ZP Election Result, Panchayat Samiti 2026 LIVE : दत्तात्रय भरणे यांच्या मुलाचा विजय, म्हणाले विजयाचा आनंद पण…

Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti Election 2026 Results Live Counting Updates in Marathi : 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचे निकाल आज लागणार आहेत. नुकताच मतमोजणीला सुरूवात झाली.

ZP Election Result, Panchayat Samiti 2026 LIVE :  दत्तात्रय भरणे यांच्या मुलाचा विजय, म्हणाले विजयाचा आनंद पण...
Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti Election
| Edited By: | Updated on: Feb 09, 2026 | 11:10 PM

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय पक्षांनी म्हणाव्या तश्या सभा या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतल्या नाहीत. आता सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. नक्की जनतेने कोणाला मतदान करून विजयी केले हे अगदी काही वेळातच स्पष्ट होईल. हळूहळू करून निकालाचे अपडेट आपल्या हाती येतील. महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाबद्दलचे प्रत्येक अपडेट आपल्याला इथे tv9 मराठीवर बघायला मिळतील. मतमोजणी केंद्रावर कुठलाही गोंधळ होऊ नये, म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली. 12 जिल्हा परिषज आणि 125 पंचायत समितीचे निकाल लागणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Feb 2026 07:29 PM (IST)

    दत्तात्रय भरणे यांच्या मुलाचा विजय, म्हणाले विजयाचा आनंद पण…

    पंचायत समितीच्या निवडणुकीत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मुलाचा विजय झाला आहे. या विजयाबाबत बोलताना विजय मिळाला आहे याचा आनंद आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार हयात नाहीत याचे दुःखही आहे. विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. जनतेने आम्हाला स्वीकारलं. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. वडील दत्तात्रय भरणे आणि माझा आणखी संवाद झाला नाही. मात्र ते सर्वांचं कौतुक करतात माझंही करतील, अशा भ भावना दत्तात्रय भरणे यांच्या मुलाने व्यक्त केल्या.

  • 09 Feb 2026 07:27 PM (IST)

    अमरावतीत अजितदादांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली

    अमरावती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अमरावतीत सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.  या श्रद्धांजली कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. अमरावतीच्या सांस्कृतिक भवन मधील मैदानावर या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 09 Feb 2026 07:10 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल, कोणाला किती जागा मिळाल्या?

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल :

    भाजप : 23 + 2 पुरस्कृत = 25

    शिवसेना : 21 + 1 पुरस्कृत = 23

    शिवसेना UBT: 09

    NCP AP: 04

    NCP SP: 01

    काँग्रेस : 01

    अपक्ष : 01

  • 09 Feb 2026 05:55 PM (IST)

    धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला यश

    धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळाले आहे. अजितदादा यांच्या दुःखद निधनामुळे आम्ही जास्त प्रचारामध्ये सक्रिय नव्हतो. महायुतीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात दहा कलमी कार्यक्रम ठरवून जिल्ह्याचा विकास साधला जाईल असे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी म्हटले.

  • 09 Feb 2026 05:45 PM (IST)

    बेकायदा वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेला मायदेशी पाठवले

    जळगावातील धरणगाव येथे बेकायदा वास्तव्य करताना आढळून आलेल्या इराणी महिलेसह तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याची इराण देशात रवानगी. अनेक वर्ष भारतात राहिल्यानंतर दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यानंतर भारत देश सोडताना निरोप घेताना इराणी महिलेचे डोळे पाणावले होते, ती भावूक झाल्याचे पाहायला मिळालं

  • 09 Feb 2026 05:30 PM (IST)

    शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स- सुप्रिया सुळे

    शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स, सुप्रिया सुळे यांची माहिती. शरद पवार यांना छातीत कंजेशन झाल्याची सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 09 Feb 2026 05:15 PM (IST)

    ते आय सी यूमध्ये नाहीत; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रोहित पवारांची मोठी अपडेट

    गेल्या काही दिवसांपासून त्यांचे शारीरिक परिश्रम होत आहेत. कुठल्या ही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल मध्ये येऊ नये. हॉस्पिटलचे सगळे प्रोटोकॉल पाळावेत. आपल्यामुळे इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कुठला ही त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे रोहित पवार म्हणाले.

  • 09 Feb 2026 04:19 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम

    आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सिल्लोड तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी. अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व कायम असल्याच चित्र तर भाजप 2 ठिकाणी विजयी

  • 09 Feb 2026 04:17 PM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का

    मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का. राष्ट्रवादीचे जिलध्यक्ष उमेश पाटील यांचा 1 हजार 303 मतांनी पराभव. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा कुरुल जिल्हा परिषद गटात विजय

  • 09 Feb 2026 04:03 PM (IST)

    Latur Election Results 2026 : लातूर जिल्हा परिषदचे निकाल पाहा एका क्लिकवर..

    लातूर जिल्हा परिषद

    एकुण जागा-59/59

    भाजप-18

    शिवसेना-01

    राष्ट्रवादी-12

    ठाकरे गट-01

    शरद पवार गट -01

    काँग्रेस-23

    मनसे -01
    अपक्ष -02

    इतर-

    एकूण = 59

  • 09 Feb 2026 04:02 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्याताई मोटे आणि माधवी पडळकर यांच्यात काट्याची लढत

    आटपाडी तालुक्यातल्या निंबवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी आघाडीवर. माधवी पडळकर 630 मतांनी आघाडीवर. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विद्याताई मोटे आणि माधवी पडळकर यांच्यात काट्याची लढत

  • 09 Feb 2026 03:54 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : काँग्रेसच्या आशाताई काळे यांचा दोन मतांनी विजय

    काँग्रेसच्या आशाताई काळे यांचा अवघ्या दोन मतांनी विजय झाला आहे. अत्यंत चुरसीची लढत यादरम्यान बघायला मिळाली.

  • 09 Feb 2026 03:52 PM (IST)

    Sindhudurg Election Results 2026 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा डंका

    महायुतीने जिंकल्या एकूण ४० जागा

    कणकवली एकूण – ८ जागा

    भाजपा -6
    शिंदे सेना – 1
    अपक्ष – 1

    वैभववाडी एकूण ३ जागा

    भाजपा – 3

    कुडाळ – एकूण जागा

    भाजपा – 2
    शिंदे सेना – 5
    उबाठा – 1
    अपक्ष – 1

    वेंगुर्ला एकूण जागा ५

    भाजपा – 1
    शिंदे सेना -1
    उबाठा – 2
    अपक्ष – 1

    सावंतवाडी एकूण जागा ९

    भाजपा – 5
    शिंदे सेना – 1
    अपक्ष – 3

    देवगड एकूण जागा

    भाजपा – 7

    दोडामार्ग एकूण जागा 3

    भाजपा 2
    शिंदे सेना -1

    मालवण एकूण जागा ६

    भाजपा – 1
    सेना – 4

    50 / 49
    भाजपा – 27
    सेना – 13
    उबाठा – 3
    अपक्ष – 6

  • 09 Feb 2026 03:50 PM (IST)

    येळगाव उंडाळे गटात अजित दादांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तीन्ही उमेदवार विजयाकडे. उदयसिंह पाटील – उंडाळकर 3250 मतांनी आघाडीवर नितीन थोरात 487 मताने आघाडीवर. वृषाली पाटील 991 मताने आघाडीवर

  • 09 Feb 2026 03:43 PM (IST)

    Dharashiv ZP Election Result : धाराशिव : शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आप्पासाहेब पाटील यांचा विजय

    धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील आलूर मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तथा कोथळी गावचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील यांचा विजय झाला आहे. या ठिकाणी साडू विरुद्ध साडू अशी लढत होती. यात आप्पासाहेब पाटील यांनी विजय मिळवला आहे.

  • 09 Feb 2026 03:33 PM (IST)

    Pune ZP Election Result : अजित पवार यांनी शेवटच्या सभेत प्रचार केलेल्या उमेदवाराचा विजय

    पुण्याच्या खेड तालुक्यातील वराळे येथे झालेल्या शेवटच्या सभेत अजित पवार यांनी प्रचार केलेल्या जिल्हा परिषद उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांचा 399 मतांनी विजय झाला आहे.

  • 09 Feb 2026 03:18 PM (IST)

    ZP Election Result : PM मोदी आणि CM फडणवीसांच्या नेतृत्वात हा विजय – रवींद्र चव्हाण

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकास समोर येत आहेत. यात महायुती आघाडीवर आहे. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, PM मोदीजी यांनी प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी योजना आखल्या. फडणवीस हेही विकासकामे करत आहेत, त्यांच्या नेतृत्वात हा विजय संपादित झाला आहे. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा सर्वांनी महायुती म्हणुन काम केलं. 12 जिल्हापरिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल.

  • 09 Feb 2026 03:11 PM (IST)

    Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना खोकल्याचा त्रास, रुबी हॉल प्रशासनाची माहिती

    शरद पवार यांची तब्ब्येत खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे. यावर बोलताना रुबी हॉल प्रशासनाने सांगिलते की, शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.

  • 09 Feb 2026 02:56 PM (IST)

    Sangli ZP Election Result : आमदार सत्यजित देशमुख याची कन्या साईतेजस्वी देशमुख यांचा विजय

    सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. शिराळा तालुक्यातील भाजप आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख याची कन्या साईतेजस्वी सत्यजित देशमुख या कोकरूड जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत. साईतेजस्वी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षाचे विनोद पन्हाळकर यांचा 4700 मतांनी पराभव केला.

  • 09 Feb 2026 02:45 PM (IST)

    शरद पवार यांची तब्येत बिघडली, बारामतीहून थेट पुण्यात उपचार

    अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पवार कुटुंबिय बारामतीला आहेत. यादरम्यानच शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांना बारामतीहून पुण्याकडे आणले जात आहे. पुण्यातील रूबी हॉसमध्ये त्यांच्यावर उपचार केले जातील.

  • 09 Feb 2026 02:43 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : पैठणमधील नऊ पैकी आठ गटावर शिवसेनेचा विजय..

    पैठण / छत्रपती संभाजीनगर पैठण मधील नऊ पैकी आठ गटावर शिवसेनेचा विजयी तर एका गटात ठाकरे शिवसेना विजयी. पंचायत समितीच्या 18 पैकी 17 गणावर शिवसेना विजयी तर एक जागेवर राष्ट्रवादी विजयी. पैठणवर खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे पिता – पुत्राचे वर्चस्व कायम.

  • 09 Feb 2026 02:42 PM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results : करमाळा पंचायत समिती गणाचे 8 जागेचे निकाल जाहीर

    करमाळा 4 जिल्हा परिषद गटाचे निकाल जाहीर 4 जागेवर भाजपा + राष्ट्रवादी युतीचे चारही उमेदवार विजयी. भाजप + राष्ट्रवादी युतीचे – 6 उमेदवार विजयी. करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट ) – 02 जागेवर उमेदवार विजयी

  • 09 Feb 2026 02:41 PM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : पाटण पंचायत समितीची सत्तांतराकडे वाटचाल

    पाटण पंचायत समितीवर शिवसेना शंभूराज देसाई यांची सत्ता येणार. आतापर्यंत 14 पैकी सात जागा शिवसेनेने जिंकल्या

  • 09 Feb 2026 02:26 PM (IST)

    शरद पवार यांची तब्येत बिघडली, बारामतीहून पुण्याला आणले जात आहे

    शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांनी पुण्याच्या रूबी रूग्णालयात दाखल केले जात आहे. बारामतीहून त्यांना पुण्यात दाखल केले जात आहे.

  • 09 Feb 2026 02:23 PM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results : शरद पवार यांची तब्येत बिघडली, थेट…

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांचे अपडेट येत असून शरद पवार यांच्या तब्येत बिघडल्याची माहिती पुढे येत आहे.

  • 09 Feb 2026 02:06 PM (IST)

    Pune Election Results 2026 : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता

    एकुण जागा – ७३ पैकी ५५ जागा निकाल

    भाजप- ८
    शिवसेना- ४
    राष्ट्रवादी- ३९
    शरद पवार गट – १
    ठाकरे गट- ३
    काँग्रेस-०
    अपक्ष ०

    बहुमत ३७ चा आकडा केला पार

  • 09 Feb 2026 02:01 PM (IST)

    Zilla Parishad Election Results 2026 : आम्ही काम करतो टीका नाही- भरत गोगावले

    आम्ही काम करतो आम्ही टीका करत नाहीत, हा विजय जनतेचा आहे असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले.

  • 09 Feb 2026 01:58 PM (IST)

    अजितदादांना मत म्हणजे महायुतीलाच- चंद्रशेखर बानकुळे

    अजितदादांना मत म्हणजे महायुतीलाच मत चंद्रशेखर बानकुळे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालादरम्यान भाष्य केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला लोकांनी नाकारल्याचेही म्हटले.

  • 09 Feb 2026 01:50 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : पनवेलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा राडा..

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून पनवेलमध्ये मोठा राडा बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 01:45 PM (IST)

    Pune Election Results 2026 : पुण्यात अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल पुढे येत असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसरीकडे पुण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाची धमाकेदार कामगिरी बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 01:38 PM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर विजयी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर विजयी. बिरवटकर खेडमधल्या भडगाव जिल्हा परिषद गटातून विजयी. हा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल.

  • 09 Feb 2026 01:37 PM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : कन्नडमधील आकडेवारी जाणून घ्या..

    कन्नड (छत्रपती संभाजीनगर)

    दहाव्या फेरी अखेर आघाडी

    कन्नड एकूण जिल्हा परिषद गट 8

    धनुष्यबाण:- 1
    कमळ: – 3
    मशाल:- 0
    घड्याळ:- 1
    पंजा:- 2
    इतर: 1

    कन्नड एकूण पंचायत समिती गट 16

    धनुष्यबाण:- 6
    कमळ: – 6
    मशाल:- 0
    घड्याळ:- 1
    पंजा:- 1
    इतर: – 2

  • 09 Feb 2026 01:32 PM (IST)

    Latur Election Results 2026 : भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या मुलगीचा पराभव

    लातूरच्या चाकुर तालुक्यातल्या रोहिणा गटात, राष्ट्रवादीच्या उषा कांबळे विजयी, भाजपाच्या माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची मुलगी सुप्रिया शृंगारे पराभूत झाल्या आहेत.

