AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drought And Water Tanker : 635 गावं, 2447 वाड्या, राज्यात 800 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्याची सर्वाधिक होरपळ!

सध्या उत्तर महाराष्ट्रात एकूण 176 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक 15 तर अहिल्यानगर 161 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र एकूण 218 टँकरने सामान्यांना पाणी पुरवले जातेय.

Drought And Water Tanker : 635 गावं, 2447 वाड्या, राज्यात 800 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्याची सर्वाधिक होरपळ!
maharashtra drought and water tankerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 8:18 PM
Share

Drought And Water Scarcity : दुष्काळामुळे राज्या होरपळले आहे. आज राज्य सरकारने आणखी काही तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले. या घोषनेनंतर आता राज्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ही 305 वर गेली आहे. सोबतच सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीआधी 5000 रुपयांची अग्रीम मदत करण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ पडलेला असल्याने शेतकऱ्यांना मदत केली जाईल. सरकार कुठेही मागे पडणार नाही, असेही सरकारने सांगितले आहे. दरम्यान सरकार दुष्काळ निवारणासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत असताना दुसरीकडे दुष्काळाचे भीषण रुप समोर आले आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून शकडो गावं आणि हजारो वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातोय.

दुष्काळाची सर्वाधिक होरपळ मराठवाड्याला?

समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात 10 जिल्ह्यांतील 635 गावं आणि 2447 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय 15 आणि खासगी 768 टँकरने हा पाणीपुरवठा केला जातोय. सध्या पाण्याचे सर्वाधिक दूर्भिष्य हे मराठवाड्यात निर्माण झाले आहे. मराठवाड्यात सध्या सर्वाधिक 374 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 169 टँकर आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती टँकरने पुरवठा?

सध्या उत्तर महाराष्ट्रात एकूण 176 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक 15 तर अहिल्यानगर 161 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र एकूण 218 टँकरने सामान्यांना पाणी पुरवले जातेय. यात पुणे जिल्ह्यात सध्या 8 सातारा जिल्ह्यात 38, सांगली जिल्ह्यात 49 तसेच सोलापूर जिल्ह्यात 123 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. मराठवाड्यात सर्वाधिक 374 टँकरने पाणी पुरवले जातेय संभाजीनगरात 169, जालना जिल्ह्यात 29, बीड जिल्ह्यात 166 तर धाराशीवमध्ये 10 टँकरने पाणी पुरवले जातेय.

दरम्यान, सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच अगोदर पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. काटकसरीने वागावे असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता काही मोठ्या शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप