Maharashtra News LIVE :  अमेरिकेशी चर्चा होत असल्याचा दावा इराणने फेटाळला

Maharashtra News LIVE : अनेक महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातची चौकशी सुरू असून मोठी धक्कादायक माहिती उघड होत आहे. त्याची एच आय व्ही टेस्टही करण्यात आल्याचे समोर आले. यासहं महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

Maharashtra News LIVE :  अमेरिकेशी चर्चा होत असल्याचा दावा इराणने फेटाळला
| Updated on: Mar 28, 2026 | 11:06 AM

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्च करण्यात आली होती, नाशिक पोलिसांनी त्याची एच आयव्ही टेस्ट केली, मात्र ती निगेटीव्ह आली आहे, सध्या एसआटीकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. एक उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांनाही खरातने जाळ्यात ओढले होतं अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोटातील आणखी एका जखमी महिला कामगाराचा मृत्यू झाला. उषा रेवतकर असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या कामगारांची संख्या 26 झाली आहे. परळ टी.टी. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी 9 मार्च ते 31 मे 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने दुरुस्ती आणि काँक्रीटीकरण काम सुरू, परळ टी.टी. उड्डाणपुलाची एक मार्गीका तीन महिने बंद राहणार आहे. यासह देशविदेश, राज्य, क्रीडा, मनोरंजन, क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Mar 2026 06:55 PM (IST)

    नोएडा विमानतळ हा देशातील ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी एक आहे: पंतप्रधान

    पंतप्रधान मोदी 28 मार्च रोजी जेवर विमानतळाचे उद्घाटन करतील. या संदर्भात त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे, “उद्या, 28 मार्च, हा उत्तर प्रदेश आणि एनसीआरमधील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. यामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. तसेच दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरील गर्दी कमी होईल. नोएडा विमानतळ हा आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या ग्रीनफील्ड प्रकल्पांपैकी एक आहे. प्रवासी सेवांव्यतिरिक्त, येथे एक मजबूत कार्गो इकोसिस्टम देखील असेल, ज्यामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना मिळेल.”

  • 27 Mar 2026 06:40 PM (IST)

    4 भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे: परराष्ट्र मंत्रालय

    परराष्ट्र मंत्रालयाने कळवले आहे की, चार भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. भारतीय जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारत संबंधित देशांच्या सतत संपर्कात आहे. भारत आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत गरजा या दोन्ही बाबी विचारात घेत आहे. रशियाकडून कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा पुरवठा सुरू आहे. इराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या परिस्थितीवरही लक्ष ठेवले जात आहे.

  • 27 Mar 2026 06:21 PM (IST)

    क्राईम ब्रँच कार्यालयात फॉरेन्सिक टीम दाखल

    क्राईम ब्रँच कार्यालयात फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आज सकाळी भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात फॉरेन्सिक टीम कडून स्पॉट व्हिजिट केल्यानंतर क्राइम ब्रँच कार्यालयात दाखल झाली आहे. नाशिक पोलिसांची फॉरेन्सिक व्हॅन आणि टीम क्राइम ब्रांच पोहोचली आहे. कागदी माहिती गोळा करण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 27 Mar 2026 06:07 PM (IST)

    अमेरिकेशी चर्चा होत असल्याचा दावा इराणने फेटाळला

    युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचा संवादाचा प्रस्ताव म्हणजे पराभव मान्य करण्यासारखेच आहे.

  • 27 Mar 2026 05:59 PM (IST)

    जळगावातील आव्हाणे रोडवर बिअर बारमधून विदेशी दारूची चोरी

    जळगावातील आव्हाणे रोडवर बिअर बारमधून विदेशी दारूची चोरी

    दुकानाच्या खिडकीचे गज वाकून विदेशी दारूची चोरी

    चोरट्यांनी काउंटर आणि स्टोअरमधून १५ हजार ८३० रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवला

  • 27 Mar 2026 05:57 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

    गदारोळानंतर सभा तहकूब

    मजूर सप्लाय करणाऱ्या महाराणा एजन्सीला २२ कोटी रुपये कशा पद्धतीने देण्यात आले?

    एमआयएमच्या नगरसेवकांनी उपस्थित केला प्रश्न

    एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करताच सभेत गोंधळ

  • 27 Mar 2026 05:30 PM (IST)

    धक्कादायक! ठाण्यात गोळीबाराची घटना, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    ठाण्यात गोळीबार केल्याची घटना

    नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    काल मध्यरात्री नौपाडा पाचपाखाडी पेट्रोल पंपाजवळ घडली घटना

    आरोपीने एका तरुणाच्या दिशेने झाडल्या गोळ्या

    घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

    जुन्या वादातून फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती

  • 27 Mar 2026 05:12 PM (IST)

    अमरावती शहरातील पेट्रोलपंपावरील गर्दी ओसरली

    अमरावती शहरातील पेट्रोलपंपावरील गर्दी ओसरली

    सकाळच्या तुलनेमध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या घटली

    मागील पाच दिवसांपासून अमरावतीच्या पेट्रोल पंपावर होत होती पेट्रोल घेण्यासाठी गर्दी

    आता जरी गर्दी ओसरली असली तरी मात्र सकाळी काय परिस्थिती राहणार अजूनही अनिश्चित

  • 27 Mar 2026 04:54 PM (IST)

    वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक वाढली

    वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक वाढली आहे. सध्या गव्हाला 2200 ते 2400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. या हंगामाच्या सुरुवातीला 2600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. मात्र फेब्रुवारीच्या अखेरपासून दर 2100 ते 2400 रुपयांवर दर घसरले आहेत.

  • 27 Mar 2026 04:41 PM (IST)

    धुळे : नांदूरी यात्रेसाठी 240 जादा बसेस धावणार

    साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदुरी येथील श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने कंबर कसली आहे. भाविकांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी धुळे परिवहन विभागातर्फे तब्बल 240 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

  • 27 Mar 2026 04:28 PM (IST)

    अकोला : रिधोरा शिवारात सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

    अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेत शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हत्या की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत.

  • 27 Mar 2026 04:14 PM (IST)

    झोपडपट्टी पुनर्वसन धोरणाला केंद्र सरकारने मंजूरी द्यावी – खासदार नरेश म्हस्के

    रेल्वे, संरक्षण आणि एमटीएनएलच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन धोरणाला केंद्र सरकारने लवकरात लवकर मंजूरी द्यावी अशा मागणी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली आहे. रेल्वे, संरक्षण आणि एमटीएनएल या केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील जमिनींवर सुमारे 2 लाख 15 हजार झोपडपट्टीधारक रहात आहेत. येथील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे मिळावी आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या पुनर्वसन धोरणाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी असं म्हस्के यांनी म्हटले आहे.

  • 27 Mar 2026 03:59 PM (IST)

     ठाणे महापालिका महासभेत घनकचऱ्यावरुन विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांची टीका

    ठाणे महापालिका महासभेत बजेट हातात घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी पालिका घनकचरा विभाग आणि पालिकेवर टीका केली आहे.  घनकचरा विभागाला एजन्सीकडून थ्री स्टार म्हणून रेटिंग दिल्यामुळे पठाण यांनी नाराजी व्यक्त करीत दिवा आणि मुंब्रा भागात घनकचऱ्याबाबत परिस्थिती बिकट असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी केला आहे.

  • 27 Mar 2026 03:43 PM (IST)

    पुणे – पेट्रोल पंपाला जवळील स्कुटीने पेट घेतल्याने पंपाचे नुकसान

    पुणे – अहिल्यानगर रोड वरील चंदननगर परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाला आग लागल्याची घटना घडली होती. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका दुचाकीला आग लागल्याने त्याचा भडका होऊन पेट्रोल पंपाला आग लागली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली आहे. या आगीत स्कुटी जळून खाक झाली असून पेट्रोल पंपाचे ही नुकसान झाले आहे.

  • 27 Mar 2026 03:34 PM (IST)

    पुणे : खेड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांची धावपळ

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली असून शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.

  • 27 Mar 2026 03:32 PM (IST)

    जालन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील मर्यादा हटवली

    जालन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील मर्यादा आदेश रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी नव्याने आदेश काढला आहे. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवांमुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी 25 मार्च रोजी इंधन वितरणावर मर्यादा घालण्यात आली होती.

  • 27 Mar 2026 01:55 PM (IST)

    MIM चे वॉकआऊट

    शहराचे नाव औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचा अभिनंदनाचा ठराव उप महापौर राजेंद्र जंजाळ यांनी मांडला होता, परंतु याला एमआयएमच्या नगरसेवकांनी विरोध करत सभात्याग केला आणि बाहेर पडले

  • 27 Mar 2026 01:45 PM (IST)

    खरातला शक्तिवर्धक औषधांचं अतिसेवन भोवलं

    दीड वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती… शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती… डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले होते

  • 27 Mar 2026 01:35 PM (IST)

    रत्नागिरी- दादर पॅसेंजर रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी

    रत्नागिरी-दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी… रेल्वे सुरु करण्यासाठी नारायण राणेंचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र… दादर पॅसेजर रेल्वे गाडी कोविड काळात बंद…

  • 27 Mar 2026 01:30 PM (IST)

    जळगावात पेट्रोप पंप पुन्हा सुरू, नागरिकांना मोठा दिलासा

    जळगावात दोन दिवसांपासून बंद असलेले पेट्रोल पंप पुन्हा सुरु झाले आहेत. पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याने पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आली होती. कंपन्यांकडून होणारा पेट्रोल – डिझेलचा साठा उपलब्ध झाल्यानंतर आज पेट्रोल पंप सुरू झाले आहेत. वेगळ्या अफवांमुळे नागरिकांची पंपावर होणारी गर्दी देखील आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याने सागर पार्क परिसरातील व डी मार्ट परिसरातील पेट्रोल पंप बंद होता. पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता.

  • 27 Mar 2026 01:25 PM (IST)

    खरातचं रॅकेट चाकणकर चालवत होत्या- रुपाली ठोंबरे

    खरातचं रॅकेट चाकणकर चालवत होत्या.. नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांचा आरोप.. राज्य महिला आयोगाकडील तक्रारींचा डेटा SITने घ्यावा.. ठोंबरे यांची मागणी..

  • 27 Mar 2026 01:23 PM (IST)

    आम्ही बच्चू कडूंच्या पाठिशी-वामनराव चटप

    सातबारा कोरा कोरा अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं. आधी पापड ते चिलगव्हाण पायदळ यात्रा काढली. 38 तास नागपूर मध्ये चक्काजाम आपण केला, सर्व शेतकरी संघटनाचे नेते एकत्र आले. आम्ही बच्चू भाऊ यांना सांगितलं भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे वामनराव चटप म्हणाले.

  • 27 Mar 2026 01:15 PM (IST)

    भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर

    भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर.. पोलीस कोठडीत खरातची HIV टेस्ट करण्यात आली.. अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 27 Mar 2026 01:12 PM (IST)

    धुळे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

    पिंपळनेर-सामोड महामार्गावर ओम्नी व्हॅनला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. पिंपळनेरहून सामोडमार्गे साक्रीकडे जात असताना कारला अचानक लागली आग कार मधील तीन जण कारमधून बाहेर पडल्याने सुखरूप बचावले. वाहनाच्या वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलातर्फे आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

  • 27 Mar 2026 01:00 PM (IST)

    दीपक केसरकर यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर्चा

    आमदार दीपक केसरकर हे अशोक खरात यांच्या संपर्कात असल्याने त्यांची एसआयटी चौकशी करावी तसेच त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज वेंगुर्ल्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या दीपक केसरकर राजीनामा द्या विकासाकडे दुर्लक्ष करू नका अशा पद्धतीची मागणी करण्यात आली.

  • 27 Mar 2026 12:59 PM (IST)

    समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेल साठा संपला

    जालन्यातील समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेल साठा संपला आहे.त्यामुळं डिझेल अभावी पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.तर आज रात्रीपर्यंत डिझेलचा साठा येईल अशी माहिती पंप मॅनेजरने दिली आहे.

  • 27 Mar 2026 12:43 PM (IST)

    ठाण्यातील खोपट परिसरातील पेट्रोल पंप वरती वाहनांच्या लांबच लांब रांगा

    पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याच्या अफवामुळे पेट्रोल पंपा वरती वाहनांची पेट्रोल डिझेल भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. भर उन्हामध्ये गेल्या अर्धा ते पाऊण तास वाहनधारक इंधनासाठी ताटकाळत रांगेत उभे. पेट्रोल पंपाच्या बाहेर पर्यंत वाहनधारकाच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी.

  • 27 Mar 2026 12:41 PM (IST)

    रुपाली चाकणकर यांना अटक झाली पाहिजे – रुपाली ठोंबरे

    रुपाली चाकणकर यांना अटक झाली पाहिजे. चाकणकरांना अटक करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलं. एसआयटीच्या पथकाची आम्ही भेट घेणार असं रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं.

  • 27 Mar 2026 12:31 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज प्रचंड गदारोळामुळे वादळी ठरली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिनंदन प्रस्ताव सादर न केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला, ज्याचे रूपांतर थेट संघर्षात झाले. महापौरांची मोठी कारवाई. गोंधळ घालणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांना महापौरांनी थेट सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडू न दिल्याने ठाकरे गटाचे नगरसेवक संतप्त झाले होते.

     

  • 27 Mar 2026 12:15 PM (IST)

    बीएड पात्रता परीक्षेचा उडाला बोजवारा

    11 वाजताची परीक्षा साडे अकरा पर्यंत ही सुरु झाली नाही. विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान. बीएडची आज ऑनलाईन पात्रता परीक्षा. अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने लॉग इन होईना. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार. नांदेड शहरातील छत्रपती चौकात असलेल्या ज्ञानदीप परिषद शिक्षण मंडळ मधील प्रकार. इतर काही सेंटरवर ही असाच गोंधळ सुरु

  • 27 Mar 2026 12:13 PM (IST)

    सूर्याच्या किरणांनी रामलल्लाचा सूर्यतिलक

    रामनवमी निमित्त अयोध्येत राम जन्मोत्सवाचा उत्साह. सूर्याच्या किरणांनी रामलल्लाचा सूर्यतिलक, अभिषेक. अयोध्येत भाविकांची दर्शनासाठी गर्दी.

  • 27 Mar 2026 11:55 AM (IST)

    बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात भीषण अपघातात एक जागीच ठार, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात मध्यरात्री दुचाकीचा पिकअप ला धडकून अपघात झाला. यामध्ये बीडमधील तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले होते. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 27 Mar 2026 11:45 AM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारीसाठी पीडित महिला सरसावल्या

    भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारीसाठी पीडित महिला पुढे आल्या आहेत.  आणखी दोन ते तीन पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहे.  खरातवर सध्या एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. नव्या तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तपासाचा विस्तार वाढल्यानं पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • 27 Mar 2026 11:30 AM (IST)

    मुंबईच्या गोरेगाव पश्चिममधील हिट-अँड-रन प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर

    मुंबईच्या गोरेगाव पश्चिममधील हिट-अँड-रन प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेत ७६ वर्षीय बाबूलाल चोप्रा गंभीर जखमी झाले. मुंबईतील गिरगाव येथे झालेल्या हिट-अँड-रन घटनेत जखमी झालेले ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाबूलाल चोप्रा यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४० वाजता गोरेगाव पश्चिम येथील एम.जी. रोडवर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरस्वाराने चोप्रा यांना धडक दिली, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 27 Mar 2026 11:19 AM (IST)

    धाराशिवच्या शिराढोण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये वाद

    धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव निर्माण झाला आहे. गावातील चौकात ग्रामस्थांनी काल रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र आज सकाळी पोलीस प्रशासनाने हा पुतळा हटवण्यासाठी कारवाई सुरू केली असता शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी त्यास जोरदार विरोध केला. पुतळा हटवून नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि गावकऱ्यांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी पुतळा हटवल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडत पोलिस प्रशासनाचा रस्ता रोखला. या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून पुतळा पुन्हा त्याच जागेवर बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान शिराढोण गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून मागील काही वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 27 Mar 2026 10:57 AM (IST)

    ठाण्यातील पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीपासूनच झुंबड, ड्रममध्ये पेट्रोल देण्यास प्रशासनाकडून मज्जाव

    ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील पेट्रोल पंपांवर सध्या वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आपला वाहन साठा पूर्ण भरून ठेवण्यासाठी वाहनधारकांनी पंपांवर प्रचंड गर्दी केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आता ड्रम किंवा सुट्या कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देणे पूर्णपणे बंद केले आहे. केवळ वाहनांच्या टाकीतच इंधन भरण्याचे धोरण राबवले जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  • 27 Mar 2026 10:47 AM (IST)

    आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन वितरणाचे कडक नियम, बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यास बंदी

    इराण-इस्रायल आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नवीन नियमावलीनुसार, आता जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात पेट्रोल-डिझेल देण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरण्याचे स्पष्ट आदेश पंप चालकांना देण्यात आले आहे. इंधन विक्रीची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप मालक किंवा व्यवस्थापकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचा कठोर इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

  • 27 Mar 2026 10:37 AM (IST)

    इराण-इस्रायल युद्धाचा मुंबईतील पेट्रोल पंपांना फटका; पुरवठ्यात मोठी घट

    इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता मुंबईच्या इंधन पुरवठ्यावर उमटताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या तणावामुळे मुंबईतील पेट्रोल पंपांना होणाऱ्या पुरवठ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जिथे आधी दोन ट्रक्समधून ४० हजार लिटर पेट्रोल मिळायचे, तिथे आता केवळ २० हजार लिटरच उपलब्ध होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ‘पेट्रोलचा साठा संपणार’ अशा अफवा पसरल्याने मुंबईतील पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. नागरिक गरजेपेक्षा जास्त आणि अतिरिक्त पेट्रोल भरून ठेवत असल्याची तक्रार पंप कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. प्रशासनाकडून आणि पंप मालकांकडून “इंधन साठा संपणार नाही, कृपया गर्दी करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे आवाहन वारंवार केले जात आहे.

  • 27 Mar 2026 10:27 AM (IST)

    बीडच्या एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापकांचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडीओ व्हायरल

    बीडमध्ये एसटी महामंडळाच्या कार्यालयातील एका कथित भ्रष्टाचाराच्या व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली आहे. आगार व्यवस्थापक सतीश तिडके यांनी आपल्या कार्यालयातील टेबलवर बसून एका गुत्तेदाराकडून रोख रक्कम स्वीकारल्याचा आणि ती मोबाइलखाली दडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीड बस स्थानकाचे काम करणारे शेख नामक गुत्तेदार हे पैसे अधिकाऱ्यांसह स्टाफच्या ‘फराळासाठी गिफ्ट’ म्हणून दिल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे असे गिफ्ट्स आता खूप झाले आहेत असा वैतागही त्यांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकरणावर सतीश तिडके यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला असला, तरी या पैशातून आपण चालक-वाहकांना सुविधा पुरवत असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे आता प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

  • 27 Mar 2026 10:17 AM (IST)

    मुंबईत आज भव्य सहकार भवनाचे भूमिपूजन, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

    मुंबईच्या सायन प्रतीक्षा नगर परिसरात आज एका ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उभारल्या जाणाऱ्या प्रशस्त सहकार भवनाचे आज दुपारी २ वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे भव्य होर्डिंग्स आणि बॅनर्स लावण्यात आले असून, हा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी महाराष्ट्रात रुजवलेली सहकार चळवळ आता देवेंद्र फडणवीस आधुनिक तंत्रज्ञानासह अधिक सक्षमपणे पुढे घेऊन जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भवनामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला एक नवी ओळख आणि हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, भूमिपूजनाची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

  • 27 Mar 2026 10:07 AM (IST)

    नाशिक भोंदू बाबा अशोक खरातचा धक्कादायक खुलासा, मोडस ऑप्रेंडी समोर

    नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या फसवणुकीची नवीन आणि हायटेक ‘मोडस ऑप्रेंडी’ आता समोर आली आहे. खरात केवळ दैवी शक्तीचा दावा करत नसून, त्यासाठी तो दोन स्वतंत्र टीमचा वापर करून नियोजनबद्धरीत्या लोकांची माहिती गोळा करत असल्याचे उघड झाले आहे. हॉट रीडिंग तंत्राचा वापर करून नातेवाईक आणि संदर्भांद्वारे भाविकांची वैयक्तिक माहिती आधीच मिळवली जायची. तर कोल्ड रीडिंग आणि फेस रीडिंगच्या माध्यमातून भेटीच्या पहिल्या ५ मिनिटांत अचूक माहिती सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करायचा. मानसशास्त्राचा प्रभावी वापर करून आणि समोरच्या व्यक्तीला भ्रमित करून लुटणाऱ्या या टोळीचे जाळे आता पूर्णपणे उघडे पडले आहे.

  • 27 Mar 2026 09:50 AM (IST)

    ऑटो एलपीजी गॅस संपल्याने आक्रमक झालेल्या रिक्षा चालकांनी केले रास्ता रोको आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर – जालना रस्त्यावरील चिकलठाणा परिसरात रास्ता रोको आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस संपल्याने रिक्षा चालक अडचणीत. ऑटो रिक्षा चालकांनी अचानक केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली.

  • 27 Mar 2026 09:40 AM (IST)

    जय श्रीराम, कब मिलेगा हिंदू किसान को दाम. बच्चू कडू यांच्याकडून अमरावती शहरांमध्ये बॅनरबाजी..

    शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी बच्चू कडू यांचं आज अमरावतीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.. एक दिवसीय उपोषन सरकारसाठी नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांचे लक्ष वेधण्यासाठी आहे.. आजच्या आंदोलनातून आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. राज्यभरातील प्रहार चे कार्यकर्ते आणि शेतकरी आज अमरावतीमध्ये येणार.

  • 27 Mar 2026 09:30 AM (IST)

    नागपूर पेट्रोल भरणाऱ्यांची गर्दी झाली कमी

    पेट्रोल साठा भरपूर असल्याचं प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं असताना सुद्धा होत होती मोठी गर्दीय. मात्र आज पेट्रोल पंप वर गर्दी पाहायला मिळत नाही. परिस्थिती सामान्य होताना येत आहे दिसून

     

  • 27 Mar 2026 09:20 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरात च्या बंदुकीचे लायसन अखेर रद्द

    जिल्हा प्रशासनाने केली लायसन रद्द करण्याची कारवाई. 2012 मध्ये देण्यात आला होता लायसन. 2024 ला लायसन्स पुन्हा केलं नूतनीकरण. आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून भोंदू बाबा अशोक खरात चा लायसन रद्द

  • 27 Mar 2026 09:05 AM (IST)

    सोलापूरच्या बार्शीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान

    अवकाळी पावसामुळे वैराग भागातील हत्तीज येथे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. तर इर्लेवाडीत शेडमधील बेदाणा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने लोखंडी रॉड देखील उखडून फेकले गेलेत.

     

  • 27 Mar 2026 08:52 AM (IST)

    धाराशिव – तेलाच्या किंमत वाढली, सिलेंडर बंद झाल्याने छोटे हॉटेल व्यवसाय अडचणीत

    धाराशिव –  खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने आणि व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्याने छोटे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.  हॉटेल व्यवसायिकांना उन्हाच्या तडाख्यातही चुलीच्या झळा,  36, 37 एवढ्या टेंपरेचर मध्येही चुलीवरती पदार्थ  बनवावे लागत आहेत. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्याने लाकडाच्या किमती वाढल्या. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने व्यवसायामध्ये तोटा होत असल्याची माहिती हॉटेल चालकांनी दिली.

  • 27 Mar 2026 08:40 AM (IST)

    सोलापूर – बार्शीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान

    सोलापूरच्या बार्शीत अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालं आहे.  अवकाळी पावसामुळे वैराग भागातील हत्तीज येथे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली. तर इर्लेवाडीत शेडमधील बेदाणा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने लोखंडी रॉड देखील उखडून फेकले गेले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 27 Mar 2026 08:28 AM (IST)

    अमरावती शहरातील जवळपास तीन ते चार पेट्रोल पंपांवर पेट्रोलचं नाही

    अमरावती शहरातील जवळपास तीन ते चार पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा खळखळाट. कालपासून तीन पेट्रोल पंपावर पेट्रोलच नाही. लोकांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल घेतल्याने पेट्रोल संपलं आहे. सलग तीन दिवसांपासून हीच परिस्थिती असल्याची माहिती समोर.

  • 27 Mar 2026 08:13 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरात च्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द

    नाशिक –  भोंदू अशोक खरात च्या बंदुकीचे लायसन्स अखेर रद्द करण्यात आलं.  जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली. 2012 मध्ये त्याला लायसन्स देण्यात आलं होता, तर 2024 साली पुन्हा नूतनीकरण झालं. आता मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून भोंदू बाबा अशोक खरातचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.

  • 27 Mar 2026 08:04 AM (IST)

    परळ टी.टी. उड्डाणपुल दुरुस्ती वादात, इंग्रजी-गुजराती फलकावरून पालिकेवर टीका

    परळ टी.टी. उड्डाणपुल दुरुस्ती वादात सापडला असून इंग्रजी-गुजराती फलकावरून पालिकेवर टीका होत आहे. परळ टी.टी. उड्डाणपुलाची एक मार्गीका तीन महिने बंद राहणार आहे.  सोशल मीडियावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिकेकडून हा फलक काढण्यात आला असून मराठी मध्ये फलक लावण्यात आला आहे.  मात्र अजून देखील हा फलक पालिकेच्या स्टोअररूममध्ये ठेवण्यात आला आहे.

  • 27 Mar 2026 08:01 AM (IST)

    उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांनाही खरातने ओढले होतं जाळ्यात

    नाशिक –   एक उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची बायको यांना खरातने जाळ्यात ओढले होते अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोन्ही महिलांकडून खरात विरोधात तक्रार केली जाणार आहे. या दोन्ही महिलांचं भोंदू खरातकडून आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 27 Mar 2026 07:59 AM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरात HIV निगेटिव्ह

    नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातची एच आय व्ही टेस्ट करण्यात आली. नाशिक पोलिसांनी केली एच आयव्ही टेस्ट, मात्र ती निगेटीव्ह आली. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात महिलांवर अत्याचार करत होता. त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Follow Us