आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर वीज पुरवठा खंडीत करु, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

| Updated on: May 26, 2021 | 11:26 PM

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वेळप्रसंगी आम्ही वीज पुरवठा खंडीत करु, असा इशारा महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिला आहे (Maharashtra power firm employees demand status of frontline workers).

आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर वीज पुरवठा खंडीत करु, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
एसईए संघटनेचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे
Follow us on

कल्याण (ठाणे) : राज्यभरात महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या, लसीकरण, कोविड मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांस 50 लाखाचा विमा आणि आरोग्यात विमात केलेले बदल पुन्हा पूर्वरत करण्यात यावे, अशी मागणी वीज कर्मचारी वर्गाने केली आहे. या मागणीसाठी कल्याणमध्ये वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागण्या पूर्व न झाल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे (Maharashtra power firm employees demand status of frontline workers).

वीज कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका काय?

वीज कर्मचाऱ्यांची एसईए संघटनेचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. “MSCB चे जे 86 हजार कर्मचारी आणि अभियंते आहेत त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात यावी, या मागणासाठी आम्ही राज्यभरातील सर्व आमदारांना भेटून निवेदन देत आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली Maharashtra power firm employees demand status of frontline workers).

“आमची सहा संघटनांची एक कृती समिती आहे. या कृती समितीने 24 मे पासून कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वीज पुरवठाही खंडीत होऊ शकतो. त्यामुळे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा, अशी आमची सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे. कर्मचारी आणि कुटुंब यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आम्ही मागणी करतो आहोत”, अशी भूमिका श्रीनिवास बोबडे यांनी मांडली.

प्रमुख चार मागण्या कोणत्या?

1) आम्हाला फ्रंटलाईन वर्कस म्हणून दर्जा द्या

2) ज्या कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन झालंय त्यांना 50 लाखांचं विमा कवच देणे

3) लसीकरणासाठी सरकार आणि प्रशासनाने जबाबदारी घ्यावी.

4) विमा पॉलिसीचा टीपीए न विचारता बदलला. तो आम्हाला पूर्ववत करावा.

हेही वाचा : सरकारने 1 जूनपासून व्यापाऱ्यांची दुकानं अन् बाजारपेठा उघडावीत, CAIT ची मागणी