Maharashtra News LIVE : वसई विरार महापालिकेची पहिली महासभा संपन्न

Maharashtra News LIVE Updates: राज्यातील लाडक्या बहि‍णींना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाचा 98.45 कोटींचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात आला आहे.

Maharashtra News LIVE : वसई विरार महापालिकेची पहिली महासभा संपन्न
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 9:10 AM

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदवार्ता आली आहे. त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण सामाजिक न्याय विभागाचा 98.45 कोटींचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात आला आहे. तर अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल येत्या 28 फेब्रुवारीपूर्वीच येणार असल्याचे समजते. त्यामुळे हा अपघात होता की घातपात यावर लवकरच प्रकाश पडेल. राज्यसभेसाठी मोर्चबांधणी सुरू आहे. भाजपच्या निष्ठावंतांनी आयाराम-गयारामला खासदारकी देण्यास विरोध केला आहे. राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर लाचप्रकरणात झिरवळ यांच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेचा आजपासून श्रीगणेशा होत आहे. तर एपस्टिन प्रकरणात ब्रिटनचे राजपुत्र अँड्रयू यांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशातील व्हिसा सेवा लवकरच सुरू होणार आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Feb 2026 07:04 PM (IST)

    नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीवरील स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम

    नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीवरील स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम

    नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीबाबत हरित लवादाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    राष्ट्रीय हरित लवाद (NGT) कडून  ६ एप्रिल २०२६ पर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती

    तपोवन वृक्षतोड प्रकरणी आता पुढील सुनावणी ६ एप्रिल रोजी

  • 20 Feb 2026 06:51 PM (IST)

    कल्याणमध्ये फेरीवाल्यांचा गोंधळ, दोन गटात जोरदार राडा

    कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा गोंधळ

    स्टॉल लावण्याच्या वादातून फेरीवाल्यांच्या दोन गटात हाणामारी

    फेरीवाल्यांच्या राड्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम

    तब्बल अर्धा ते एक तास वाहतूक कोंडी, वाहनधारकांचे हाल

  • 20 Feb 2026 06:22 PM (IST)

    शिवसेना  ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

    शिवसेना  ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

    उद्या नाशिकच्या मालेगाव येथे अकरा वाजता कोर्टात राहणार हजर

    मालेगाव येथे कोर्टात सुनावणी होणार असल्याने आज संजय राऊत नाशिकमध्ये दाखल

    मालेगाव न्यायालयात मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केला आहे अब्रू नुकसानीचा दावा

    यासंदर्भात उद्या मालेगाव न्यायालयात सुनावणी होणार असून त्यासाठी संजय राऊत राहणार उपस्थित

  • 20 Feb 2026 06:10 PM (IST)

    ठाण्यात होणार 7000 श्वानांचे लसीकरण

    ठाण्यात होणार 7000 श्वानांचे लसीकरण

    पुढील आठवडाभरात होणार 7000 श्वनांचे लसीकरण

    रेबीज आजाराच्या पार्श्वभूमीवर  महापालिकेची विशेष मोहीम

    मागील काही महिन्यात श्वान दंशाचे प्रमाण वाढले

     

     

  • 20 Feb 2026 05:55 PM (IST)

    काँग्रेसचे पहिले शेतकरी संमेलन भोपाळमध्ये होणार

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारत-अमेरिका करारावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारने या करारावर शरणागती पत्करली आहे. काँग्रेस पहिल्या टप्प्यात तीन शेतकरी परिषदा आयोजित करेल. पहिली 24 फेब्रुवारी रोजी भोपाळमध्ये, दुसरी7  मार्च रोजी यवतमाळमध्ये आणि तिसरी श्रीगंगानगरमध्ये होणार आहे. राहुल गांधी आणि पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे या परिषदांना उपस्थित राहणार आहेत.

  • 20 Feb 2026 05:33 PM (IST)

    भारताची तिसरी अणु पाणबुडी लवकरच कार्यान्वित होणार

    भारत आपली सागरी अणुशक्ती आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत या वर्षी एप्रिल-मे दरम्यान आपली तिसरी स्वदेशी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी, आयएनएस अरिधमान, नौदलात सामील करण्याची तयारी करत आहे.

