Maharashtra News LIVE : शरद पवार यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ

Maharashtra News LIVE Updates : भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे... एवंढच नाही तर देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा...

Maharashtra News LIVE : शरद पवार यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ
| Edited By: | Updated on: Apr 06, 2026 | 11:44 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Apr 2026 11:44 AM (IST)

    टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपाताचा कट उधळण्यात आला

    टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमाज सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे.  दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई केली.

  • 06 Apr 2026 11:43 AM (IST)

    नेत्यांनी भोंदू खरातला कॉल का केले ? अंजली दमानिया

    चाकणकर, तटकरे यांनी खरातला कॉल केले, या नेत्यांनी भोंदूला कॉल का केले ? अंजली दमानियांचा सवाल

  • 06 Apr 2026 11:28 AM (IST)

    बारामती – सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देणं हीच दादांना श्रद्धांजली असेल – प्रफुल्ल पटेल

    आज आमचा नेत्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करायचा आहे. माझ्यासह सर्व नेते कार्यकर्ते आले आहेत.  बारामतीच्या जनतेने दादावर प्रेम केलं, तसं ते वहिनींवर करतील.  या पोटनिवडणुकीत इतर पक्षांनी उमेदवारी देऊ नये अशी आमची भूमिका आहे. आम्ही विनंती करतो की सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून द्यावं, तीच  दादांना श्रद्धांजली असेल – प्रफुल्ल पटेल.

  • 06 Apr 2026 11:12 AM (IST)

    राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची खेळी ? बंद दाराआड प्राजक्त तनपुरेंशी चर्चा सुरू

    राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची खेळी पहायला मिळत आहे.  प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रविंद्र चव्हाण आणि विखे पाटील यांची तनपुरेंशी चर्चा सुरू.

  • 06 Apr 2026 11:05 AM (IST)

    शरद पवार यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ

    नवी दिल्ली – राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. शरद पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ  घेतली .

  • 06 Apr 2026 10:57 AM (IST)

    बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा; छगन भुजबळ यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू,” असे भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

  • 06 Apr 2026 10:47 AM (IST)

    चाकणमध्ये ५ किलो गॅसचा तुटवडा; कामगारांवर चूल पेटवण्याची वेळ

    पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात सध्या ५ किलो गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे कामगार वर्गाचे मोठे हाल होत आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणारे हजारो स्थलांतरित कामगार लहान खोल्यांमध्ये राहतात, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी उघड्यावर चुली पेटवल्या आहेत, तर चुलीची सोय नसलेल्या अनेक कामगारांनी थेट गावची वाट धरली आहे. या गॅस टंचाईमुळे चाकण परिसरातील असंख्य भाड्याच्या खोल्या सध्या रिकाम्या होत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.

  • 06 Apr 2026 10:37 AM (IST)

    मुंबईतील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट, चिंता वाढली

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून, सध्या केवळ ३७.७० टक्के साठा शिल्लक राहिला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि भातसा यांसारख्या महत्त्वाच्या धरणांतील पाणी पातळी खालावल्याने मुंबई महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून ५,४५,६८० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असून, वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबईला दररोज ४,००० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत असल्याने जूनअखेरपर्यंत हा साठा जपून वापरण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.

  • 06 Apr 2026 10:27 AM (IST)

    आमदार तायडे यांचे बंधू हत्या कट प्रकरणी बच्चू कडूंच्या आवाजाचे सॅम्पल घेणार, कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये

    आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजीत तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातील कथित ऑडिओ क्लिप आता तपासणीच्या चक्रात अडकली आहे. ही वादग्रस्त ऑडिओ क्लिप आज अमरावतीच्या प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी आणली जाण्याची शक्यता आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आवाजाशी मिळताजुळता असल्याचे बोलले जात आहे. सत्यता पडताळण्यासाठी बच्चू कडू यांनाही प्रयोगशाळेत आवाजाचे नमुने देण्यासाठी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचा अंतिम अहवाल येण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असून, बच्चू कडू यांच्यावर आधीच खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 06 Apr 2026 10:17 AM (IST)

    सुनेत्रा पवारांनी अर्ज भरण्यापूर्वी घेतले अजित दादांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित दादांच्या स्मृतिस्थळावर दाखल झाल्या आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित आहेत.

