Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर, पहिला पेपर कधी? जाणून घ्या वेळापत्रक
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये इयत्ता बारावी आणि दहावीच्य लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा ही 8 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होईल. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपाासून सुरू होईल.
पहिला पेपर कधी?
बारावी लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027
दहावी लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या कालावधित घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच अंतिम वेळापत्रके जाहीर करण्यात आली आहेत. बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा ही 8 फेब्रुवारीपासून सुरू होईल. तर दहावीची लेखी परीक्षा ही 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाीर करण्यात आलं. परीक्षा देणारे विद्यार्थी हे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थावर जाऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाकडून आयोजित करण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. बोर्डाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागात फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने दिली. बारावी बोर्डाची प्रॅक्टिकल तोंडी परीक्षा ही 20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची प्रॅक्टिकल तोंडी परीक्षा ही 28 जानेवारी 2027 ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करावी लागणार आहे.