  • 20 Feb 2026 05:20 PM (IST)

    वसई विरार महापालिकेची पहिली महासभा संपन्न

    वसई विरार महापालिकेची पहिली महासभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. पहिल्या महासभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे सभागृह नेता म्हणून प्रफुल साने यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपा विरोधी पक्षनेता म्हणून मनोज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

  • 20 Feb 2026 05:03 PM (IST)

    काँग्रेसने एआय कार्यक्रमात व्यत्यय आणला, भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला: संरक्षण मंत्री

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संपूर्ण जग नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारताकडून एआय इम्पॅक्ट समिटचे आयोजन करताना आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रमात आपले वाढते जागतिक नेतृत्व पाहत असताना, काँग्रेस पक्षाने देशाची प्रतिष्ठा वाढवण्याऐवजी हा कार्यक्रम उधळण्याचा निर्णय घेतला. युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्या लज्जास्पद पद्धतीने गैरवर्तन केले आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला तो केवळ दुर्दैवीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देखील आहे.

  • 20 Feb 2026 04:56 PM (IST)

    राज्यातील नाट्यगृहांची अवस्था दयनीय, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडून खंत व्यक्त

    राज्यातील नाट्यगृहांची अवस्था दयनीय असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. प्रशांत दामले यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या निमंत्रणावरून अहिल्यानगरमधील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाला भेट दिली. यावेळेस प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहातील सुविधांची पाहणी केली. रंगमंच, प्रकाश-ध्वनी आणि आसन व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

    दामले यांनी यावेळेस राज्याच्या अर्थसंकल्पात किमान 1000 कोटींच्या स्वतंत्र निधीची मागणी केली. पाठपुरावा होतोय मात्र फाईल अडकते, असा मिश्किल टोला लगावत दामले यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

  • 20 Feb 2026 04:50 PM (IST)

    VVMC च्या पहिल्याच महासभेत भाजपा गटनेत्यांकडून गोंधळ, कारण काय?

    वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत भाजपा गटनेता यांनी त्यांना केबिन न मिळाल्याने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत गोंधळ घातला. महासभा सुरु झाल्यानंतर त्यांनी सभागृहात हजेरी लावली. मात्र महासभेनंतर पुन्हा आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं विरोधी पक्षाने सांगितलं आहे. आयुक्तांकडे दालनाची मागणी आगोदर करण्यात आली होती. मात्र आयुक्तांनी त्यांची मागणी महापौर घेतील असं सांगितंल. त्यामुळं पहिल्याच महासभेत वातावरण तापलेलं दिसलं.

  • 20 Feb 2026 04:50 PM (IST)

    मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

    मंत्री छगन भुजबळ रूटीन चेकअपसाठी मुंबईच्या ब्रीच कांडी पोहचले आहेत. छगन भुजबळ या रुटीन चेकअपनंतर शासकीय निवासस्थानी परतणार असल्याची माहिती आहे.

  • 20 Feb 2026 04:08 PM (IST)

    बीडमध्ये रिंकु राजगुरुला पाहण्यासाठी तुफान गर्दी

    बीडच्या बोरफडी गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही उपस्थित होती. बीडच्या ग्रामीण भागात सैराटमधील आर्ची येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता होती. यामुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. बोरफडी ग्रामस्थांच्या वतीने रिंकू राजगुरू यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. गावच्या विकासात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रिंकू राजगुरूने केले.

  • 20 Feb 2026 03:55 PM (IST)

    डिझेल टँकरने पेट घेतल्याने भीषण आग

    छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल टँकरने पेट घेतल्याने भीषण आग लागली आहे. लासुर स्टेशन देवगाव रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

  • 20 Feb 2026 03:40 PM (IST)

    आमदार अर्जुन खोतकर यांनी भरवला जनता दरबार

    ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्येचे निराकरण व्हावे आणि ते प्रश्न मार्गी लागावेत या उद्देशाने शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज जालना शहरात जनता दरबार आयोजित केला. जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या समस्या आणि तक्रारींचा पाढा थेट उपस्थित असलेल्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समोरच वाचून दाखवलाय.