  • 06 Apr 2026 10:07 AM (IST)

    मुंबईतील दिंडोशीत दोन गटांत हाणामारी, 8 जणांना अटक

    मुंबईतील दिंडोशी नागरी निवारा परिसरात काल रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या आज सायंकाळी ६ वाजता नागरी निवारा येथे भेट देणार असून, ते तिथे हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.

  • 06 Apr 2026 09:50 AM (IST)

    सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काटेवाडीत..

    आज सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काटेवाडीत आहेत. यावेळी भाजपासून चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 06 Apr 2026 09:40 AM (IST)

    भाजप स्थापना दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री जयकुमार गोरेंचा फोटो वगळला

    आमदार विजयकुमार देशमुखांनी दिलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री गोरेंचा फोटो वगळला. पालकमंत्री गोरे आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. विशेष म्हणजे या जाहिरातीत सोलापूरच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचाही फोटो वगळला

  • 06 Apr 2026 09:30 AM (IST)

    सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली

    दररोज जवळपास 800 गाड्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे दाखल. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतमालाने भरलेल्या वाहनांच्या रांगा. बाजार समितीमध्ये सध्या तूर, हरभरा, गहू या शेत पिकाची मोठी आवक. जवळपास तीस हजार क्विंटल शेतमालाची रोज कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक.

  • 06 Apr 2026 09:20 AM (IST)

    सुनेत्रा पवार दुपारी 12 वाजता भरणार अर्ज

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता उपमुख्यमंत्री आज दुपारी बारा वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महायुतीमधील महत्वाचे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 06 Apr 2026 09:05 AM (IST)

    सुनेत्रा पवार आज भरणार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज

    अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रे आपल्या हातात घेतली. आज बारामती विधानसभेच्या निवडणुकीकरिता सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत.

  • 06 Apr 2026 08:57 AM (IST)

    48 तासात नांदेड शहरात पाचवा खून

    48 तासात नांदेड शहरात पाचवा खून झाला आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात एका तरुणाचा खून झाला आहे. कारण अद्याप अस्पष्ट आहे. वॉकिंग आलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री गँगवार मध्ये तिघांचा  मृत्यू झाला होता.  शनिवारी रात्री मुरमुरा गल्लीत एकाला संपवले.  आज एका जनाला ठार केले.. जुन्या वादातून खून झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 06 Apr 2026 08:45 AM (IST)

    पुण्यात पुढील दोन दिवस तापमान राहणार स्थिर…

    गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमाना सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत रविवारी कमाल तापमान स्थिर राहून किमान तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्री विभागाने वर्तवली आहे. शहर आणि परिसरात रविवारी किमान तापमानात साधारण दोन अंश सेल्सिअस वाढ होऊन ते 20.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतके राहिले.

  • 06 Apr 2026 08:35 AM (IST)

    कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांची ‘मिडनाईट’ कारवाई!

    वाहतूक पोलिसांची रात्रभर विशेष मोहीम: ड्रंक अँड ड्राईव्ह व नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आलं. शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी अपघात व हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.  काळ्या फिल्म व फॅन्सी/तुटलेल्या नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. अचानक कारवाईमुळे बेजबाबदार वाहनचालकांची पळापळ झाली.

  • 06 Apr 2026 08:25 AM (IST)

    आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी पुण्यात बैठक…

    रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना चुकीची आणि भेसळ युक्त कीटकनाशके विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. याचा परिणाम आंबा पिकावर झाला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत गुरुवारी कृषी आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी खते कीटकनाशके रोखीने खरेदी केल्यास किमतीपेक्षा 50 टक्क्यापर्यंत सवलत देत विक्रेते व कंपन्या कडून मोठ्या प्रमाणात नफा कमवला जात असल्याची बाब पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस विविध औषधे कंपनीचे प्रतिनिधी कोकण विभागीय कृषी सहसंचालक तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना उपस्थित राहण्यास कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे.