  • 09 Feb 2026 01:31 PM (IST)

    Latur Election Results 2026 : लातूर जिल्हा परिषदची निवडणूक चुरसीची..

    लातूर जिल्हा परिषद निवडणूक भाजपा आणि काँग्रेस मध्ये चुरशीची लढत, दोघांनी प्रत्येकी 09 जागा जिंकल्या…अपक्ष आणि इतर ठरवणार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

  • 09 Feb 2026 01:28 PM (IST)

    Guhagar Election Results 2026 : गुहागरमधील 5 जिल्हा परिषद जागांचा विजयी निकाल

    विक्रांत जाधव विजयी (UBT) –
    प्रमोद गांधी विजयी (मनसे)
    महेश नाटेकर विजयी (शिवसेना)
    अपूर्वा बारगोडे विजयी (BJP )
    नेत्रा ठाकूर (शिवसेना )

  • 09 Feb 2026 01:27 PM (IST)

    Ratnagiri Election Results 2026 : रत्नागिरी जिल्हा परिषद विजयी

    एकूण जागा : 56 उमेदवार रिंगणात–151

    भाजप- 03
    शिंदे शिवसेना – 15
    राष्ट्रवादी अजित पवार गट- 0
    शिवसेना ठाकरे गट – 1
    काँग्रेस –
    राष्ट्रवादी शरद पवार गट -0
    मनसे -1
    अपक्ष – 0

  • 09 Feb 2026 01:24 PM (IST)

    अटीतटीच्या नेरूर जि.प मतदारसंघात भाजपचे बंडखोर रूपेश पावसकर यांचा विजय

    शिंदेसेनेचे उमेदवार माजी जि.प अध्यक्ष संजय पडतेंचा पराभव. नेरूर मध्ये भाजप बंडखोर रूपेश पावसकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने दिला होता पाठिंबा.ठाकरे सेनेच्या पाठिंब्यावर रूपेश पावसकर यांचा विजय

  • 09 Feb 2026 01:09 PM (IST)

    Sangli Election Results 2026 : खानापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरांचा करिष्मा

    जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 ही जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी. नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी शिवसेनेच्या उमेदवार डॉ.शीतल बाबर
    विजयी. शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाचा खानापूर तालुक्यात उडवला धुव्वा

  • 09 Feb 2026 01:08 PM (IST)

    उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून भाजपचे इंद्रजित पवार विजयी

    त्याचबरोबर नान्नज जिल्हा परिषद गटातून भाजपच्या चैताली मुळे विजयी. बी बी दारफळ गटात राष्ट्रवादीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांना पराभवाचा धक्का. दरम्यान वडाळा पंचायत समिती गणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार वैशाली शिलवंत विजयी. नान्नज गणातून भाजपचे सुनील भोसले, बी बी दारफळ गणातून सुनीता बारसकर, मार्डी गणातून तेजस्विनी बोराडे विजयी. उत्तर सोलापूर तालुक्यातील आतापर्यंत 2 जिल्हा परिषद गट आणि 3 पंचायत समिती गणात भाजपचा झेंडा  तर एका पंचायत समिती गणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार

  • 09 Feb 2026 01:07 PM (IST)

    Kolhapur Election Results 2026 : पाचगावमधून काँग्रेस उमेदवार संग्राम पाटील विजयी

    कोल्हापूरच्या पाचगावमधून काँग्रेस उमेदवार संग्राम पाटील विजयी झाली. अटीतटीची लढत बघायला मिळाली.

  • 09 Feb 2026 01:05 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : भाजपाच्या बड्या नेत्याची निकालावर थेट प्रतिक्रिया..

    पुणेकर जनतेला मी धन्यवाद देतो त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवून स्पष्ट बहुमत मिळवून दिले. त्यामुळे भाजपाचे महापौर आणि उपमहापौर पदावर बिनविरोध निवड झाली. पुणे एक वेगळ्या राजकीय संस्कृती शहर आहे त्या जपल्या जातात हे आज आपण पाहिले. अजित पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नुकतेच निधन झाले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. पुणेकर यांनी भाजपावर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ ठरवू. पुणे हे देशातील महत्वाचे शहर असून नागरिकांचे समस्या सोडवून शहर विकसित करण्याचा प्रयत्न आगामी काळात करू.

     

  • 09 Feb 2026 01:03 PM (IST)

    Latur Election Results 2026 : लातूर जिल्हा परिषदेचे अपडेट घ्या जाणून..

