AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसतं लाडकी बहीणचा जप चाललाय, राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित – राऊतांनी फटकारलं

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर महिलांच्या सुरक्षेबाबत तीव्र टीका केली आहे. रक्षा खडसे प्रकरणाचा उल्लेख करून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महिला सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही केली.

नुसतं लाडकी बहीणचा जप चाललाय, राज्यात केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित - राऊतांनी फटकारलं
संजय राऊतांची सरकारवर कडाडून टीका
| Updated on: Mar 03, 2025 | 10:55 AM
Share

महाराष्ट्रात तुम्ही सत्तेचा बळावर काय पेरताय ? हे सगळे लोक, जिथे सत्ता तिथे बलात्कारी, खुनी आणि व्यभिचारी. राज्यात जर केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातील लेकीबाळींची काय परिस्थिती असेल ? नुसतं लाडकी बहीण, लाडकी बहीण करून, लाडका भाऊ करून काय उपयोग ? नुसते खुळखुळे वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. रोज लाडक्या बहिणीची विनयभंग होतोय, रक्षा खडसे यांच्या घरातील घटनेमुळे हे परत एकदा समोर आलं आहे, असे म्हणत राऊतांनी सरकारला कानपिचक्या दिल्या.

तुम्ही काय करताय ? बीडमध्ये ज्यांचा खून झाला त्यांची पत्नी आणि मुलगी पुन्हा उपोषणाल बसत आहेत, ती तुमची लाडकी बहीण नाही का ? असा सवालही राऊतांनी विचारला.

त्यासाठीच ते अमित शहांना भेटले

अर्थसंकल्पीय अधइवेशनापूर्वी काल झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एकनाथ शिंदेंनी एक विधान केलं होतं. “सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे, असं एकनाथ शिंदे (फडणवीसांकडे बोट दाखवत) म्हणाले. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे,नो टेन्शन.” अशी टिप्पणी शिंदेनी केली होती. त्यावरून राऊतांनी शिंदेंना सुनावलं. ती ( मुख्यमंत्रीपदाची) खुर्ची बदलू नये, कायम रहावी यासाठीच शिंदे हे मध्यंतरी अमित शहांना भेटले होते. पण ती खुर्ची तात्पुरती असल्याचे शहांनी त्यांना सांगितलं होतं. आणि ती खुर्ची कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा, असेही अमित शहांनी शिंदेंना सांगितल्याचा दावाही राऊतांनी केला.

ही बातमी अपडेट होत आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?