  • 06 Apr 2026 08:25 AM (IST)

    हडपसर रेल्वे स्थानकावर १५३ कोटींचा खर्च…

    अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुणे रेल्वे विभागातील २० स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. त्यातील दोन स्थानकाचे उद्घाटन झाले असून, चार स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. अमृत भारत योजनेंतर्गत १५३ कोटी रुपये खर्च करून हडपसर कोचिंग टर्मिनल येथील यार्डची क्षमता आणि प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली आहे.

  • 06 Apr 2026 08:20 AM (IST)

    पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ६ लाख १५ हजार भाडेकरार नोंदणी…

    रोजगार, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे पुणे जिल्हा आता वास्तव्यासाठी राज्याचे मुख्य केंद्र बनत आहे. राज्यात सर्वाधिक भाडेकरार हे पुणे जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण १५ लाख ३१ हजार इतके भाडेकरार नोंदविण्यात आले. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात एकूण ६ लाख १५ हजार इतके भाडेकरार नोंदविले आहेत.

  • 06 Apr 2026 08:15 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये जादूटोण्याचा प्रयत्न फसला; तांत्रिकासह 4 आरोपी अटकेत

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये जादूटोण्याचा प्रयत्न फसला असून तांत्रिकासह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंजनगाव सुर्जी शहरातील अंबादेवी साखर कारखाना परिसरातील घटना आहे.  घटनास्थळी पोलिसांना खोदलेला खड्डा सोबत लिंबू, मिरची, हळद, कुंकू, बाहुल्या, हार-फुले तसेच खड्डा खोदण्यासाठी लागणारे टिकास, फावडे आदी जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास कारखान्यातील चौकीदाराला मंदिरासमोर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येताच तो घाबरून गेला आणि तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिस येण्यापूर्वीच तांत्रिकासह आरोपी तेथून पसार झाले होते.

  • 06 Apr 2026 08:10 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती उद्योगावर युद्धाचा परिणाम होणार

    गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने मुर्त्यांचे दर वाढणार आहेत.  लोखंड ५३ वरून ६५ रुपये किलो तर वीस किलोच्या कलर मागे तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. फायबर, कथा आणि इंधन महागल्याने उत्पादन खर्च वाढला. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे यंदा गणेश मूर्तींच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विदेशात जाणारी निर्यातही वाहतूक अडचणींमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील सुमारे २५ कारखान्यांमध्ये मूर्ती उत्पादन सुरू आहे.

  • 06 Apr 2026 08:06 AM (IST)

    जिल्ह्यात मार्चमध्ये 1407 हेक्टरवरील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान, प्राथमीक अहवाल शासनाकडे

    धाराशिव जिल्ह्यात मार्च व एप्रिल मध्ये ही अवकाळीने कहर केला असुन यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सलग पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागासह रब्बी हंगामातील बायागती व जिरायती पिकांचे मोठ नुकसान झाल आहे. याबाबत कृषी विभागाने मार्च महीन्यातील 1407 हेक्टरच्या नुकसानीचे पंचनामे केले असुन शासनाकडे प्राथमीक अहवाल पाठवला आहे. तर एप्रिल मधील नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महिला अधिकारी रडारवर आल्या आहेत. SIT तपासात या तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू अशोक खरातला मदत केली होती. त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला पाहिजे असलेली पोस्टिंग दिलेली. नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवारी 6 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पुण्यात पावसाळ्यात पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांच्या जीवाचे मालमत्तेचे आणि नदीचे संरक्षण करण्यासाठी पालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नदीपात्रा भोवती 168 सीसीटीव्ही चाळे निर्माण करणार आहे. या माध्यमातून पूरस्थितीवर उपाययोजना करण्याचे काम केले जाणार आहे. देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या ताज्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा…

 

Follow Us