  • 20 Feb 2026 03:20 PM (IST)

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार

    सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडलीये. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावाजवळ ही घटना घडलीये. सुदैवाने, कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 20 Feb 2026 03:10 PM (IST)

    परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात

    बीडच्या परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे हा आज लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतला आहे. एका कामासाठी त्याने तक्रारदाराला 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर त्याच्यावर सापळा लावून कारवाई करण्यात आली असून तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला बीडच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. परळी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती ACB च्या पथकाने दिली आहे.

  • 20 Feb 2026 01:45 PM (IST)

    योगेश सागर यांच्या पान स्टॉलवर धाडी

    चारकोपचे भाजप आमदार योगेश सागर यांनी एका पान स्टॉलवर छापा टाकला. योगेश सागर यांनी अनेक दुकानांवर छापे टाकले आणि त्यांच्यावर गांजा आणि अंमली पदार्थांची खुलेआम विक्री केल्याचा आरोप केला. अनेक पान स्टॉलवर गांजा विकणाऱ्यांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

  • 20 Feb 2026 01:35 PM (IST)

    कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानात वाढ होणार

    कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानात वाढ होणार… मुंबईचा पारा तब्बल 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता….नवी मुंबई, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये पारा 36 ते 38 अंश दरम्यान राहील…. हवामान खात्याची माहिती…

  • 20 Feb 2026 01:23 PM (IST)

    अमरावती महानगरपालिकेत भाजपसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत सहभागी झालीय

    अमरावती महानगरपालिकेत भाजपसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत सहभागी झालीय. ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेच्या नगरसेवकांशी हातमिळवणी करत गट बनवला.  अमरावती महापालिकेमध्ये ठाकरेंचे 2, शिंदेंचे 3 आणि बसपाचे 3 असा एकत्र गट बनवलाय. सत्तेसाठी ठाकरेंची शिवसेना शिंदे आणि भाजपसोबत गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

  • 20 Feb 2026 01:16 PM (IST)

    संजय राऊत उद्या मालेगाव कोर्टात हजर राहणार- सूत्र

    संजय राऊत उद्या मालेगाव कोर्टात हजर राहणार. दादा भुसेंनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याप्रकरणी हजर राहणार. गिरणा सहकारी कारखान्यासंदर्भात राऊतांनी कथित बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. मागच्या तारखेला संजय राऊत सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायलयाने 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

  • 20 Feb 2026 12:55 PM (IST)

    प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते- राज ठाकरे

    प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती. सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी डेट आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका, असंही ते म्हणाले होते.

  • 20 Feb 2026 12:45 PM (IST)

    नाशिक- प्रकृती अस्वस्थ झाल्याने छगन भुजबळ दौरा सोडून हॉस्पिटलकडे रवाना

    नाशिक- प्रकृती अस्वस्थ झाल्याने छगन भुजबळ दौरा सोडून हॉस्पिटलकडे रवाना झाले आहेत. अचानक पोटात दुखू लागल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन करण्यात आला. नाशिकचे सगळे कार्यक्रम रद्द करून भुजबळ मुंबईत उपचारासाठी रवाना झाले आहेत.

  • 20 Feb 2026 12:35 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या वाढ 7 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 20 Feb 2026 12:25 PM (IST)

    महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे, शहरातील पार्किंगचा मुद्दा गंभीर- राज ठाकरे

    महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे. शहरातील पार्किंगचा मुद्दा गंभीर आहे. बांगलादेशींना आधारकार्ड, रेशन कार्ड देणारी माणसं आपलीच आहेत. आपल्याकडे कुंपणच शेत खातंय. त्यांच्यावर कारवाई कोण करणार? राज्य आणि केंद्र सरकारने या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे सर्व गोष्टी तिरस्काराने पाहिल्या जातात, असं राज ठाकरे म्हणाले.

  • 20 Feb 2026 12:15 PM (IST)

    प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नका, शिंदेंची घेतलेली भेट राजकीय नव्हती- राज ठाकरे

    प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नका. सूचना द्यायच्या असतील तर भेटी व्हायला नको का? विरोधकांनी विरोधकांची भूमिका पार पाडली पाहिजे. काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन. शिंदेंची घेतलेली भेट ही काही राजकीय नव्हती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली.

