Kolhapur CCTV | रस्त्याने शांतपणे चाललेली महिला, कुत्रा मागून धावत आला आणि लचके तोडले

भटक्या कुत्र्याने महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर धावत तिच्यावर उडी घेत तिच्या शरीराचे लचके तोडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार पाहून काही जण धावत गेले आणि त्यांनी दांडक्याने कुत्र्याला पळवून लावलं.

Kolhapur CCTV | रस्त्याने शांतपणे चाललेली महिला, कुत्रा मागून धावत आला आणि लचके तोडले
कोल्हापुरात कुत्र्याचा महिलेवर हल्ला
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 12:28 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची (Stray Dogs) दहशत पाहायला मिळत आहे. भटक्या कुत्र्याने महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर तिचे लचके तोडल्याचं (Dog Attack) समोर आलं आहे. कोल्हापूरमधील (Kolhapur) विक्रम नगर ते टेम्बलाईवाडी परिसरात ही घटना घडली. हा प्रकार पाहून काही जण धावत गेले आणि त्यांनी कुत्र्याला पळवून लावलं. कुत्र्याने केलेल्या हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठ दिवसात शाळकरी मुलासह पाच जणांना भटक्या कुत्र्याने जखमी केलं आहे. त्यामुळे कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे.

भटक्या कुत्र्याने महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर धावत तिच्यावर उडी घेत तिच्या शरीराचे लचके तोडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार पाहून काही जण धावत गेले आणि त्यांनी दांडक्याने कुत्र्याला पळवून लावलं.

कोल्हापूरमधील विक्रम नगर ते टेम्बलाईवाडी परिसरात ही घटना घडली. कुत्र्याने केलेल्या हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

रामटेकमध्ये कुत्र्यांचा मुलीवर प्राणघातक हल्ला, 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

भावकीतील वाद, जंगलात दबा धरुन तलवार हल्ला, तिघे गंभीर जखमी

सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत, पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला