AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुण्यात इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याची भीती; मोशी परिसरात खळबळ

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी! पुण्यात इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याची भीती; मोशी परिसरात खळबळ
Pune Building CollapaseImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 08, 2026 | 4:14 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातही पावसाने कहर केला आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

14 ते 15 लोक अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 14-15 लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळतात प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या आतमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी म्हटले की, मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांसोबत एनडीआरएफ जवानांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जळगावच्या पाचोऱ्यात घर कोसळले

पाचोरा शहरात सततधार पावसामुळे गोंड वस्ती परिसरातील एक घर अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घरातील एक चिमुकली ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी तातडीने बचावकार्य करून चिमुकलीला बाहेर काढले. चिमुकलीवर प्राथमिक उपचार पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पालघरमध्येही घर कोसळलं

पालघमध्ये मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे डहाणूतील सोनाळ्याच्या खुबरोद पाडा येथे मध्यरात्री राहतं घर कोसळलं. यशवंत सापटा यांचं राहतं घर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कोसळलं. या घटनेत घरात झोपलेले आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरासह घरातील साहित्य, अन्नधान्य याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सापटा यांच कुटुंब भर पावसात उघड्यावर आले आहे. राहण्यासाठी छत आणि खाण्यासाठी अन्नधान्य शिल्लक नसल्याने शासनाकडून तातडीने मदत मिळण्याची या कुटुंबाने मागणी केली आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक