आले आहेत. प्रत्येक वेळी ते पालिकेत येताना भाजपाचे कमळ चिन्ह असलेले बिल्ले लावून येतात.

  • 01 Apr 2026 11:11 AM (IST)

    वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

    पुणे वाहतूक पोलिसांकडून नियमभंगावर कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांत 51.54 लाख रुपयांचा दंड पोलिसांनी  वसूल केला, तर 852 वाहनांवर पुणे पोलिसांकडून  जप्तीची कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या कालावधीत वाहतूक नियमभंगाविरोधात  विशेष मोहीम राबवली. तीन दिवसांच्या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये पुणे पोलिसांनी ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तब्बल १२६५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली असून ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे आणि बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या ३२० वाहनांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २३४ सायलेन्सर जप्त केले आहेत..

  • 01 Apr 2026 10:50 AM (IST)

    नाशिक- सरकारी वकील अजय मिसर भोंदू अशोक खरात केस लढवण्यास नकार

    नाशिक – सरकारी वकील अजय मिसर यांनी भोंदू अशोक खरातची केस काढण्यास असमर्थता दाखवली आहे. SIT ने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र मात्र सरकारी वकील ॲड अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिला आहे.  अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार .

  • 01 Apr 2026 10:38 AM (IST)

    सिद्धिविनायक मंदीरातील विश्वस्तांकडून कार्यकारी अधिकारी आणि उप कार्यकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

    सिद्धिविनायक मंदीरातील विश्वस्तांकडून कार्यकारी अधिकारी आणि उप कार्यकारी अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. काही विश्वस्तांनी विधी व न्याय विभागाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे.  विधी व न्याय विभागाकडून या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे.  कार्यकारी अधिकारी विणा पाटील आणि उप कार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांना ७ दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात  आले आहेत.

  • 01 Apr 2026 10:22 AM (IST)

    मुक्ताईनगर जळगाव – निर्यात थांबल्याने आणि वाढत्या उष्णतेने टरबूज उत्पादकांना फटका

    गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक टरबुजाची लागवड शेतकऱ्यांनी केली,  मात्र दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. तसेच निर्यातही थांबल्याने टरबूज मागणी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात टरबूज खराब होत आहे. शेतकरी पूर्णतः चिंतेत सापडला असून सर्वत्र शेतात टरबुजाचा सडा पडला आहे.  कृषी विभागाने याबाबत लक्ष देत मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

  • 01 Apr 2026 10:03 AM (IST)

    आखाती युद्धाचा परिणाम, निर्यात ठप्प झाल्याने कलिंगडाचे दर घसरले, शेतकरी अडचणीत

    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता शेतकऱ्यांवर दिसून येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड करण्यात आली होती. मात्र निर्यात ठप्प झाल्यामुळे बाजारात कलिंगडाला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दर घसरल्याने शेतकरी चिंतेत असून काही ठिकाणी वाहतूक खर्चही निघणे कठीण झालंय.

  • 01 Apr 2026 09:57 AM (IST)

    धुळेकरांकडे महापालिकेचे तब्बल ९६ कोटी थकले, मार्च अखेरपर्यंत किती वसुली? आकडेवारी जाहीर

    धुळे महानगरपालिकेने ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण ४८ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. वर्षभरात सुमारे ४० हजार जागरूक नागरिकांनी आपल्या कराचा भरणा केला. विशेष म्हणजे, महापालिकेने वर्षभरात चार वेळा शास्ती माफी (दंड माफी) देऊनही अद्याप मालमत्ताधारकांकडे ९६ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी वसुलीची स्थिती देखील चिंताजनक असून, लाखो रुपयांची थकबाकी असताना केवळ ५ कोटी रुपयेच पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मोठ्या प्रमाणात थकबाकी शिल्लक असल्याने नवीन आर्थिक वर्षात महापालिका प्रशासन आता कोणती कठोर पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     

  • 01 Apr 2026 09:47 AM (IST)

    जालन्यात उन्हाचा कडाका, पण जंगलातल्या प्राण्यांसाठी वनविभागाचा मोठा निर्णय

    जालना जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने नैसर्गिक जलस्रोत आटू लागले असून, वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील धावडा, मेहेगाव आणि परिसरातील जंगलांमध्ये वनविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या उपाययोजनेमुळे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या शेकडो वन्य प्राण्यांना मोठा दिलासा मिळाला असून, वनविभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 01 Apr 2026 09:37 AM (IST)