  • 20 Feb 2026 11:59 AM (IST)

    अमरावती महानगरपालिकेत भाजप सोबत उद्धव ठाकरे

    अमरावती महानगरपालिकेत भाजप सोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेत सहभागी. ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेच्या नगरसेवकासोबत हात मिळवणी करून बनवला गट. अमरावती महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचे दोन, शिंदेंचे तीन आणि बसपाचे तीन असा एकत्र गट बनवला. सत्तेसाठी ठाकरेंची शिवसेना शिंदेंसोबत आणि भाजप सोबत गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण.

  • 20 Feb 2026 11:43 AM (IST)

    ठाकरे बंधुंच्या युतीत मिठाचा खडा का?

    उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे युतीत पडसाद. संख्याबळानुसार ठाकरेंच्या सेनेला 3 स्वीकृत नगरसेवक पदं मिळणारं

  • 20 Feb 2026 11:35 AM (IST)

    भिवंडीत महापौरपदाची निवडणूक

    भिवंडीत महापौरपदाची निवडणूक. काँग्रेसच्या महिला नगरसेविका भिवंडी महापालिकेत दाखल. समाजवादी पार्टीचे रईस शेखही भिवंडी पालिकेत दाखल. भिवंडी पालिकेबाहेर मोठा बंदोबस्त तैनात.

  • 20 Feb 2026 11:34 AM (IST)

    राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल महत्वाची माहिती

    राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची ती भेट राजकीय नव्हती. मुंबईतील पार्किंगचा प्रश्न, रस्त्यांसंदर्भातला प्रश्न याबाबत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. UD डिपार्टमेंट एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या कानापर्यंत थेट काही गोष्टी पोहोचणं अपेक्षित होतं. यासाठी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. वरिष्ठ सूत्रांची माहिती.

  • 20 Feb 2026 11:22 AM (IST)

    विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाचा माझ्या व्याख्यानाला विरोध – अमोल कोल्हे

    सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मला अधिकृत मेल पाठवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे व त्यांना महाराजांचा इतिहास सांगणे आनंदाची गोष्ट असून राजकीय जोडे बाजूला ठेऊन हे काम मी करतो. पण विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाने राजकीय पार्श्वभूमी नको म्हणून माझ्या व्याख्यानाला विरोध केल्याचं माध्यमांमधून समजलं आहे असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

  • 20 Feb 2026 11:20 AM (IST)

    मनसेची राज्य स्तरीय बैठक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल

    मनसेच्या राज्य स्तरीय बैठकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल, रंगशारदामधील बैठकीत स्वीकृत नगरसेवकावरही चर्चा होणार. राज्यातील मनसेचे महत्वाचे नेते, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख उपस्थित.

  • 20 Feb 2026 11:16 AM (IST)

    मुंब्रा दिव्यात पाणी चोरांना ठाणे महापालिकेचा दणका, नळ जोडणी खंडीत

    ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत फेब्रुवारी ते एप्रिल 2025 या तीन महिन्यात तब्बल 1 हजार 408 अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्यात आल्या. महापालिकेने यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये नळ जोडणी राबवली होती. त्यावेळी मुंब्रा आणि दिवा परिसरात सुमारे 150 अनधिकृत नळ जोडणी तोडण्यात आल्या होत्या.

  • 20 Feb 2026 11:07 AM (IST)

    शक्तीपीठ महामार्ग मोजणीचा वाद, शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर

    परभणी शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीला सुरुवात होताच, शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, गोळ्या घाला,पण आमचं वावर मोजू देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा. पोलिसांचा शेतकऱ्यांवर बळाचा वापर. शेतकरी महिला संतापली. तुझ्या सरकारला सांग,जमिनी देत नाही म्हणून.

  • 20 Feb 2026 11:06 AM (IST)

    आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरु, ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर होणार परीक्षा

    आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यात 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात ८ लाख ६५ हजार ७४० मुलं,  ७ लाख ४२ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहे. राज्यातील ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या विभागात ही परीक्षा होत आहे.