    लातूर जिल्हा परिषद

    एकुण जागा-59/31

    भाजप-10

    शिवसेना-01

    राष्ट्रवादी-05

    ठाकरे गट-

    शरद पवार गट -01

    काँग्रेस-11

    मनसे -01

    अपक्ष -02

    इतर-

    एकूण =31

  • 09 Feb 2026 12:58 PM (IST)

    Raigad Election Results 2026 : रायगडचे आकडे वाचा एका क्लिकवर…

    जिल्हा -रायगड (पंचायत समितीसाठी)
    पनवेल
    कर्जत – 3 भाजप
    खालापूर
    सुधागड – 1 भाजप
    पेण – 3 भाजप
    उरण
    अलिबाग – 2 शिंदे गट
    मुरुड – 1 (भाजप ) 1 राष्ट्रवादी अजित पवार
    रोहा- 5 (राष्ट्रवादी अजित पवार)
    तळा,= 4 (राष्ट्रवादी अजित पवार)
    माणगाव – 2 राष्ट्रवादी
    म्हसळा – 1 राष्ट्रवादी
    श्रीवर्धन – 1 राष्ट्रवादी
    महाड – 3 अजित पवार गट
    पोलादपूर 4 ( अजित पवार गट )

  • 09 Feb 2026 12:57 PM (IST)

    Solapur Election Results 2026 : सोलापूर जिल्ह्यांचे निकाल पाहा एका क्लिकवर…

    सोलापूर जिल्हा :

    – पंचायत समिती :

    करमाळा –
    – भाजप – 2
    – राष्ट्रवादी – 2
    – स्थानिक – 4

    माढा –
    – भाजप – 4
    – राष्ट्रवादी – 5

    बार्शी –
    भाजप – 10

    सोलापूर उ. –
    भाजप – 5
    राष्ट्रवादी – 1

    मोहोळ –
    राष्ट्रवादी – 4
    भाजप – 7

    पंढरपूर –
    भाजप – 8
    राष्ट्रवादी SP – 4

    माळशिरस –
    भाजप – 6
    राष्ट्रवादी 3

    सांगोला –
    – शिवसेना – 2
    – भाजप 1
    – स्थानिक आघाडी – 4

    मंगळवेढा –
    भाजप – 4
    स्थानिक आघाडी – 3

    सोलापूर द. –
    भाजप – 6
    काँग्रेस – 1

    अक्कलकोट –
    भाजप – 8
    शिवसेना – 2

  • 09 Feb 2026 12:55 PM (IST)

    करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विनायक मासाळ विजयी

    करगणी पं.स गणात शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय पाटील विजयी. माडगुळे पंचायत समिती गणातून भाजपाचे- दादासाहेब मोटे विजयी. खरसुंडी जिल्हा परिषद गटात शिंदेसेनेचे जयदीप भोसले विजयी. खरसुंडी पंचायत समिती गणात शिंदे सेनेच्या मीनाक्षी पुजारी विजयी. नेलकरंजी पंचायत समिती गणात शिंदेसेनेच्या सुनीता सरगर विजयी.

  • 09 Feb 2026 12:54 PM (IST)

    Sangli Election Results 2026 : सांगलीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष

    सांगलीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून धमाकेदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 12:52 PM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : शिंदेंच्या शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये धमाकेदार कामगिरी…

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल पुढे येत असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची धमाकेदार कामगिरी ठरली असून दोन नंबरचा पक्ष शिवसेना शिंदे गट ठरलाय.

  • 09 Feb 2026 12:50 PM (IST)

    वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंचे वर्चस्व

    वैभववाडी पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता. वैभववाडी पंचायत समितीचे सहापैकी सहा जागा भारतीय जनता पक्षाने मिळवेत क्लीन स्वीप दिला. भुईबावडा पंचायत समिती मध्ये भाजपचे देवानंद पालांडे विजयी. कोळपे पंचायत समिती मध्ये भाजपचे सुवर्णा संसारे विजयी. खांबाळे पंचायत समिती मध्ये भाजपचे मंगेश लोके विजयी. लोरे पंचायत समिती मध्ये भाजपचे सिध्देश रावराणे विजयी. उंबर्डे पंचायत समिती मध्ये भाजपचे साची कोलते विजयी. कोकिसरे पंचायत समिती मध्ये भाजपचे साधना नकाशे बिनविरोध.

  • 09 Feb 2026 12:45 PM (IST)

    Pune Election Results 2026 : भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती-पत्नी विजयी

    पती झेडपीच्या गटातून विजयी.. तर पत्नी पंचायत समितीच्या गणातून विजयी. भोरमधील भोंगवली-कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड विजयी.. तर त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून विजयी..

  • 09 Feb 2026 12:44 PM (IST)

    वैभववाडी जिल्हा परिषद मतदारसघात भाजपचे मंत्री नितेश राणेंचा करिश्मा

    वैभववाडीत तिन्ही मतदारसंघात भाजपचा झेंडा.कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे श्रावणी रावराणे. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे रिध्दी सुतार विजयी तर कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे प्रमोद रावराणे बिनविरोध निवडून आले होते.

  • 09 Feb 2026 12:43 PM (IST)

    Ratnagiri Election Results 2026 : रत्नागिरी पंचायत समितीमध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना शिंदे गट..