    पुणे-अहिल्यानगर हायवेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, एक जण ठार

    पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर येथे एका भीषण अपघातात एकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

  • 01 Apr 2026 09:27 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाभाड्यावरून रिक्षाचालक आणि प्रवासी भिडले

    पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या डांगे चौकात रिक्षाभाड्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि प्रवाशात जोरदार राडा झाला. किरकोळ शब्दांवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले, ज्यामुळे भरचौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या फ्री-स्टाईल हाणामारीमुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

  • 01 Apr 2026 09:17 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये भररस्त्यात कारने घेतला पेट, नागरिकांची उडाली तारांबळ

    पिंपरी चिंचवडमधील काळभोर नगर भागात एका धावत्या चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही कार काळभोर नगर येथील अंडरपासजवळ आली असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने समयसूचकता दाखवत तत्काळ गाडी थांबवून खाली उडी घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गाडीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले, मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ओव्हर हिटिंगमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

     

  • 01 Apr 2026 09:07 AM (IST)

    आखाती देशातील युद्धामुळे शेतकरी पुन्हा संकटात, चाकण बाजार समितीत कांद्याचा ढीग

    आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीत कांद्याचे मोठे साठे साचले आहेत. साठवणुकीसाठी जागा अपुरी पडत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावर ठेवला होता, मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने या कांद्याचे अतोनात नुकसान केले आहे. एकाबाजूला घसरलेले बाजारभाव आणि दुसरीकडे निसर्गाचा फटका अशा दुहेरी संकटात चाकणचा बळीराजा अडकला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

  • 01 Apr 2026 08:50 AM (IST)

    खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलींचा विनयभंग

    नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड. सरकारवाडा पोलीस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. संशयित चालक सुरेश नामदेव पाटील याला अटक. व्हॅनमध्ये बसवताना-उतरवताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप. भीतीपोटी मुली व्हॅनमध्ये जायला नकार दिल्यानंतर हा प्रकार आला उघडकीस.  8-9 मुलींशी गैरवर्तन केल्याची माहिती तपासात समोर. पालकांमध्ये तीव्र संताप, शालेय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

  • 01 Apr 2026 08:40 AM (IST)

    भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून भरत होता आयकर

    तर अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात. आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय. आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता..

  • 01 Apr 2026 08:30 AM (IST)

    नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी

    संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा येत्या शनिवार आणि रविवार राहणार बंद. स्मार्ट सिटीकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यानं पाणीपुरवठा राहणार बंद. शहरातील सहाही विभागात पाणी गळती रोखण्यासह जलकुंभांवर केली जाणार दुरुस्तीची कामं तर सोमवारी सकाळीही कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन

  • 01 Apr 2026 08:20 AM (IST)

    स्वीकृत नगरसेवक पदासाठी सगळ्या पक्षात रस्सीखेच

    स्वीकृत नगरसेवक पदासाठी नेत्यांची मुले बहीण भाऊ स्पर्धेत. माजी खासदार डॉ. भागवत कराड यांची बहीण – डॉ. उज्ज्वला कराड डॉ. भागवत कराड यांचा मुलगा – हर्षवर्धन कराड. भाजप आमदार संजय केणेकर यांचा मुलगा – हर्षवर्धन संजय केणेकर. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू – राजेंद्र दानवे.

  • 01 Apr 2026 08:18 AM (IST)

    सोलापूर शहरात राहत्या घराच्या आवारातच गांजाची लागवड केल्याचे उघड

    रजाक गफुर शेख असे या गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी आरोपीकडून 21 किलो 439 ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत 4 लाख 39 हजार रुपये इतकी आहे. दरम्यान घराच्या आवारातच गांजाची लागवड करण्याची शहरातील ही पहिलीच घटना मानली जात आहे.

  • 01 Apr 2026 08:18 AM (IST)

    कल्याण पूर्वेत चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत तीन दुकानांवर डल्ला

    अजय पूजा भंडार, आयुर्वेदिक स्टोअर आणि लक्ष्मी कलेक्शन टार्गेट. शटर उचकटून चोरी; संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, कोळसेवाडी पोलिसांचा तपास सुरू. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

Follow Us