  • 20 Feb 2026 10:57 AM (IST)

    अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा एप्रिलपासून सुरू होणार

    अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा एप्रिलपासून सुरू होणार आहे. अमरावती विमानतळावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आवश्यक यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. डीजीसीएची (DGCA) टीम पाहणीसाठी अमरावतीत येणार आहे. या पाहणीनंतर रात्री विमानांची ये-जा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (MADC) कामांना गती देण्यात येत आहे. यावेळी धावपट्टी वाढ व इतर पायाभूत सुविधांमुळे विमानतळ अधिक सक्षम होणार आहे. या नाईट लँडिंगमुळे अमरावती जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

  • 20 Feb 2026 10:47 AM (IST)

    शिवजयंती मिरवणुकीत विना परवाना डीजेवरून वाद, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

    नांदेडमध्ये शिवजयंती मिरवणुकीत विनापरवाना डीजेवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी डीजे हटवताना काही तरुणांनी विरोध केला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  यावेळी डीजेचे साहित्य पळवण्याचा प्रयत्न रोखताना कारवाई केल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे.

  • 20 Feb 2026 10:37 AM (IST)

    राज ठाकरेंच्या भेटीला शायना एनसी; शिंदे गट आणि मनसेच्या जवळीकीच्या चर्चांना उधाण

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीची चर्चा ताजी असतानाच आज शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात नवी राजकीय समीकरणे जुळत आहेत का आणि ही वाढती जवळीक महायुतीमध्ये नवीन वळण घेणार का? अशा चर्चांना आता वेग आला आहे.

  • 20 Feb 2026 10:27 AM (IST)

    इंदापूर अपहरण नाट्यात मोठी पेच, माझं अपहरण झालं नाही, तरुणीचा खुलासा

    गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदापूर येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. यावेळी तरुणीने स्वतः बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन आपले अपहरण झाले नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. माझे कोणाकडूनही अपहरण झाले नसून मी स्वतःच्या इच्छेने मुलासोबत गेले होते,” असे प्रतिज्ञापत्र तिने पोलिसांना सादर केले आहे. विशेष म्हणजे, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेल्याचा आरोपही तिने फेटाळून लावला आहे. आपले संबंधित मुलासोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे तिने मान्य केले आहे. कुटुंबाला या प्रेमसंबंधांची कल्पना देऊनही त्यांनी खोटी तक्रार दाखल केल्याचे तिने नमूद केले आहे. आता या प्रकरणात पोलीस त्या तरुण आणि तरुणीला बारामती न्यायालयात हजर करणार आहेत.

  • 20 Feb 2026 10:17 AM (IST)

    राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे संख्याबळ, कोण प्रतिनिधीत्व करणार हे तीन पक्ष मिळून ठरवणार – संजय राऊत

    राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे संख्याबळ आहे. यावर महाविकासाआघाडी चर्चा करुन निर्णय घेणार आहे. आम्हाला संधी मिळावी हे प्रत्येक पक्षाला वाटतं. कुणी प्रतिनिधीत्व करावं हे तीन पक्ष मिळून ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले.

  • 20 Feb 2026 10:07 AM (IST)

    शेतीतील AI फक्त प्रयोगापुरते मर्यादित राहायला नको – देवेंद्र फडणवीस

    शेतीतील AI फक्त प्रयोगापुरते मर्यादित राहायला नको. AI अनेक संकटांचा अंदाज लावू शकतो. AI शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी AI साठी सज्ज झाले आहेत. AI मुळे शेतीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते AI समिटमध्ये बोलत होते.

  • 20 Feb 2026 09:50 AM (IST)

    दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; न दिल्यास दुसरी संधी नाही

    Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल.

  • 20 Feb 2026 09:40 AM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

    मुलीच्या नावामागील वडिलांचे नाव आणि जात हटवण्याचे आदेश. एकल मातांना पूर्ण पालक म्हणून संवैधानिक मान्यता; पितृसत्तात्मक परंपरेपेक्षा मुलाच्या सन्मानाला प्राधान्य. शालेय नोंदीत आईच्या जातीप्रमाणे दुरुस्तीचे निर्देश; एकल मातांच्या हक्कांसाठी महत्त्वाचा टप्पा

  • 20 Feb 2026 09:30 AM (IST)