    रत्नागिरी पंचायत समिती – एकूण जागा 20 (1 बिनविरोध – शिंदे शिवसेना ) 19 जागांसाठी लढत

    शिवसेना (शिंदे) – 17
    शिवसेना (ठाकरे) –
    भाजप – 2
    काँग्रेस –
    राष्ट्रवादी (अजित पवार) –
    राष्ट्रवादी (शरद पवार ) –
    मनसे –

  • 09 Feb 2026 12:37 PM (IST)

    Pune Election Results 2026 : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा

    पुणे जिल्हा परिषदेचे निकाल येत असून पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा बघायला मिळतोय. अजित पवार यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता पुणे जिल्हा परिषदेचे निकाल पुढे येत आहेत.

  • 09 Feb 2026 12:36 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील झेडपीच्या दोन्हीही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

    विंझर-पानशेत गटातून अमोल नलावडे तर वेल्हा-वांगणी गटातून तानाजी मांगडे विजयी. वेल्ह्यातील दोन्हीही जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा

  • 09 Feb 2026 12:34 PM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : सांगली जिल्हा परिषद राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गटाने उघडले खाते

    वाळवा तालुक्यात उद्धव ठाकरेचे उमेदवार विजयी. उद्धव ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख अभिजीत पाटील चिकुर्डे जिल्हा परिषद गटातून झाले विजयी.

  • 09 Feb 2026 12:32 PM (IST)

    वीट पंचायत समितीचे निकाल वाचा…

    वीट जिल्हा परिषद गटात दुसऱ्या फेरीत मतांनी भाजपचे उमेदवार अश्विनी गणेश चिवटे 6589 मतांनी विजयी

    वीट पंचायत समिती गणाचे भाजपचे उमेदवार पूजा सचिन ढेरे 1100 विजयी

    हिसरे पंचायत समिती राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) गण भरत विठ्ठल अवताडे 2100 विजयी

    जिल्हा परिषद गट भाजप 1

    भाजप पंचायत समिती 1 गण

    राष्ट्रवादी पंचायत समिती 1 गण

  • 09 Feb 2026 12:29 PM (IST)

    Parbhani Election Results 2026 : परभणीमध्ये सुरेश वरपूडकर यांना मोठा धक्का

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल पुढे येत असून परभणीमध्ये वरपूडकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा मुलगा, मुलगी आणि सून यांचा पराभव झाला. फक्त पुतण्या विजयी झाला आहे.

  • 09 Feb 2026 12:27 PM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांच्या पत्नी विजयी…

    पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांच्या पत्नी रोहिणी कदम मोरगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी.

  • 09 Feb 2026 12:24 PM (IST)

    Zilla Parishad Election Tally 2026 : तानाजी सावंत यांचे दोन्ही पुतणे विजयी

    तानाजी सावंत यांचे दोन्ही पुतने विजयी झाले आहेत. भाजपाकडून

  • 09 Feb 2026 12:20 PM (IST)

    परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गटातून भाजपाच्या योगीता मोरे विजयी

    परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पुढे येत आहेत. या निकालात परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गटातून भाजपाच्या योगीता मोरे विजयी

  • 09 Feb 2026 12:18 PM (IST)

    ⁠Zilla Parishad Election Tally 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मोठा धक्का…

    जिल्हा परिषद आणि पंचायती समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला म्हणावी तशी कामगिरी करण्यात यश मिळाले नाही.

  • 09 Feb 2026 12:17 PM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : कागल तालुक्यातील निकाल पाहा..

    कागल तालुक्यातील नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी विजयसिंह भोसले विजयी. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील विजयी. भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या अर्चना कल्याण निकम विजयी

  • 09 Feb 2026 12:16 PM (IST)

    Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची धमाकेदार कामगिरी

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम दोन ठिकाणी आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएमने मोठी कामगिरी केली होती.

  • 09 Feb 2026 12:14 PM (IST)

    Solapur Election Results 2026 : सोलापूरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष

    सोलापूरमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. मात्र, महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाहीये.

  • 09 Feb 2026 12:12 PM (IST)

    Latur Zilla Parishad Election Results 2026 : लातूरमध्ये मनसेने उघडले खाते…

    लातूरच्या पानगावमध्ये मनसेने खाते उघडले असून नागरगोजे यांचा विजय झाला आहे. मनसेचा हा मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल.

  • 09 Feb 2026 12:08 PM (IST)

    भाजपचे निहाल काझी यांचा एका मताने पराभव, मोठा धक्का…

    ठाकरे सेनेचे अमर समुद्रे यांना 3187 मतं. भाजपचे निहाल काझी यांना 3186 मतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे फक्त एका मतानं विजयी झाले आहेत. धाराशिव- ढोकी पंचायत समिती गणातून ठाकरेंचे अमर समुद्रे विजयी.

