AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! TET पेपरफुटी प्रकरणात प्रकरणात पहिली मोठी कारवाई, 3 जण पोलिसांच्या ताब्यात

TET पेपरफुटीची माहिती समोर येतात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आता पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मोठी बातमी ! TET पेपरफुटी प्रकरणात प्रकरणात पहिली मोठी कारवाई, 3 जण पोलिसांच्या ताब्यात
TET Exam Paper LeakImage Credit source: Google
| Updated on: Jun 27, 2026 | 2:31 PM
Share

उद्या होणारा शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा भविष्यात काही दिवसांनी होण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीची माहिती समोर येतात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आता पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तिघेजण ताब्यात…

ठाण्यातील पेपर फुटीप्रकरणी आता पोलिसांकडून पहिली मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळी विरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली आहे. कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होत आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.

परीक्षा पुढे ढकलली

टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी, महाराष्ट्रातील एकूण 37 ठिकाणी 1728 केंद्रावरती जवळपास सहा लाख 125 विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा उद्या होणार होती. आता पेपर फुटी प्रकरणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडणे हा परीक्षा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या गैरप्रकाराची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याने उद्या 28 जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही

पुढे बोलताना प्रिया शिंदे यांनी म्हटले की, पेपरफुटी नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही, पुनर्परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. लवकर परीक्षा कधी होणार आहे याचं नियोजन लवकर कळवू. सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषींवर निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही. यामध्ये उमेदवारांचा दोष नाही. पुन्हा रजिस्ट्रेशन फी आकारणार नाही.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक