
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी आहेत. मात्र, काही वेळातच अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी पुढे आली. अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते शेतात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी 8 वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आज त्यांच्या चार महत्त्वाच्या निवडणूक प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी (Landing) सज्ज झाले असतानाच अपघात झाला. कार्यकर्त्ये अजित पवार बारामतीमध्ये येणार म्हणून उत्साही होते. मात्र, यादरम्यानच हा धक्कादायक अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे काल बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये निधन झाले. पुण्यातही व्यापारी संघटनेकडून आज शहरात बंदची हाक देण्यात आलेली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड कायमच गजबजलेलं असतं मात्र आज मार्केट यार्ड बंद असल्याने निरव शांतता या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले, “अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. ही आपल्यासाठी एक दुःखद घटना आहे. महाराष्ट्रातील जनता पूर्ण शोकात आहे. माझे त्यांच्याशी वैयक्तिक नाते होते. आमचे कुटुंब त्यांना कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्रातील एक धर्मनिरपेक्ष नेता आपल्याला सोडून गेला आहे, त्याची भरपाई कोणीही करू शकत नाही. या दुःखाच्या वेळी सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. अंत्ययात्रा उद्या सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील.”
अजितदादांचे पार्थिव शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात आणले आहे. सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार तिघेही सहवास सोसायटीतील निवासस्थानी गेले. रात्रभर अजित पवारांचे पार्थिव शवागृहात ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “त्यांचे निधन महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. मी श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे आलो आहे. अजित दादांसोबत माझे खूप चांगले संबंध होते. ते कामात खूप सक्रिय होते. विकास व्हावा ही त्यांची दृष्टी होती, म्हणूनच ते महायुतीसोबत आले.”
अजित पवार यांच्या मृत्यूवरून हलक्या दर्जाचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आणि त्यांचे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, येथे कोणीही सुरक्षित नाही.
#WATCH मुंबई: पश्चिम बंगाल की CM ममता बनर्जी के द्वारा उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन पर दिए गए बयान पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, “यह बहुत दुखद है। वरिष्ठ नेता शरद पवार ने खुद बहुत स्पष्ट तौर पर कहा है कि एक हादसा हुआ और दुखद मौत हुई है इस पर राजनीति न की… pic.twitter.com/fdHkztr3ks
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2026
अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या आधी अजित दादांचं पार्थिव रुग्णालयात नेण्यात येणार आहे. यासाठी जय आणि पार्थ पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं. तसेच कार्यकर्त्यांना घरी जाण्याचं आवाहन करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अचानक निधन झाल्याच्या बातमींना कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. अजित दादांचं पार्थिव पुन्हा रूग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये उद्या दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्याच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर वाल्मिक कराडच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी-विकासासाठी पळनार? आता DADA is love आम्ही कोणाला म्हणणार ? DADA पोरके झालोत ! महाराष्ट्रच्या DADA ला भावपूर्ण श्रद्धांजली. जबतक सुरज चाँद रहेगा अजित दादा आपका नाम रहेगा !”, अशी पोस्ट वाल्मिक कराडच्या मुलाने केली आहे.
राजकीय नेत्यांकडून अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे. अजित दादांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात ठेवण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असणार आहेत.
माझा अजित दादांसोबत 22 वर्षांपासून संबध आहे. 22 वर्षांपासून संबंध असलेले अजित दादा आपल्यात नाहीयेत ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक-कौटुंबिक हाणी असल्याचं मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“अजित दादा आपल्यात नाही, यावर अजून देखील विश्वास बसत नाही. दादांचा आता देखील फोन येईल अस वाटतं. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आणि महाराष्ट्रात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अनेक गोष्टी केल्या होत्या”, असं म्हणत बावनकुळे यांनी दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृ्त्यूमुळे राजकीत विश्वावर दुखाचा डोंगर कोसळलाय. अजित दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित दादांवर गुरुवारी बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दादांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आणण्यात आले आहे. या जागेवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. अजितदादांचे दर्शन घेण्यासाठी अलोट जनसागर जमा झाला आहे.
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात ठेवले जाणार आहे. अजितदादांचे पार्थिव त्या दिशने निघाले आहे. रस्त्यावर लोकांची दुतर्फा गर्दी झाली आहे.
अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. अजितदादांच्या पार्थिवाला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाच्या दिशेने निघाले आहे. अजितदादांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी शोक व्यक्त केला आहे. अतिशय कर्तृत्ववान असा माणूस आपल्यातून निघून गेला. समर्थपणाने नेतृत्व करणारी व्यक्ती निघून गेली. त्यामुळे अत्यंत दुःख होत आहे, अशी भावना संभाजी भिडे यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीत बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात त्यांच्या नंदनवन या मुंबईतील निवासस्थानी पोहचत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत ते यावेळी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुग्णालयातून बाहेर काढण्यात येणार आहे. बारामतीच्या शासकीय रुग्णालयात पवार कुटुंबीय जमले आहेत. बारामतीत हजारो लोकांचा जनसागर जमा झाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे, विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला, दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा निव्वळ अपघात आहे, यात राजकारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे, तसेच अजित पवार यांच्यामुळे झालेलं महाराष्ट्राचंं नुकसान कधीही भरून निघणार नाही, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पुण्यात दु:खाचं वातावरण, नागरिक भावुक
कार्यकर्त्यांकडून बॅनरच्या माध्यमातून अजित पवार यांना श्रद्धांजली
कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी
अजितदादा आपल्यातून निघून गेलेत, यावर अजूनही विश्वास बसत नाही – कदम
ही जनतेची मोठी हानी झाली आहे – कदम
दादांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे – कदम
प्रशासनावर मजबूत पकड कशी असावी, हे दादांनी कायम दाखवून दिले – कदम
मंत्री म्हणून जनतेची सेवा कशी करावी, याचे मार्गदर्शन त्यांनी दिले – कदम
अशा अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्वाचा अभाव कायम जाणवेल – कदम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या बंद राहणार आहेत. पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी गावावर अजित पवार यांचं विशेष प्रेम होतं, याच काटेवाडी गावात अजित दादा लहानाचे मोठे झाले. मात्र आज विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे.
‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. प्रशासनावरील पकड आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख सर्वांनाच माहित आहे, पण त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. कोरोनाच्या कठीण काळात, जेव्हा मी आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा प्रश्न घेऊन त्यांना भेटलो होतो, तेव्हा त्यांनी कोणताही राजकीय भेद न ठेवता आमचा विषय अत्यंत संयमाने ऐकून घेतला होता. केवळ ऐकूनच घेतले नाही, तर ‘दोन दिवसांत कॅबिनेटमध्ये निर्णय होईल’ हा दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि हजारो आरोग्य दूतांना न्याय मिळवून दिला. लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची ती धडाडी आणि कामाचा वेग मला जवळून अनुभवता आला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड तसेच प्रभावी व्यक्तिमत्त्व हरवले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. अजित पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏 ‘ असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. पहाटे 6 ते 9 पर्यंत घेता अंत्यदर्शन घेता येणार आहे.
अपघाताच्या काही वेळ अगोदर अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटने साधला ATC शीसोबत संपर्क. रनवे दिसत नसल्याची केली तक्रार, त्यानंतर हवेत विमानाने घिरट्या घेतल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या राहणार बंद.अजित पवार दुःखद निधनाने व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उद्या पुणे शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा पुणे व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आला निर्णय.
अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव नेण्यासाठी शववाहिनी दाखल. थोड्याच वेळात अजित पवारांचे पार्थिव नेले जाणार आहे. अंत्यदर्शनासाठी अजित पवार यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे.
सिव्हिल एव्हिएशनचे पथक बारामतीत दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला. विविध चर्चा अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरू आहेत. सविस्तर चाैकशी या अपघाताची केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
ही केवळ एका नेत्याची नाही, तर जनतेची मोठी हानी आहे. दादांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. प्रशासनावर मजबूत पकड कशी असावी, हे दादांनी कायम दाखवून दिले. मंत्री म्हणून जनतेची सेवा कशी करावी, याचे मार्गदर्शन त्यांनी दिले. अशा अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्वाचा अभाव कायम जाणवेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. यावेळीचा फोटो पुढे आलाय.
सायंकाळी 5 वाजल्यापासून अजित पवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान लोकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
व्हिजिबिलिटी कमी असल्याने विमान अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. व्हिजिबिलिटी कधीही बदलू शकते. पायलटने लॅंड करण्याच्या अगोदर पहिली चक्क मारली होती, त्यानंतर अचानक विमान खाली आले.
सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणार अंत्यसंस्कार..पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत अजित पवार यांचे पार्थिव ठेवलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात निधनानंतर पुण्यात महाराष्ट्राचा धुरंदर नेता हरपला अशा आशयाचे बॅनर… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात दुःखद वातावरण… कार्यकर्त्यांकडून बॅनरच्या माध्यमातून अजित पवार यांना श्रद्धांजली….
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन दिवस पुणे बंद राहणार आहे. महापालिका आयुक्तांनी थेट तसे आदेश काढली आहेत.