  • 09 Feb 2026 12:07 PM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : शिवसेना ठाकरे गटाला मोठे अपयश…

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत असून या निवडणुकीच्या निकालात शिवसेना ठाकरे गटाला मोठे अपयश मिळाले असून पक्ष सहाव्या नंबरला आहे.

  • 09 Feb 2026 12:02 PM (IST)

    Pune zp election results : हीच दादांना श्रद्धांजली…

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले असून ही दादांना श्रद्धांजली असे म्हणताना उमेदवार दिसत आहेत.

  • 09 Feb 2026 11:54 AM (IST)

    Sillod Election Results 2026 : सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना धक्का…

    सिल्लोडची संपूर्ण जबाबदारी अब्दुल सत्तार यांच्याकडे होती. मात्र, अब्दुल सत्तार यांना धक्का बसला असून भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे.

  • 09 Feb 2026 11:52 AM (IST)

    ⁠Zilla Parishad Election Results 2026 : ग्रामीण भागात शिवसेना ठाकरे गटाची हवा गूल…

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पुढे येत असून ग्रामीण भागात ठाकरेंच्या शिवसेनाला मोठे अपयश मिळाला मिळत आहे. राज्यात फक्त सहा जागा आघाडीवर दिसत आहे.

  • 09 Feb 2026 11:48 AM (IST)

    Zilha parishad election result : एका मताने ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे विजयी..

    ठाकरे सेनेचे अमर समुद्रे यांना 3187 मतं. भाजपचे निहाल काझी यांना 3186 मतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे फक्त एका मतानं विजयी झाले आहेत.  धाराशिव- ढोकी पंचायत समिती गणातून ठाकरेंचे अमर समुद्रे विजयी

  • 09 Feb 2026 11:45 AM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी…

    पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.

  • 09 Feb 2026 11:35 AM (IST)

    Zilla Parishad Election Results 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे अपयश

    जिल्हा परिषदेचे निकाल हाती येत असून अजूनही शिवसेना ठाकरे गटाला खाते उघडण्यात यश मिळाले नाहीये.

  • 09 Feb 2026 11:31 AM (IST)

    Maval Election Results 2026 : मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर…

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धमाकेदार कामगिरी मावळमध्ये केली आहे. महायुतीच्या उमेदवारांची चांगली कामगिरी मावळमध्ये बघायला मिळत नाहीये.

  • 09 Feb 2026 11:28 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : भाजपासह शिवसेना ठाकरे गटाला मोठे यश

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पुढे येत आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत.

  • 09 Feb 2026 11:27 AM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results : भाजपाच्या पाटणकरांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पहिला विजय

    हेळवाक जिल्हा परिषद गट व गणात शिवसेना विजयी. हेळवाक जिल्हा परिषद उमेदवार अशोक पाटील उमेदवार मंगल माने येराड गणातील उमेदवार विद्या दिंडे विजयी

  • 09 Feb 2026 11:26 AM (IST)

    Solpur Election Results 2026 : सोलापूरमध्ये भाजपाने एकहाती सत्ता

    सोलापूरमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा बोलबाला सोलापूरमध्ये सुरू आहे.

  • 09 Feb 2026 11:24 AM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : राज्यातील नेत्याच्या नातेवाईकांची धमाकेदार कामगिरी

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून राज्यातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे नेत्याचे नातेवाईक या निवडणुकीत धमाकेदार कामगिरी करत आहेत.

  • 09 Feb 2026 11:19 AM (IST)

    Parbhani Election Results 2026 : परभणीत ठाकरे गटाला अत्यंत मोठा झटका…

    परभणी हा ठाकरेंचा बालेकिल्ला बघायला मिळतो. परभणीत मोठा झटका ठाकरेंच्या शिवसेनाला बसल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट 2 जागांवर आघाडीवर आहे.

  • 09 Feb 2026 11:15 AM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष..

    जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दमदार कामगिरी करताना भाजपा दिसत आहेत.

  • 09 Feb 2026 11:01 AM (IST)

    Zilla Parishad Election Results 2026 : राम सातपुते यांच्या पत्नी विजयी..

    नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत असून राम सातपुते यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत.

  • 09 Feb 2026 10:59 AM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : लातूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का…

    लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपाच्या हातून गेली आहे. लातूरमध्ये भाजपाने अत्यंत मोठी मुसंडी मारल्याचे बघायला मिळत आहे

  • 09 Feb 2026 10:56 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : बारामतीमध्ये अजित पवार यांचा मोठा पक्ष

    अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला असून बारामतीचे निकाल हाती येत असून अजित पवार यांच्या पक्षाची जोरदार कामगिरी बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 10:55 AM (IST)

    Zilla Parishad Election Tally 2026 : भाजपाचे तानाजी पाटील आघाडीवर…

    भाजपाचे तानाजी पाटील आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहेत. हळूहळू करून जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.

