भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य! बैठकीनंतरही तोडगा नाहीच; संतापात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

MPSC Chairman Bhimanrao Pune Protest News: एमपीएससी अध्यक्ष भीमनरावांच्या राजीनाम्याची मागणी महायुती सरकारकडून अमान्य केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिली आहे.

भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य! बैठकीनंतरही तोडगा नाहीच; संतापात विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
| Updated on: Oct 11, 2026 | 11:16 PM

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भीमनरावांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून अमान्य करण्यात आली आहे. बैठकीनंतर शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिली आहे. रोहित पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या बैठक पार पडली. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनामा आणि अध्यक्ष पदावरून हटविण्याच्या निर्णयावर तोडगा निघाला नाही. मात्र शिवेंद्रराजेंनी एक मोठी घोषणा केली आहे.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, मी मुख्यमंत्र्‍याचे आभार मानतो. त्यांनी मला इथे मला पाठवलं. रोहितदादांनी सांगितलं मला इथे वेडंवाकडं बोलायचं नाही. आज माझ्याकडे वेळ कमी आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. शासनाच्या वतीने मी इथे आलो आहे. आमची सर्वांची चर्चा झाली. आपण सकारात्मक निर्णय देत आहोत. तुमच्या मागण्याचा मसुदा मी रोहित पवारांकडे देत आहे. माझ्याकडे हा मसुदा संध्याकाळी आला होता. तुकाराम मुंढे एमपीएसी आयोगाच्या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

Loading...

ते म्हणाले की, निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमलेली आहे. आयोगात बदल घडवण्यासाठी मोठे अधिकारी नेमण्यात आले आहे. विवेकानंद तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही आहे. आता तुमच्याकडून माझी कोंडी नको व्हायला. मला भारती विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही आहे. मी गरिबासारखा साताऱ्यात शिकलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही आंदोलन मागे घ्यावं. काही गोष्टी संविधानिक असतात. कायदेशीर गोष्टी पाळाव्या लागतात.

शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, तुमची इच्छा असली तरी आपण कायद्याच्या चौकटीतून जाणारी माणसं आहोत. तुमचा अंतिम हेतू साध्य होणं गरजेचं आहे. तो हेतू नक्की साध्य होईल. असा शब्द मी तुम्हाला देतो. यानंतर रोहित पवार म्हणाले की, पूर्ण मसुदा वाचल्याशिवाय आपण अंतिम निर्णय घेणार नाही आहे. याला धाडस लागतं. सत्ताधारी असल्यावर निर्णय घेणं सोप्प नसतं. मुख्यमंत्र्यांनी यावर वेळ दिला आहे. यानंतर शिवेंद्रराजे भोसले इथे आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us