AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून निघाले पण गावात पोहोचण्यापूर्वीच…; महाराष्ट्राला अपघातांचे ग्रहण, 24 तासांत 6 जणांचा अंत

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत लातूर, पुणे, भंडारा आणि नाशिकमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

घरातून निघाले पण गावात पोहोचण्यापूर्वीच...; महाराष्ट्राला अपघातांचे ग्रहण, 24 तासांत 6 जणांचा अंत
maharashtra accident
| Updated on: Jun 14, 2026 | 10:00 AM
Share

राज्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भीषण रस्ते अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर, पुणे, भंडारा आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये हे अपघात घडले. महामार्गावरील वाहनांचा अनियंत्रित वेग, ओव्हरटेकिंगचा प्रयत्न, रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा न आलेला अंदाज आणि चुकीच्या बाजूने वळण घेण्याची प्रवृत्ती यामुळे हे निष्पाप नागरिक अपघाताचे बळी ठरले आहेत. यातील काही घटनांमध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, भंडाऱ्यात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सर्व अपघातांची नोंद घेतली असून दोषी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे.

ट्रक-कार आणि दुचाकीचा विचित्र अपघात; पती-पत्नीसह १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातल्या चाकुरजवळ लातूर ते नांदेड महामार्गावरील अलगरवाडी क्रॉसिंग पॉईंटवर एक अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र अपघात घडला. एक भरधाव ट्रक, कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. जनार्धन येणगे (६०), सविता येणगे (५५), श्रेयस वाघमारे (१६) अशी तीन मृतांची नावे आहेत. येणगे दाम्पत्य आपल्या मोटरसायकलवरून तेलगाव या गावाकडे निघाले होते. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला आणि एका कारला जोरदार धडक दिली. या धडकेत येणगे दांम्पत्यासह कारमधील १६ वर्षीय श्रेयसचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चाकुर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळे अपघात

पुणे जिल्ह्यात रांजणगाव एमआयडीसी आणि राजगड परिसरात दोन मोठे अपघात झाले आहे. सुदैवाने यात जीवितहानी टळली असली तरी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये एक टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेच्या आवाजाने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच राजगडाच्या आंबवणे बोरावळे गावाच्या हद्दीत एक चारचाकी वाहन अचानक विरुद्ध दिशेला वळल्यामुळे समोरून येणारी भरधाव दुचाकी त्यावर थेट आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर ‘हिट अँड रन’; दोन वृद्धांचा जागीच मृत्यू

भंडारा – साकोली राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव येथे एक थरारक ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. महामार्गाच्या कडेने पायी फिरायला निघालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना एका अज्ञात भरधाव वाहनाने मागून जोरदार धडक दिली. कुंडलिक वालदे (६३), भिवा बोंदले (७०) अशी या दोघांची नावे आहेत. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कारणीभूत ठरलेले अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरतील CCTV च्या आधारे तपास सुरू आहे.

चांदवड येथे दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

नाशिकच्या चांदवड परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. यातील पहिला अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ येथे झाला. या ठिकाणी एका भरधाव कारने पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुलतान शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

तर दुसरा अपघात चांदवड येथील मेडिकल कॉलेजसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने एक मोटरसायकल वेगात उलटली. या अपघातात वंदना संजय डोंगरे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत. या महामार्गांवरून प्रवास करताना वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...