AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गांधींजींचा देशातील सर्वात उंच पुतळा महाराष्ट्रात, 35 टन भंगार वापरुन निर्मिती

पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात महात्मा गांधी चालत असतानाची भावना दडली (Wardha Mahatma Gandhi statue) आहे.

गांधींजींचा देशातील सर्वात उंच पुतळा महाराष्ट्रात, 35 टन भंगार वापरुन निर्मिती
| Edited By: | Updated on: Mar 04, 2020 | 7:31 AM
Share

वर्धा : देशाला ‘पुनर्निर्माण’ आणि सर्वोदयाचा विचार देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारालाच जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न सेवाग्राम विकास आराखड्यात प्रशासनातर्फे केला जात (Wardha Mahatma Gandhi statue)  आहे. चक्क जुन्या गाड्यांच्या भंगारातून महात्मा गांधी यांची प्रतिकृती साकार होत आहे. यासोबतच आचार्य विनोबा भावे यांची देखील प्रतिकृती आहे. गाडीचे छोट्यात छोटे भंगार असलेले स्पेअर पार्टसह जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या हातांची मिळालेली जोड यासाठी मिळाली आहे.

वर्धा शहराचा एम आय डी सी परिसर येथे उभे असलेले स्ट्रक्चर आणि बाजूला पडून असलेले गाड्यांचे भंगार स्पेअर पार्ट पाहून पाहणाऱ्यालाही असं वाटतं. इथं चाललंय तरी काय? भंगाराच्या 35 टन गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यातच सर्वोदयी विचार देणारे महात्मे लपले आहेत. याच भंगार कचऱ्यापासून सर्वोदयी विचारांचे पुनर्निर्माण होत आहे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत.

महात्मा गांधी यांचा 30 फूट उंचीची प्रतिकृती तयार होत आहे. एक्सपायर झालेल्या गाडीतील चेसिस, शॉकअप, बेअरिंग, स्पोक, बोल्ट, डिस्क, व्हील, क्रेन्क, यू बोल्ट आणि पट्टे याचा वापर हा पुतळा उभारला जात आहे. वापरण्यापूर्वी हे स्पेअर पार्ट रॉकेलमधून धुऊन काढले जातात. त्यांनतर ते जसेच्या तसे वापरण्यात येतात. गेल्या तीन महिन्यांपासून या पुतळ्याचे काम सुरु आहे. पुढील एका महिन्यात हे काम पूर्ण होणार असून हा पुतळा सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात महात्मा गांधी चालत असतानाची भावना दडली (Wardha Mahatma Gandhi statue) आहे.

चार चाकी गाडीचे पार्ट्सचे शेप आणि ऍनोटॉमी याची सांगड हा पुतळा बनवताना घालण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचा चष्मा आणि काठी या दोन वस्तू देशासाठी सिम्बॉलिक आहेत, या देखील विशिष्ट पद्धतीने बनवण्यात येणार आहेत. स्प्रिंग आणि पाईपचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. अशाप्रकारचे शिल्प भारतात अद्याप तरी कुठे उभारले गेले नाही. त्यामुळे देशातील एकमेव भंगारचे हे शिल्प असणार आहे.

सेवाग्राम विकास आराखड्यात सेवाग्राम येथे विविध कामे सुरू आहेत.त्याअंतर्गत हा पुतळा तयार होत आहे. वर्धा येथे जिल्हाधिकारी पदावर आरूढ असताना  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही संकल्पना वारंवार बोलून दाखविली होती. महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे पहिल्यांदा आल्यावर आपली झोपडी स्थानिक उपलब्ध असलेल्या साहित्यानेच तयार करण्याचा आग्रह धरला होता. याशिवाय त्यांनी तशी करून घेतली होती. तोच धागा पकडत भंगार मधून गांधी आणि विनोबा साकारले जात (Wardha Mahatma Gandhi statue) आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.