    महापालिकेची आज पहिलीच महासभा

    महासभेत रस्त्यांच्या आणि उद्यानांच्या नामकरणा बाबत 4 प्रस्ताव. सिंहस्थाच्या कामांच्या नियोजना बाबत देखील होणार महासभेत चर्चा. मात्र गोदा प्रदूषणाबाबत पहिल्या महासभेत चर्चा होणार का याकडे लक्ष. सिंहस्थासाठी कोट्यवधींच्या निधीची तयारी. मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषित असलेल्या गोदावरी प्रदूषण मुक्तीचे काय ? असा सवाल

  • 20 Feb 2026 09:20 AM (IST)

    धाराशिवमध्ये कॉपी प्रकरणात 6 शिक्षक निलंबित तर 12 विद्यार्थ्यांवर कारवाई

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांच्यासह शिक्षण विभागाची कारवाई. रसायनशास्त्राच्या पेपर ला धाराशिव मधील 3, कळंब मधील 1 आणि तुळजापूर तालुक्यातील 9 अशा एकूण 12 कॉपी बहाद्दरांना शिक्षण विभागाचा दणका तर कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या सहा शिक्षकांवर शिक्षण अधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई

  • 20 Feb 2026 09:05 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वीकृत नगरसेवक संदर्भात महत्त्वाची बैठक

    रंगशारदा सभागृहात आज सकाळी दहा वाजता होणार बैठक. बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी राहणार उपस्थित. निवडणुकीनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडणार

  • 20 Feb 2026 09:00 AM (IST)

    नाशिकमध्ये स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक

    नाशिकमध्ये स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उमेदवारी ठरविण्यात मंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

  • 20 Feb 2026 08:55 AM (IST)

    थकीत रक्कम वरून पुणे महानगरपालिका जलसंपदा विभागात वाद

    जलसंपदा विभागाची आज उच्चस्तरीय बैठक होणार त्यामध्ये पाणी बंद करण्याबाबत चर्चा होणार आहे. महापालिकेने पाणीपट्टी भरली नाही तर पुढील आठवड्यात खडकवासला वरील पंप बंद करण्याची तयारी सुरू आहे. 954 कोटी रुपये थकीत भरण्याचे जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्र तर पालिकेकडून 400 कोटी रुपये आमचे तुमच्याकडे असल्याचे जलसंपदा विभागाला पत्र देण्यात आले. थकीत पाणी पट्टी भरली नाही तर पाणी बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा पत्रात इशारा देण्यात आला.

  • 20 Feb 2026 08:50 AM (IST)

    धाराशिवमध्ये मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीचा मोठा डाव

    शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला.आमिषाला थारा नाही. राष्ट्रवादी पक्ष महायुती सोबतच राहणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी भूमिका मांडली. निवडणुकीपूर्वी महायुती होती आणि नंतर देखील असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

     

  • 20 Feb 2026 08:30 AM (IST)

    बनावट जन्म दाखल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

    बनावट जन्म दाखल्याप्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोटे जात प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली. जन्म प्रमाणपत्राची प्रत मनपाच्या कार्यालयात ऑनलाइन प्रणालीत प्रमाणपत्रावरील नोंदणी क्रमांक तपासला असता हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निदर्शनास आले. संशयित शेख नायजा नूर महंमद या महिलेने बनावट व खोटे जन्म प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 20 Feb 2026 08:20 AM (IST)

    अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

    अन्न व औषध प्रशासनाच्या छापा टाकण्यास गेलेल्या अन्न व औषध अधिकारी रेणुका पाटील या महिला अधिकार्याच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात घडला.माढ्याच्या बावी गावामधील धक्कादायक घटना घडली. गुटख्याचा साठा असलेल्या तिन पिकअप पैकी दोन पिक अप गुटख्यासह ताब्यात घेतले असून एक पिकअप पसार झालाय. माढा पोलिसांत जीवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Feb 2026 08:10 AM (IST)

    दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; न दिल्यास दुसरी संधी नाही

    Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल.नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

  • 20 Feb 2026 08:02 AM (IST)

    आजपासून दहावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दहावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी व बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील १९१ परीक्षा केंद्रे संवेदनशील असून, त्यापैकी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. ५५४ केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसविलेले नाहीत. मागील वर्षी ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती.परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. राज्यात ९,७८८ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापराची मुभा देण्यात आली आहे.

Follow Us