Maharashtra News LIVE : एलपीजीने भरलेले ‘शिवालिक’ जहाज मुंद्रा बंदरात पोहोचले

Maharashtra News LIVE Updates : देशात अनेत ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येत आहे... तर युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News LIVE : एलपीजीने भरलेले ‘शिवालिक’ जहाज मुंद्रा बंदरात पोहोचले
| Edited By: | Updated on: Mar 16, 2026 | 7:58 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Mar 2026 07:20 PM (IST)

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चेकनिंबाळा शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू  झाला आहे.  करण शेडमाके असे या तरुणाचे नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. निंबाळा शेतशिवारात गुरे चारत असताना त्याच्यावर अचानक वाघाने केला हल्लाय वाघाने जंगलाच्या आत 200 मीटर मृतदेह ओढून नेला होता.

  • 16 Mar 2026 07:03 PM (IST)

    व्यवसायिक सिलिंडर वितरण बंद जळगावात दूध डेअरी चालक अडचणीत

    जळगावात व्यवसायिक सिलिंडर वितरण बंद झाल्याने दूध डेअरी चालकदेखील अडचणीत सापडले आहेत. गॅस सिलिंडर नसल्याने दूधापासून तयार होणारे पदार्थ तयार करता येत नाहीयेत. ऐन सिझनमध्ये व्यवसाय ठप्प होऊन मोठे नुकसान होत आहे. गॅस सिलिंडर नसल्याने दुधापासून पनीर, दही तसेच लोणी, तूप हे पदार्थ तयार करता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

  • 16 Mar 2026 06:55 PM (IST)

    लोकसभेतील 8 विरोधी खासदारांचे निलंबन उद्या रद्द होण्याची शक्यता

    निलंबित विरोधी खासदारांबाबत सूत्रांकडून महत्त्वपूर्ण बातम्या येत आहेत. लोकसभेतील आठ विरोधी खासदारांचे निलंबन उद्या रद्द केले जाऊ शकते.

  • 16 Mar 2026 06:35 PM (IST)

    केरळ निवडणुकीसाठी भाजपने 47 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

    केरळ निवडणुकीसाठी भाजपने 47 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर निमोममधून निवडणूक लढवतील.

  • 16 Mar 2026 06:20 PM (IST)

    पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपने 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

    पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपने 144 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत.

  • 16 Mar 2026 06:10 PM (IST)

    एलपीजीने भरलेले ‘शिवालिक’ जहाज मुंद्रा बंदरात पोहोचले

    शिवालिक हा एलपीजीने भरलेलं जहाज होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून मुंद्रा बंदरात पोहोचलं आहे.

  • 16 Mar 2026 05:54 PM (IST)

    भंडारा : रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात गावकऱ्यांचा रस्ता रोको

    भंडारा तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज भव्य रस्ता रोको आंदोलन केले. लावेश्वर वळण ते लावेश्वर, दाभा ते पांजरा बोथली तसेच कोथुर्ण-खैरी या रस्त्यांच्या तातडीने नूतनीकरणाची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे.

  • 16 Mar 2026 05:40 PM (IST)

    नाशिक : इलेक्ट्रिक लाईनच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद

    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इलेक्ट्रिक लाईनच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निफाड बाजूकडून सिन्नरकडे येणाऱ्या संशयास्पद पिकअप गाडीला पोलिसांनी संगमनेर नाका येथे अडवले असता हा चोरीचा माल सापडला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 16 Mar 2026 05:24 PM (IST)

    धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आमचा पाठिंबा – उद्धव ठाकरे

    महाराष्ट्र सरकारने विधानसभेत महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडले आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘जबरदस्तीने धर्मांतर करण्याला आमचाही विरोध आहे. महाराष्ट्रात धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आमचा पाठिंबा आहे.’

  • 16 Mar 2026 05:10 PM (IST)

    गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? – उद्धव ठाकरे

    आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यानंतर बोलताना त्यांनी गॅस टंचाईवर भाष्य केले. गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

  • 16 Mar 2026 04:47 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा

    वाळूजच्या जोगेश्वरी परिसरात सकाळी सात वाजल्यापासून रांगा

    एक वाजता आली गॅस सिलिंडरची गाडी

    गॅससाठी भर उन्हात रांगेत उभे राहण्याची नागरिकांवर वेळ

     

  • 16 Mar 2026 04:30 PM (IST)

    बीड येथे गॅस बुकिंच्या प्रमाणात तीन पटीने वाढ

    आखाती देशातील युद्धामुळे भारतात अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत गॅसच्या पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. मात्र तरी देखील नागरिक पॅनिक होऊन मोठ्या प्रमाणात गॅस बुक करत असल्याचं चित्र आहे. गॅस बुकिंगमध्ये तिपटीने वाढ झाली आहे.

     

     

  • 16 Mar 2026 04:15 PM (IST)

    गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सायबर ठगांचा सुळसुळाट

    गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सायबर ठगांचा सुळसुळाट

    कांदिवली पोलिसांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

    कांदिवली पोलिसांकडून पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येक परिसरात जाऊन नागरिकांची जनजागृती

    गॅस बिलच्या नावाने सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती

  • 16 Mar 2026 03:55 PM (IST)

    मीरा-भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर

    मीरा-भाईंदरच्या शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर. आयसीयूत व्हेंटिलेटवर असणाऱ्या वृद्धेच्या हाताला उंदरानं कुरतडलं. भेटीसाठी आलेल्या नातेवाईकांमुळे प्रकार उघडकीस. 89 वर्षीय सुहासिनी माठेकरांवर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा डीनसमोर ठिय्या आंदोलन.

  • 16 Mar 2026 03:40 PM (IST)

    नाशिकच्या काळाराम मंदिरावर अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार

    नाशिकच्या काळाराम मंदिरवर अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार. मंदिरावर २० फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय. श्रीराम मंदिर अयोध्या प्रमाणे उभारला जाणार धर्मध्वज. धर्मध्वज उभारणीचा संपूर्ण खर्च मंदिर संस्थान करणार . भाविकांच्या मागणीनंतर विश्वस्तांचा ऐतिहासिक निर्णय

  • 16 Mar 2026 03:30 PM (IST)

    नाशिकमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यात 35 प्रकरणं उघड

    नाशिकमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यात 35 प्रकरणं उघड…पहिल्याच आरोपपत्रात 893 शिक्षक-कर्मचाऱ्यांची यादी….150 कोटींच्या आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय….नाशिकमधील 8 शाळा चौकशी पथकाच्या रडारवर….

  • 16 Mar 2026 03:29 PM (IST)

    उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांची भेट

    उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट झालीय. दोन्ही सभागृहात विरोधीपक्षनेता नाही याची आठवण करुन देण्यासाठी ठाकरेंनी ही भेट घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भेटीवेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी सध्या मोकळाच आहे. विधानभवनात आम्हाला पक्ष कार्यालय कुठे देताहात ?, त्यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, उद्धवजी तुम्ही मोकळे नाही आहात आणि आम्ही तुम्हाला मोकळे राहूही देणार नाही यावरुन उपस्थितांमध्ये हशा पिकला.

  • 16 Mar 2026 03:20 PM (IST)

    बीड अत्याचार प्रकरणी पिडीतेच्या पतीसह मुलीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल

    बीड अत्याचार प्रकरणी पिडीतेच्या पतीसह मुलीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल…पती विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होण्याची शक्यता….तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकावर देखील होणार कारवाई.

  • 16 Mar 2026 03:09 PM (IST)

    अमेरिकेच्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलर पार

    अमेरिकेच्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलर पार..कच्च्या तेलाच्या किंमती 106 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या.. कच्च्या तेलाच्या किंमतीत 2.4 टक्क्यांनी वाढ

  • 16 Mar 2026 02:55 PM (IST)

    सोलापुरात घरगुती गॅसचा तुटवडा

    सोलापुरात घरगुती गॅसचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. कंपनीकडून घरगुती गॅसचा पुरेसा साठा मिळत नसल्याने एजन्सी धारकदेखील त्रस्त आहेत. सणासुदीमुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरला मागणी असल्याने घरगुती गॅसचाही तुटवडा जाणवू लागला आहे.

  • 16 Mar 2026 02:45 PM (IST)

    सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचा निकाल

    सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीचा निकाल जाहिर झाला आहे. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी एकूण ५, भाजपा एकूण 5 आणि शिवसेना एकूण 1 जागा आल्या आहेत.

  • 16 Mar 2026 02:30 PM (IST)

    भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे अनोखे आंदोलन

    अ ब क ड आरक्षण संदर्भात बोलत आहेत. अबकड संदर्भात वर्गीकरण अद्यापही झालेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या घटकांना न्याय मिळेल. सरकारचा लक्ष वेधण्यासाठी 59 जातीचा हार घालून मी आज आलो आहे. अ ब क ड चा आरक्षण हा जाहीर करावा. सात आठ दिवसाच्या आत वर्गीकरण जाहीर झालं तर या अनुसूचित जातींना न्याय मिळेल असे आमदार अमित गोरखे म्हणाले.

  • 16 Mar 2026 02:15 PM (IST)

    चाळीसगाव शहरात रेल्वे पुलाखाली गोळीबाराची घटना

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात रविवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील हनुमानवाडी परिसरात रेल्वे पुलाखाली अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका तरुणाला गोळी लागून तो जखमी झाला आहे. सिकंदर शेख निसार असे जखमी तरुणाचे नाव असून तो अनिल नगर परिसरातील रहिवासी आहे. जखमी सिकंदर शेख याला तातडीने उपचारासाठी देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून आणि कोणाकडून करण्यात आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

  • 16 Mar 2026 01:55 PM (IST)

    गॅस तुटवड्यावर सरकार 2 ते 3 दिवसांत तोडगा काढणार- मनिषा कायंदे

    “गॅसचा तुटवडा झालाय हे मान्य करावंच लागेल, त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर तोडगा सरकार नक्कीच काढेल. दोन ते तीन दिवसांत यावर तोडगा निघेल. सरकारला सोयरसुतक आहे म्हणून चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांच्याकडे कुठले पुरावे नाहीत, केवळ हवेत बाण मारायचे, टीका करायची म्हणून ते करतात. त्यांनी कुणी गांभीर्याने घेत नाही,” असं मनिषा कायंदे म्हणाल्या.

  • 16 Mar 2026 01:42 PM (IST)

    चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदावर उबाठा शिवसेनेच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांचा विजय

    चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदावर उबाठा शिवसेनेच्या मनस्वी संदीप गिऱ्हे यांचा विजय झाला. सत्ताधारी भाजप- शिवसेना-उबाठा- अपक्ष आघाडी आणि विरोधक काँग्रेस यांच्याकडे समसमान 8-8 मतं होती. यामुळे नियमानुसार ईश्वरचिठ्ठीने निर्णय झाला. यात मनस्वी गिऱ्हे यांचा विजय झाला.

  • 16 Mar 2026 01:32 PM (IST)

    पुण्याच्या खेड बाह्यवळ इथं पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनरने घेतला पेट

    पुण्याच्या खेड बाह्यवळ इथं पुणे नाशिक महामार्गावर कंटेनरने पेट घेतला. दिल्लीहून पुण्याला माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग लागली आहे. यामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. घटनास्थळी राजगुरुनगर अग्निशमन दल दाखल झालं असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 16 Mar 2026 01:22 PM (IST)

    अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षाबाबत इस्रायलच्या भारतातील राजदूतांची प्रतिक्रिया

    दिल्ली: अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या संघर्षाबाबत भारताच्या भूमिकेवर भाष्य करताना, इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर म्हणाले, “आम्ही भारतासोबतचा आमचा संवाद आणि सहकार्य सुरूच ठेवू. आमचे अनेक हितसंबंध समान आहेत. अर्थातच, भारत अशाच राजनैतिक प्रयत्नांचा पाठपुरावा करेल, जे भारताच्या हिताचे असतील.”

  • 16 Mar 2026 01:12 PM (IST)

    कांदिवलीतल्या चारकोप एचपी गॅस एजन्सीमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

    कांदिवलीतल्या चारकोप एचपी गॅस एजन्सीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. लोकांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नाहीत आणि इथे त्याचा काळाबाजार सुरू आहे, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

  • 16 Mar 2026 01:05 PM (IST)

    सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोदींच्या विरोधात आंदोलन

    सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोदींच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचवेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. एपस्टीन फाइल्समध्ये मोदींचं नाव आल्याने त्याबाबत केंद्र सरकारने उत्तर द्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

  • 16 Mar 2026 12:56 PM (IST)

    बोरिवलीतील प्रसिद्ध मंगेश वडा पावला गॅसचा फटका

    बोरिवलीतील प्रसिद्ध मंगेश वडा पाव वाला यांनाही गॅसचा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने दुकान दोन दिवस बंद होतं. पण आता गॅस नसल्याने मंगेश वडा पाव वाला आता लाकडे जाळून वडा तयार करत आहे. वडा पावच्या किमतीतही एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे.

     

  • 16 Mar 2026 12:37 PM (IST)

    सरकारच गॅसवर आहे – नाना पटोले

    “सरकारने सर्व पक्षांना बोलवून बैठक घेतली पाहिजे. पण सरकार लोकांना लुटतय. सरकारच गॅसवर आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशावेळेस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. कोरोनात लोकांचे जीव गेलेत त्याला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत” असं नाना पटोले म्हणाले.

  • 16 Mar 2026 12:30 PM (IST)

    मालवणी येथे पतीकडून पत्नीची हत्या

    मुंबईतील मालवणी येथे पतीने पत्नीची हत्या केली तर मेहुणा जखमी झाला. काल रात्री मुंबईतील मालवणी परिसरात
    भाऊजी आणि मेहुणा यांच्यातील भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने चाकूने वार करून हत्या केली. मालवणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री, पती-पत्नीच्या रोजच्या भांडणाचे निराकरण करण्यासाठी मेहुणे आले होते.

  • 16 Mar 2026 12:16 PM (IST)

    मालेगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

    मालेगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र. शहरात घरगुती गॅस सिलेंडर टंचाईचा परिणाम अधिक तीव्र होत असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. अनेक ठिकाणी 100 ते 200 मीटरपर्यंत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. नागरिकांना तासन्तास उन्हामध्ये उभे राहून गॅस सिलेंडरची वाट पाहावी लागत आहे. ऐन ईदच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाल्याने सणाच्या तयारीवरही परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त.

  • 16 Mar 2026 12:09 PM (IST)

    अंबादास दानवे यांना धमकीचे फोन

    “धमक्या हे प्रकार राजकारणात सुरू असतात. कधी एखादी धमकी येते. माणूस दारू पिलेला असतो. रागाच्या भरात असतो हे मला कळतं.मला दिनांक 12, 13, 14, 15 या तारखेला फोन आले. मी फार सिरीयस घेतलं नाही. मात्र मध्यरात्री झोपेत असताना फोन आला. मी कट केला, पुन्हा आला मी कट केला. मी घाबरत नाही. मी तेवढा सक्षम आहे. मात्र मी बाहेर असतो, दौरे असतात. म्हणून मला वाटलं पोलिसात तक्रार करावी. नंतर मी रीतसर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली” असं उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले.

  • 16 Mar 2026 11:51 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण.

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाली असून सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपयांवर आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 63 हजार 680 रुपयांवर पोहोचले. अमेरिका व इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे.

  • 16 Mar 2026 11:47 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते बीडीडी चाळीतील लोकांना चाव्यांचे वाटप

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते बीडीडी चाळीतील लोकांना चाव्यांचे वाटप करण्यात आलं. बीडीडी चाळीतील नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला, अडचणी दूर करून प्रकल्पाला वेग दिला. पार्किंगच्या प्रश्नावर नक्की मार्ग काढू, असं मुख्यमंत्री म्हणाले.

  • 16 Mar 2026 11:39 AM (IST)

    धुळे- गॅस टंचाई विरोधात ग्रामस्थांनी रोखला महामार्ग …

    धुळ्यात गॅस टंचाई विरोधात ग्रामस्थांनी महामार्ग रोखला .  कलेश्वर बर्हाणपूर महामार्गावर शिरपूर तालुक्यातील भाटपूरासह परिसरात ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन.  रास्तारोकोसाठी महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले.  रास्तारोको मुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

  • 16 Mar 2026 11:23 AM (IST)

    कांदिवली चारकोप गावात गॅस सिलिंडरवरून लोकांचा गोंधळ

    कांदिवली चारकोप गावात गॅस सिलिंडरवरून लोक गोंधळ घालत आहेत.   गॅस एजन्सी काळाबाजार करून गॅस पुरवत आहे आणि म्हणूनच आम्हाला तो मिळत नाही असा रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा आरोप आहे.

    मात्र जितके गॅस सिलिंडर येत आहेत तितके वाटप करत आहोत असं चारकोप गावातील एचपी गॅस एजन्सी चालकाने सांगितलंय.

  • 16 Mar 2026 11:20 AM (IST)

    गॅस टंचाईचा छत्रपती संभाजीनगर मध्ये फार्मा इंडस्ट्रीजला मोठा फटका

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईचा फार्मा इंडस्ट्रीजला मोठा फटका बसला आहे.  सर्दी खोकल्याचे औषध तयार करणारी रेड क्रॉस फॉर्म्युलेशन कंपनी ठप्प झाली आहे.  LPG गॅस नसल्याने 5 दिवसापासून कंपनीत औषध निर्मिती थांबली, छत्रपती संभाजी नगर मध्ये जवळपास 25 कंपन्यांना फटका बसलाय.

    गॅस पुरवठा खंडित झाल्याने तब्बल 8 लाख सर्दी खोकल्याच्या औषधाच्या ऑर्डर पेंडिंग, 5 लाख बाटलांच्या ऑर्डर कंपनीने नाकारल्या आहेत. आता कंपनीत लाकडावर चालणारे बॉयलर आणून उभारण्याचे काम तातडीने सुरू आहे.

  • 16 Mar 2026 10:56 AM (IST)

    मी लवकरच गडावर येणार, काळजी करू नका; महंत आदिनाथ महाराज यांचे भक्तांना आवाहन

    तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, आता स्वतः महाराजांनी आपल्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. माझी तब्येत आता एकदम व्यवस्थित असून भक्तांनी काळजी करण्याचे कारण नाही. मी लवकरात लवकर पुन्हा गडावर सेवेसाठी हजर होईल, असे भावनिक आवाहन आदिनाथ महाराज यांनी केले आहे.

  • 16 Mar 2026 10:46 AM (IST)

    केवळ १ हजार रुपयांसाठी विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; गुन्हा दाखल

    बीड जिल्हयातील गेवराई येथे एका खासगी वस्तीगृह चालकाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहाचे एकूण ४० हजार रुपये शुल्क असताना, पालकांनी ३९ हजार रुपये जमा केले होते. मात्र, केवळ उर्वरित १ हजार रुपयांसाठी वस्तीगृह चालक सुरेश राठोड याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, या पैशांसाठी तो वारंवार पालकांना फोन करून तगादा लावत होता. मारहाणीची माहिती मिळताच पालकांनी तातडीने विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील या प्रकारामुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • 16 Mar 2026 10:36 AM (IST)

    मिरा भाईंदरमधील सरकारी रुग्णालयाचा संतापजनक कारभार; ICU मध्ये असलेल्या वृद्ध महिलेला उंदराने कुरतडले

    मिरा भाईंदर पश्चिमेकडील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील एक अत्यंत संतापजनक आणि भोंगळ कारभार समोर आला आहे. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या ८९ वर्षीय सुहासिनी माठेकर या वृद्ध महिलेला रात्री उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ मार्चपासून उपचार घेत असलेल्या या महिलेच्या हाताला उंदराने जखम केल्याने रुग्णालय प्रशासनाच्या स्वच्छतेवर आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

  • 16 Mar 2026 10:26 AM (IST)

    वडापाव महागला; वाढत्या महागाईचा फटका थेट प्लेटला

    ठाणे शहरात आता सर्वसामान्यांचा आवडता वडापाव खाणे महाग झाले आहे. गॅस सिलेंडर, बेसन आणि खाद्यतेलाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे वडापाव विक्रेत्यांनी किंमतीत ५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ वडापावच नव्हे, तर समोसा पाव, कांदा भजी आणि बटाटा भजी यांच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. खिशाला परवडणारा हा नाश्ता आता महाग झाल्याने मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले असून, महागाईचा हा तडाखा थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचला आहे.

  • 16 Mar 2026 10:17 AM (IST)

    वास्तवापासून राज्य आणि केंद्र सरकार का लपतंय? सुप्रिया सुळेंचा सवाल

    गॅस सिलेंडरची कमतरता आहे हे सरकार मान्य का करत नाही. जे विरोधक बोलतात तेच वास्तव होण्यास सुरुवात झाली आहे. मी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारवर आरोप करत नाही. वास्तवापासून राज्य आणि केंद्र सरकार का लपतंय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला

  • 16 Mar 2026 10:16 AM (IST)

    नंदुरबारमध्ये गॅस बुकिंगचा संभ्रम मिटणार; जिल्हा प्रशासनाकडून कॉल सेंटरची क्षमता दुप्पट

    आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात गॅस तुटवड्याच्या अफवांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे गॅस बुकिंगसाठी अचानक कॉलचा ओघ वाढल्याने अनेकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून न जाता वेळेवर बुकिंग करावे, जेणेकरून विनाअडथळा सिलिंडर घरपोच मिळेल.

  • 16 Mar 2026 10:14 AM (IST)

    इंधन टंचाई नाही, हे कोणत्या आधारावर बोलताय – संजय राऊत

    LPG साठी रांगा लागल्यात ते मान्य केलं पाहिजे. इंधन टंचाई नाही, हे कोणत्या आधारावर बोलताय. इराणवर बॉम्ब टाकायला मज्जा येते, असं ट्रम्प बोलतात. पंतप्रधान मोदींनी ट्रम्पसोबत गुलामीचा करार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 16 Mar 2026 10:05 AM (IST)

    ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा तृतीयपंथीयही सहभागी होणार

    ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा तृतीयपंथीयही सहभागी होणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाण्यात निघणाऱ्या पारंपारिक नववर्ष स्वागत यात्रेला यंदा सर्व समावेश नवी जोड मिळणार आहे. यासाठी ५० हून अधिक चित्ररथ सज्ज आहेत. या भव्य स्वागत यात्रेत यंदा प्रथमच तृतीयपंथीय समुदाय सहभागी होणार आहे. ठाणेकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

  • 16 Mar 2026 09:50 AM (IST)

    गॅस एजन्सी उघडण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या रांगा

    रांजणगाव येथील एचपी गॅस एजन्सी समोर पहाटेपासूनच नागरिक गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे. पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे, 150 पेक्षा अधिक गॅस टाक्या घेऊन नागरिक रांगेत उभे.

  • 16 Mar 2026 09:40 AM (IST)

    गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही

    शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहत ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि शेगाव येथील सुप्रसिद्ध अशी कचोरी… देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग, कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.. मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसला आहे .

  • 16 Mar 2026 09:30 AM (IST)

    नाशिक शहरात अनेक ठिकाणचे सकाळी सुरू असलेले नाश्ता सेंटर बंद

    गॅस तुटवड्यामुळे नाश्ता देण्यास अडचण. काल पर्यंत ज्या ठिकाणी नाश्त्यासाठी गर्दी, त्याठिकाणी आज शुकशुकाट..
    नाश्ता एवजी लागले फ्रुट चे स्टॉल. गॅस नसल्याने आता अनेकांनी नाश्ता एवजी फ्रुट स्टॉल लावायला केली सुरुवात..

  • 16 Mar 2026 09:20 AM (IST)

    ठाण्यातील स्मार्ट पार्किंग धोरणाची वाट मोकळी होणार

    महासभेत शुल्क वाढीसह धोरण मंजुरीचा प्रस्ताव ठेवला जाणार. गेल्या तीन वर्षापासून कागदावर अडकून पडलेल्या स्मार्ट पार्किंग धोरणाच्या गाडीला वाट मोकळी करून देण्याची तयारी ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. शहरातील सुमारे 186 रस्त्यांचे अ ब क आणि ड अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येऊन जवळपास 11 हजाराहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची क्षमता असल्याचा निर्वाळा महापालिकेने दिला..

  • 16 Mar 2026 09:07 AM (IST)

    सोलापूर ते मुंबई विमान प्रवासाच्या एका तिकिटासाठी मोजले तब्बल 42 हजार रुपये

    त्याचबरोबर सोलापूर ते गोवा विमान प्रवासासाठी एका तिकिटाला 18 हजार रुपये इतके उच्चांकी भाडे. सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्यापासूनचे तिकिटाला सर्वात उच्चांकी दर असल्याचे पाहायला मिळाले. लगीन सराई तसेच व्यावसायिक कामानिमित्त सोलापूर मुंबई आणि पर्यटनासाठी सोलापूर गोवा विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे

  • 16 Mar 2026 08:50 AM (IST)

    नाशिकच्या काळाराम मंदिरवर अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार

    नाशिकच्या काळाराम मंदिरवर अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकणार आहेत. मंदिरावर 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय आहे.  धर्मध्वज उभारणीचा संपूर्ण खर्च मंदिर संस्थान करणार आहे. भाविकांच्या मागणीनंतर विश्वस्तांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

  • 16 Mar 2026 08:40 AM (IST)

    शॉर्ट सर्किटने ट्रॅव्हल्सला भीषण आग… आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक

    संभाजीनगर ते सांगली मध्ये आलेल्या स्लीपर कोच ट्रॅव्हल्स गाडीला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. सांगलीच्या मारुती चौकात सकाळी सहा वाजता आल्यानंतर ही आग लागली. गाडीत सहा प्रवाशी होते ते सुदैवाने सुखरूप बाहेर पडले. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आणि आग आटोक्यात आणली. मात्र ट्रॅव्हल्स जळुन खाक झाली. यामध्ये प्रवास्याची बॅग ही जळुन खाक झाल्या. यावेळी बघ्याची एकच गर्दी झाली होती.

  • 16 Mar 2026 08:30 AM (IST)

    इराण–अमेरिका तणावाची झळ डोंबिवलीला! गॅस टंचाईमुळे तरुणाचे ‘हॉटेल साहेबराव’ला टाळे

    इराण–अमेरिका तणावाची झळ डोंबिवलीला! गॅस टंचाईमुळे तरुणाचे ‘हॉटेल साहेबराव’ला टाळे लागले आहेत.  कर्ज काडून अवघ्या तीन महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकाने मोठ्या आशेने  व्यवसाय सुरू केला होता. मात्र कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाक ठप्प झाल्याने ग्राहकांना सेवा देणे अशक्य झाल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आलीये.