  • 09 Feb 2026 10:54 AM (IST)

    Maharashtra Election Results 2026 : धाराशिवच्या पंचायत समितीमध्ये भाजपा आघाडीवर…

    हळूहळू निकाल हाती येत असून धाराशिवमध्ये पंचायत समितीच्या निकालात भाजपा आघाडीवर आहे.

  • 09 Feb 2026 10:50 AM (IST)

    Maharashtra Zilla Parishad Election Results : धाराशिवमध्ये शिवसेनेने उघडले खाते…

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत असून धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने खाते उघडले आहेत.

  • 09 Feb 2026 10:48 AM (IST)

    काँग्रेसची कोल्हापूरमध्ये धमाकेदार कामगिरी…

    काँग्रेस तूफान कामगिरी करताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये धमाकेदार कामगिरी काँग्रेसने केली आहे.

  • 09 Feb 2026 10:40 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने

    भाजपचे राजेश जाधव पंचायत समितीमध्ये विजयी…

  • 09 Feb 2026 10:35 AM (IST)

    ⁠Maharashtra Zilla Parishad Election Results 2026 : लातूरमध्ये काँग्रेसची धमाकेदार कामगिरी…

    लातूरमध्ये भाजपाने गेल्या निवडणुकीत धमाकेदार कामगिरी केली होती. मात्र, यावेळी लातूरमध्ये काँग्रेस धमाकेदार कामगिरी करत आहे. काँग्रेसने पहिला विजय मिळवला आहे.

  • 09 Feb 2026 10:34 AM (IST)

    धाराशिव पंचायत समितीमध्ये भाजपाने खाते उघडले…

    धाराशिवस पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपा तूफान कामगिरी करत असून धाराशिव पंचायत समितीमध्ये भाजपाने खाते उघडले आहे.

  • 09 Feb 2026 10:29 AM (IST)

    कोकणात भाजपा सुसाट सुटली असून अनेक उमेदवार आघाडीवर..

    कोकणात भाजपाची दमदार कामगिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात बघायला मिळत आहे. भाजपा अनेक जागांवर आघाडीवर आहे.

  • 09 Feb 2026 10:28 AM (IST)

    धाराशिव मतमोजणी केंद्रावर गोंधळ, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये गोंधळ

    उमेदवार प्रतिनिधीला ही आत मध्ये सोडलं जात नसल्याचा आरोप. तासाभरापासून आम्हाला गेटवरच अडवला असल्याचा आरोप प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आम्ही बाहेर आहोत. आम्हाला गेटवर ठेवूनच सत्ताधारी पक्षाकडून निकाल लावायचा आहे का संतप्त सवाल

  • 09 Feb 2026 10:27 AM (IST)

    कराडला मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची

    दहा वाजता आलेल्या उमेदवाराला मतमोजणी केंद्रावर प्रवेश नाकारला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला अडवले. निवडणूक निर्णय अधिकारी मनमानी करत असल्याचा थेट आरोप

  • 09 Feb 2026 10:26 AM (IST)

    सोलापूरमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी

    सोलापूरमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा तब्बल 7 उमेदवार आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 10:23 AM (IST)

    जिल्हा परिषदेचा पहिला निकाल पुढे, अजित पवारांच्या पक्षाची बाजी..

    माढ्यामध्ये जिल्हा परिषद भोसरे गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी दळवी विजयी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दळवी यांनी ही निवडणूक लढवली होती.

  • 09 Feb 2026 10:20 AM (IST)

    रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची मोठी आघाडी…

    रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत असून शिंदेंची शिवसेना आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचा जोरदार दणका बघायला मिळतोय.

  • 09 Feb 2026 10:17 AM (IST)

    लातूरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी…

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पुढे येत आहेत. लातूरमध्ये सुरूवातीच्या निकालात काँग्रेस आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 10:15 AM (IST)

    जिल्हा परिषद आण पंचायत समितीचे निकाल येत असून सांगलीमध्ये गेम पटल्याचे चित्र आहे

    सांगलीमध्ये गेम पटला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल पुढे येताना दिसत आहेत.

  • 09 Feb 2026 10:13 AM (IST)

    परभणीमध्ये पिंगळी गटात ठाकरेंची शिवसेना आघाडीवर..

    परभणीमध्ये पिंगळी गटात ठाकरेंची शिवसेना आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.

  • 09 Feb 2026 10:12 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्टल व EVM मतमोजणीला सुरुवात

    छत्रपती संभाजीनगर मध्ये 63 जिल्हा परिषद गट व 126 पंचायत समिती गणासाठी मतमोजणीला सुरुवात. छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊ ठिकाणी होणार जिल्हा परिषदगट व पंचायत समितीची गणाची मतमोजणी.  छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतमोजणी केंद्रावर 18 टेबलवर 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणासाठी मतमोजणी सुरू

  • 09 Feb 2026 10:12 AM (IST)

    परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची कमाल…

    परभणीमधील एका जागेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आघाडीवर आहे. परभणी हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ल मानला जातो.

Follow Us