अजित पवार सकाळी 8.10 मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले. बारामती विमानतळाच्या अगदी जवळ हा विमान अपघात झाला. विमानाचा अपघात होताच मोठा स्फोट झाला.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल झाले असून ते रूग्णालयात गेले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर सोलापूर जिल्ह्यातील आमदार बारामतीत दाखल. अजित पवारांच्या आठवणी सांगताना उमेश पाटील धाय मोकलून रडले आहेत. बारामतीला स्वर्ग बनवणारा नेता आमच्यातून गेला. प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष ठेवणारा, नेता हरपला.. असे म्हणताना उमेश पाटील दिसले.
शिस्तप्रिय आणि वेळ पाळणारा नेता आज आमच्यातून गेला याचे अतीव दुःख आहे. मंत्रिमंडळात पण ते अतिशय शिस्तीने कामकाज चालवत होते. आज ते आमच्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.
बारातमीमध्ये उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
अजित पवार यांच्या निधनानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना फोन केला आहे. यावेळी दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील युवा नेत्यांचे प्रचंड नुकसान आणि जनतेची मोठी हानी. दादांच्या मृत्यूची बातमी ही मन सुन्न करणारी. प्रशासनावर कशा पद्धतीने पकड पाहिजे मंत्री म्हणून कशा पद्धतीने जनतेची सेवा केली पाहिजे असे मार्गदर्शन देणारे अजित दादा आपल्यातून निघून जाणार म्हणजे मनाला वेदना देणारे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात बारामतीत झाला आणि त्यांचे निधन झाले.
विमान अपघातानंतर तीन ते चार मोठे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ पुढे आला असून विमान आकाशात घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर विमान जमिनीवर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. मात्र, पुन्हा तीन ते चार स्फोट झाल्याचे सांगितले जाते.
सुनेत्रा पवार या काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांच्यासोबत बारामतीमध्ये दाखल झाल्या. बारामतीमध्ये दाखल होताच सुनेत्रा पवार या ढसाढसा रडताना दिसल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंबियांना धक्का बसला. सर्वजण बारामतीत दाखल झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांचा आक्रोश. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे दादा आम्हाला पोरका करून निघून गेले. अशा भावना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केल्या
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीच्या शारदा मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पवार कुटुंबिय बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे सांगितले गेले. आता उद्या बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. सर्वजण रूग्णालयात दाखल झाले आहेत.
शरद पवार रूग्णालयात दाखल झाले असून अजित पवार यांचे पार्थिव बारामतीच्या रूग्णालयात ठेवण्यात आलंय. पवार कुटुंबिय बारामतीकडे रवाना होत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा आक्रोश बघायला मिळत आहे.
अजितदादांच्या निधनाचा जळगावातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी प्रचंड आक्रोश केला. अजित दादांच्या जाण्याने घरातला कर्ता पुरुष गेला असं वाटतंय… माझ्यावरच भावासारखे प्रेम केलं, महाराष्ट्रासाठी खूप वाईट घटना ..काय बोलायचे कोणाकडे पाहायचं आता, या शब्दात जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आक्रोश करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे…
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ पुढे आला असून सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अपघात किती जास्त भयंकर होता. विमान खाली येता आगाची भडका उडाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नक्की कसा झाला, हे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. विमानाने आकाशात घिरट्या घातल्या आणि वेगाने विमान खाली येऊन मोठा स्फोट झाल्याचे सांगितले जाते.
अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानेही प्रतिक्रिया दिली असून राज्याचा चांगला नेता आपल्यातून निघून गेल्याचे सचिन तेंडुलकर यानी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले असून बारामती विमानतळावर लॅंड करताना हा अपघात झाला. अपघात नेमका कसा झाले हे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. यादरम्यान अपघातस्थळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.
अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा आक्रोश बघायला मिळत आहे. लोक रूग्णालयाबाहेर जमत आहेत.
रूपाली चाकरणकर या रूग्णालयात दाखल झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनाबद्दल कळताच लोकांनी बारामतीकडे धाव घेतली
अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये मोठा अपघात झाला. ज्यानंतर अजित पवार यांचे निधन झाले. बारामतीमध्ये रूग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश बघायला मिळत आहे. आम्ही पोरके झाल्याचे म्हणताना लोक दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर बोलताना म्हटले की, माझा मोठा भाऊ हरपला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उद्या संसदेत शोकसभा असणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
शरद पवार नुकताच बारामतीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच शरद पवार मुंबईहून पत्नीसोबत बारामतीकडे निघाले होते.
माझा दमदार मित्र मला सोडून गेल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. कालच मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विषयावरून एक बैठक झाली.