  • 16 Mar 2026 08:21 AM (IST)

    कल्याण आधारवाडी जेलसमोर फटाक्यांची आतषबाजी;

    कल्याण आधारवाडी जेलसमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिक्षा भोगत असलेल्या ‘सत्या भाई’चा त्याच्या पंटरांकडून जेलच्या मुख्य गेटसमोर फटाके फोडत वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशात  कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे.

  • 16 Mar 2026 08:19 AM (IST)

    नाशिक – अग्निशमन विभागाकडून पुन्हा फायर ऑडिटसाठी नोटीस

    नाशिक – अग्निशमन विभागाकडून पुन्हा फायर ऑडिटसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.  अग्निप्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या आस्थापनांच्या इमारतींवर कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत.  पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याचा तसेच इमारतीचा वापर बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

     

  • 16 Mar 2026 08:18 AM (IST)

    कळंब तालुक्यात हरभरा पिकाची गंजी पेटवली; दोन एकरवरील पीक जळून खाक

    धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सापनाई गावातील शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांच्या शेतात काढून ठेवलेल्या हरभरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सुमारे दोन एकरवरील काढून ठेवलेले हरभरा पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रकरणी शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

  • 16 Mar 2026 08:17 AM (IST)

    गॅस टंचाईचा फटका जगप्रसिद्ध शेगाव कचोरीलाही

    शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहत ते श्री संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि शेगाव येथील सुप्रसिद्ध अशी कचोरी… देशातील कुठलाही भाविक शेगावला गेल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेगाव येथील खमंग, कुरकुरीत अशा कचोरीचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.. मात्र आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे याचा फटका आता शेगाव कचोरीलाही बसला आहे . व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे शेगाव येथील कचोरीचे ही भाव वाढले आहेत.. गेल्या आठवड्यात शेगाव कचोरी दहा रुपयाला मिळत होती, ती आता दोन रुपयांनी वाढून बारा रुपयाला झाली आहे.. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने ही भाव वाढ केल्याचं बोललं जात आहे.. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य कचोरी खवय्यांना बसत असल्याचा समोर येत आहे..

  • 16 Mar 2026 08:15 AM (IST)

    केज तालुक्यातील नाव्होलीत संपत्तीच्या वादातून लेकाकडूनच बापाला अमानुष मारहाण

    बीडच्या केज तालुक्यातील नाव्होली गावात सुभाष ठोंबरेंसह त्यांच्या मुलीला आणि जावयाला मुलगा लक्ष्मण ठोंबरे, सुन सारिका ठोंबरे यांनी काही लोकांना सोबत घेऊन संपत्तीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकुन लोखंडी रॉड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये सुभाष ठोंबरे हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात 10 आरोपींच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. मुलाकडूनच बापाला अशाप्रकारे अमानुष झालेल्या मारहाणीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमीने आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बुलडाणा शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारींनंतर, जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.. बुलडाण्याचे तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी शहरातील विविध हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली.. दरम्यान 14 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे. तर काही हॉटेल मालकांनी कारवाईची कुणकुण लागताच सिलिंडर लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला. या दरम्यान अनेक फसवणुकीचे प्रकार देखील समोर येत आहेत. डोंबिवलीत ‘गॅस कनेक्शन अपडेट’च्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. कपडा व्यापाऱ्याला 14 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. महानगर गॅसचे कनेक्शन बंद होणार सांगत व्यापारी अरुण मोरे यांची 14.46 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. तर अहिल्यानगर येथील कोपरगाव याठिकाणी गॅस संकटावर संजिवनी उद्योग समुह आणि साखर कारखान्याने नवा प्रयोग सुरु केला आहे. कंपनीने इथेनॉलवर चालणारा स्टोव्ह तयार केला आहे. याचप्रकारे युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

Follow Us