शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना रांगोळी कलाकाराचं अनोखं अभिवादन, कशी साकारलीय भव्य रांगोळी…

| Updated on: Jan 23, 2023 | 7:34 AM

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने बार्शी येथील एका कलाकाराने अनोखं अभिवादन केलं आहे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना रांगोळी कलाकाराचं अनोखं अभिवादन, कशी साकारलीय भव्य रांगोळी...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सागर, सुरवसे, टीव्ही 9 मराठी, बार्शी : आज शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. संपूर्ण देशभरात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ठिकठिकाणी अभिवादन केलं जाईल. त्यासाठी दोन दिवसांपासूनच शिवसेना भवन पासून ते गावखेड्यापर्यन्त विविध उपक्रमांचे आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठीचा प्रयत्न अनेक शिवसैनिकांकडून केला जातो. त्यासाठी काही दिवस आणि महीने शिवसैनिक कामाला लागतात. सोलापूरच्या बार्शी मधील एका कलाकाराने केलेलं अभिवादन चर्चेत आलं आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकाराने भव्य रांगोळी साकारली आहे. महेश मस्के असं कलाकाराचे नाव असून रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

कलाकार महेश म्हस्के यांनी बार्शीतल्या शिवशक्ती मैदान येथे 30 बाय 40 फूट उंचीची भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे.

जवळपास शंभर किलोहून अधिकच्या रांगोळीचा वापर ही कलाकृती साकारण्यासाठी करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पोट्रेट या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

बार्शी मधीलच कलाकार म्हणून परिचित असलेले महेश मस्के यांनी अनोख्या पद्धतीने बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. हीच रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

चित्रकार महेश मस्के यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांना घेऊन ही रांगोळी काढली आहे. जवळपास सहा तास ही रांगोळी साकारण्यासाठी वेळ लागला आहे. वेगवेगळ्या रंगाची रांगोळी वापरून ही कलाकृती साकार केली आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक वेगवेगळ्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतांना दिसून येतील त्यामध्ये बार्शीतील अभिवादन खास चर्चेत असणार आहे.