राज्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र सह देशाला मोठा धक्का बसला-एकनाथ खडसे. त्यांच्या अचानक जाण्याने राष्ट्रवादी पक्षाची मोठी हानी झाली. अजित दादांच्या अचानक जाण्याची बातमी पाहिल्याने मला मोठा धक्का बसला -एकनाथ खडसे
अजित पवार यांचे निधन विमान अपघातामध्ये झाले असून बारामतीकडे सर्वजण रवाना होत आहेत. यादरम्यान कार्यकर्त्यांनी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
धडाडीचा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. अजित पवार यांचे निधन विमान अपघातात झाले. बारामतीच्या शेतात त्यांचे विमान कोसळले. अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी थेट बारामतीकडे धाव घेतली. यादरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाचा खूप जास्त आवाज येत होता, त्यामुळे आम्ही बाहेर आलो. नेहमीपेक्षा खूप वेगळा आवाज येत होता.
अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारसोबत माझे बोलले झाले अशा गोष्टीवर मन विश्वासच ठेवत नाही.
अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रूग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश केला असून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सध्या बघायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणाची सविस्तर चाैकशी ही केली जाणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी उद्धवस्थ अशी व्हॉटसअपवर शेअर केली, यावरून सुप्रिया सुळे यांनी किती मोठे दु:ख कुटुंबावर कोसळले हे थेटपणे सांगितले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी आपले अनुभव सांगितले असून त्यांनी सांगितले की, विमान एकदा गोल फिरून आले आणि कोसळले. अगोदर विमानातून मोठा आवाज येत होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुप्रिया सुळे यांनी थेट उद्धवस्थ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवले आहे.
मुंबईहून शरद पवार हे पत्नीसोबत बारामतीकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्यासोबत दिल्लीहून बारामतीकडे निघाल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाबद्दल कळताच लोकांनी बारामतीकडे धाव घेतली आहे. मोठी गर्दी रूग्णालयाबाहेर झालीये.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर धक्कादायक खुलासे होत असून विमान अपघातावेळी नक्की काय घडले, हे लोकांनी सांगितले आहे. विमानाचा प्रचंड मोठा आवाज येत होता आणि अचानक विमान खाली आले, दोन आम्ही अजित पवार यांना ओळखले…
अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी बारामतीमध्ये केली आहे. अजित पवार यांचा मुलगा जय पवार हा रूग्णालयात दाखल झाला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा रडतानाचा व्हिडीओ पुढे आला असून वडील गेल्यानंतर माझ्यासारख्याला वडील नसल्याची जाणीव कधी त्यांनी होऊ दिली नाही, असे म्हणतानाचा धनंजय मुंडे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर रोहित पवार रडत रडत रूग्णालयात पोहोचले आहेत. मोठी गर्दी रूग्णालयाबाहेर झाल्याचे बघायला मिळत आहे.
अजित पवार यांचा विमान अपघात नेमका कसा झाला हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यांनी म्हटले की, विमानाने एक घिरटी घेतली होती आणि दुसरी घिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडले आणि मोठा अपघात झाला. अजित पवार यांना आम्ही सर्वात अगोदर बाहेर काढले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विमान अपघातावेळी नेमके काय घडले हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्यांनी सांगितले की, अपघातानंतर दोन बॉडी स्फोटानंतर उडून बाहेर आल्या. गॉगल आणि घड्याळावरून आम्ही अजित पवार यांना बाहेर काढले आणि त्यांना मदत केली.
अपघातावेळी नेमके काय घडले, हे सांगताना प्रत्यक्षदर्शी दिसत आहेत. विमान जमिनीवर पडल्यानंतर खूप मोठा अपघात झाल्याचे सांगताना प्रत्यक्षदर्शी दिसत आहेत.
विमान अपघाताच्या ठिकाणी बारामतीकरांनी केली अत्यंत मोठी गर्दी. लोक अपघात नेमका कसा झाला हे बघण्यासाठी पोहोचले आहेत.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवारांचे जाणे धक्कादायक आहे, असे थेट म्हटले आहे. यावेळी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना नरेंद्र मोदी दिसले आहेत.
Saddened by the tragic air crash in Baramati, Maharashtra. My thoughts are with all those who lost their loved ones in the crash. Praying for strength and courage for the bereaved families in this moment of profound grief.
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी व्हाटसअप स्टेटस ठेवत उद्धवस्थ म्हटले आहे.
आमदार विजयसिंह पंडित बीडमधून बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने बारामतीकडे निघाले आहेत.
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी उद्धवस्थ असे व्हाटसअप स्टेटस ठेवले आहे.
अजित दादाच्या निधनाची बातमी पाहून दादाच्या राष्ट्रवादीचे आमदार धायमोकुळून रडले. राष्ट्रवादीचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अश्रूंना वाट करून दिली मोकळी. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर, लोकसभेला भाजपाकडून पराभव झाल्यानंतर चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत केला होता प्रवेश