Eknath Shinde Shivsena : आमचा हक्क पाहिजे, नाहीतर..महायुतीत शिंदे शिवसेनेची आक्रमक भूमिका, भाजपवर राग
Eknath Shinde Shivsena : महायुतीत एकनाथ शिंदे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या मनातली खदखद नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. आम्हाला आमचा अधिकार पाहिजे असं म्हटलय.

महायुतीत अंतर्गत धुसफूस, संघर्ष वाढत चालला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीमधील वाद अधिक स्पष्टपणे समोर आला. भाजपंकडून बरोबरीची वागणूक मिळत नाही असा एकनाथ शिंदे शिवसेनेतील अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांनी या संदर्भातली आपली नाराजी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली आहे. शिंदे शिवसेनेच्या महिला नेत्या शायना एनसी यांनी देखील आपल्या मनातली नाराजी बोलून दाखवली. “शासन, प्रशासन, माजी खासदार आणि सध्याचे राज्यसभेचे खासदार यांना कार्यक्रमात डावलतात. हे योग्य नाही. आम्ही सगळ्यांचा सन्मान करतो, पण ते आमचा करत नाहीत हे योग्य नाही” असं शायना एनसी म्हणाल्या.
“एकनाथ शिंदे हे संयमी नेते आहेत, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना विचारा हे राजकारण का करत आहेत?” असं शायना एनसी म्हणाल्या. “अनेक कार्यक्रम झालेत, ज्यात शिवसेनेला डावलण्याचंच काम होतय. आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. आमचा हक्क पाहिजे, नाहीतर तो कसा मिळवायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे, आम्हाला काय करायचंय” असं शायना एनसी बोलल्या. गोकुळ मध्ये काय करायचं ते नेतृत्व ठरवेल असं शायना एनसींनी सांगितलं.
शिवसेनेची गळचेपी सुरूच
महायुतीत शिवसेनेची गळचेपी सुरूच आहे अशी पक्षातील नेत्यांनी एकनाथ शिंद यांच्याकडे तक्रार केली आहे. गेल्या वर्षभरात भाजपकडून कायम शासकीय कार्यक्रमात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना डावलण्याच्या प्रकारावर नेत्यांनी चिंता व्यक्त केली. संविधान बचाव पदयात्रा, नवी मुंबई एयरपोर्टवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर, कोलाब्यात घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम, वर्षावरील दुष्काळ बेठक यात नेत्यांना डावललं जात असल्याने नेते नाराज आहेत.
जे नियम होते ते तोडून शेतकऱ्यांना मदत
“एकनाथ शिंदे साहेब हा अत्यंत संवेदनशील नेता आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेले निर्णय, म्हणजे कायद्याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या बाबतीत एनडीआरएफचे जे नियम होते ते नियम तोडून सुद्धा शेतकऱ्यांना मदत केली” असं आमदार अर्जुन खोतकर म्हणाले. मराठवाड्यामध्ये अत्यंत अभूतपूर्व परिस्थिती आहे आणि त्यांनी जालन्यातल्या शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याच ठरवलेलं. शेतकऱ्यांसोबत संवाद साधना त्यांच्या वेदना जाणून घेणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणार.
