
Raigarh Accident News : असं म्हणतात काळ आणि वेळ एकत्र आली की माणसाचं निधन होतं.. पण ती काळ आणि वेळ कोणाच्या आयुष्यात कधी येईल काहीही सांगता येत नाही. आता देखील असंच काही झालं आहे. सनरुफ असलेल्या कारमधून प्रवास करत असताना असं काही घडलं ज्यामुळे स्नेहल गुजराती नावाच्या महिलेचं निधन झालं. आपला मृत्यू असा होईल याची कधी स्नेहल हिने कल्पना देखील केली नसेल… सगळं ठीक होतं, हवामान उत्तम होतं, मार्गही परिपूर्ण होता. पण म्हणतात ना, जेव्हा मृत्यू येणार असतो तेव्हा तो शांतपणे येतो. मृत्यूशिवाय कोणालाही ते माहीत नाही.
स्नेहल हिच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. ती गाडीत बसली होती, पण तिला या दुर्दैवाची कल्पनाही करता आली नव्हती. स्नेहल हिच्या निधनाने सर्वत्र खळबळ माजली आहे. तर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. तर जाणून घेऊ तेव्हा नक्की काय झालं…
43 वर्षीय स्नेहल कारने आनंदाने प्रवास करत होती. पण ती ज्या सीटवर बसली होती त्यावर एक मोठा दगड पडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दगडाने गाडीचं सनरूफ फोडलं आणि आनंदी असलेल्या स्नेहलचं जागीच निधन झालं. स्नेहलच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कुठे घडली धक्कादायक घटना…
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मोठ्या दगडानं गाडीचं सनरूफ फोडलं आणि तो दगड महिलेच्या डोक्यावर पडला. यामुळे महिलेचं निधन झाल्याची घटना समोर आली. ही हृदयद्रावक घटना माणगाव-ताम्हिणी घाटावरील कोंडीथर गावाजवळ घडली आहे.
महिला कारमधून पुणे येथून माणगावच्या दिशेने प्रवास करत होता.. तेव्हा एका आलिशान कारच्या सनरूफमधून डोंगरावरून एक मोठा दगड कारवर पडला आणि गाडीचं सनरूफ तोडून महिलेच्या डोक्यावर कोसळला… यामध्ये महिलेचं निधन झालं आहे. ही घटना सनरूफ वापरणाऱ्या चालकांसाठी एक मौल्यवान धडा आहे.